समाविष्ट गावांतील मिळकत नोंदीचे ‘क्रॉस व्हेरीफाय’; कर बुडविणाऱ्यांकडून होणार तिप्पट वसुली

पुणे  – महापालिकेत समाविष्ट गावांना मिळकत करात 40 टक्के सूट देण्याचा निर्णय झाल्यानंतर पालिकेने अशा गावांतून कर वसुलीवर लक्ष केंद्रीत केले आहे. परंतु, ग्रामपंचातीकडून अर्धवट अवस्थेत मिळालेल्या दफ्तरांमुळे निवासी, व्यावसायिकसह वाढीव बांधकामांच्या करवसुलीत अडचणी येत आहेत. यावर पर्याय म्हणून महापालिकेकडून आता महावितरणकडील वीजमिटरच्या नोंदींचा आधार घेतला जाणार आहे. व्यावसायिक मिटर, घरगुती मिटर, गृह निर्माण सोसायटीसाठीचे … Read more

पाकिस्तानी ड्रोनची भारतीय हद्दीत घुसखोरी; जवानांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे ड्रोनला पाडण्यात यश

नवी दिल्ली : भारताचा शेजारी देश पाकिस्तानने पुन्हा एकदा आपल्या कुरापती सुरू केल्या आहेत. अनेकदा शस्त्रसंधी आणि चर्चांच्या फेऱ्या होऊनही पाकिस्तानने एक ड्रोन भारतीय हद्दीत घुसवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका वृत्तसंस्थेने ट्वीट करून माहिती दिली आहे. दरम्यान, बीएसएफ अर्थात सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे हे ड्रोन वेळीच खाली पाडण्यात यश आले आहे. … Read more

ऐकावं ते नवल! उंदराने पोलिसांना शोधून दिले १० तोळं सोनं; वाचा काय आहे नेमका प्रकार

मुंबई : मुंबईत पोलिसांना चक्क एका उंदराने मदत केली आहे. हे वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल पण हे खरं आहे. मुंबईत  दिंडोशी परिसरात नाल्यातून पोलिसांनी तब्बल दहा तोळे सोने ताब्यात घेतले.  हे सोने मिळवण्यासाठी चक्क एका उंदराने पोलिसांना मदत केली. एका महिलेने भिकारी स्त्रीला पाव दिला होता. परंतु पाव कोरडा असल्याने भिकारी स्त्रीने तो कचरकुंडीत … Read more

जम्मू-काश्मीर: स्फोटकांनी भरलेला ड्रोन नष्ट करण्यात सुरक्षा दलांना यश

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी एक मोठा हल्ला होण्यापासून  रोखला आहे. स्फोटकांनी भरलेल्या एका ड्रोनला नष्ट करण्यात सुरक्षा दलांना यश आले  आहे. हा ड्रोन पाकिस्तानकडून आला असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. जम्मू कश्मीरच्या कचनाक परिसरात ही घटना घडली आहे. तैनातीवर असलेल्या सुरक्षा दलांना मध्यरात्री एक ड्रोन उडत येताना दिसला. वेळीच धोका ओळखून दलांनी … Read more

जामखेड | नियमाचा भंग केल्याप्रकरणी नगरपरिषदेकडून 8 दुकानांवर कारवाई; 80 हजाराचा दंड वसूल

जामखेड (प्रतिनिधी) : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खबदारीचा उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी शनिवारी व रविवारी कडक लॉकडाऊन करून सर्व दुकाने बंद करण्याच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी जामखेड शहरातील आठ नामांकित दुकानावर जामखेड नगरपरिषदेने दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे ऐंशी हजाराचा दंड वसूल केला असून यामध्ये जामखेड मधील नामांकित उदोगपतीच्या सुमारे तीन दुकानावरही … Read more

राज्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरूच! गेल्या २४ तासांत 62 हजार पेक्षा जास्त नवीन कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच मागील २४ तासांत कोरोनाबाधितांच्या संख्येने आपला आलेख चढताच ठेवला आहे. राज्यात 62 हजार 97 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. यातही दिलासादायक बाब म्हणजे आज 54 हजार 224 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 32 लाख 13 हजार 464 रुग्ण बरे होऊन … Read more

जिल्ह्यातील 73 नागरिकांची करोनावर मात

सातारा – जिल्ह्यातील विविध रुग्णालये, करोना केअर सेंटर व डीसीएचसीमध्ये उपचार घेतलेल्या 73 नागरिकांना गुरुवारी घरी सोडण्यात आले, तर 252 जणांच्या घशातील स्रावांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातील 18, कराड उपजिल्हा रुग्णालयातील 21, कोरेगावातील सात, फलटणमधील दहा, वाईतील 15, खंडाळ्यातील … Read more

उच्चभ्रू वाहन चालकाकडून वसूल केला तब्बल 27 हजारांचा दंड

वानवडी (पुणे) –  सतत वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या एका वाहन चालकाकडून पोलिसांनी तब्बल 27,200 रुपयांचा दंड एकरकमी वसूल केला आहे. ही कारवाई वानवडीतील भैरोबानाला चौकात वाहतूक पोलिसांनी केली. हे वाहन मुंबईतील उच्चभ्रू कुटुंबातील महिलेच्या नावावर आहे.     मुंबई ते पुणे ये-जा करत असलेल्या या वाहनावर अनियंत्रित वेग मर्यादा व नो पार्किंगचे नियम तोडल्याने मागील दोन … Read more

राज्यात आज कोरोनाच्या ५ हजार ४९३ नवीन रुग्णांचे निदान

राज्यात ८६ हजार ५७५ कोरोनाचे रुग्ण बरे होऊन घरी गेले – आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या ५४९३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ७० हजार ६०७ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. आज २३३० रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ८६ हजार ५७५ झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery … Read more

केसनंदचा कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण ठणठणीत बरा होऊन घरी परतला

वाघोली (प्रतिनिधी) : केसनंद येथील ४८ वर्षीय कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण ठणठणीत बरा होऊन घरी परतला आहे. घरी परतल्यानंतर केसनंद ग्रामस्थांच्या वतीने त्याचे जोरदार स्वागत करण्यात करून फुलांचा वर्षाव करण्यात आला. ग्रामस्थांच्या स्वागताने बरा झालेला रुग्ण भारावून गेला. केसनंदमध्ये कोरोना पॉजिटिव्ह सापडलेली एकमेव व्यक्ती कोरोनावर मात करून घरी परतली असल्याने केसनंद कोरोनामुक्त झाले आहे. तरीदेखील प्रशासनाच्या … Read more