IT – FMCG समभागांच्या विक्रीमुळे शेअर बाजार लाल रंगात बंद

Stock Market Updates: आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात भारतीय शेअर बाजारात मोठे चढउतार पाहायला मिळाले. अखेर बाजार घसरणीसह बंद झाला. दिवसाच्या व्यवहारात गुंतवणूकदारांनी केलेल्या प्रॉफिट बुकींगमुळे बाजार दिवसाच्या उच्चांकावरून 700 अंकांनी घसरला. तर निफ्टी उच्चांकावरून 200 अंकांनी घसरला. आयटी आणि एफएमसीजी समभागांमध्ये प्रॉफिट बुकींगमुळे बाजारात ही घसरण दिसून आली आहे. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 359.64 अंकांनी … Read more

बिपरजॉय चक्रीवादळाने धारण केले रौद्र रूप; पंतप्रधानांकडून परिस्थितीचा आढावा, ६७ रेल्वे गाड्या रद्द

नवी दिल्ली : देशावर घोंगावणाऱ्या बिपरजॉय चक्रीवादळाने आता रौद्र रूप धारण केले आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चक्रीवादळाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. बिपरजॉय चक्रीवादळाचे अत्यंत तीव्र वादळातून पुन्हा अतितीव्र चक्रीवादळाच्या श्रेणीत रुपांतर झाले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी आढावा बैठक घेतली. पंतप्रधान मोदी यांनी चक्रीवादाळाची परिस्थिती आणि किनारपट्टी भागातील उपाययोजनांचा आढावा घेतला. किनारपट्टी … Read more

आश्चर्यच म्हणायचं! शेतकऱ्याने पिकवली ‘लाल भेंडी’; तब्बल ८०० रु.प्रति किलो भावाने होतीय विक्री

नवी दिल्ली : देशात एकीकडे शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळत नसल्याची ओरड होत आहे. मात्र दुसरीकडे मध्य प्रदेशमधून एका प्रयोगशील  शेतकऱ्याची कहाणी समोर आली आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील एका शेतकऱ्याने चक्क लाल रंगाची भेंडीची शेती केली आहे.  तसेच या भेंडीला थोडा थोडका नव्हे, तर प्रति किलो तब्बल ८०० रुपयांचा भाव मिळत असल्याचे सांगण्यात … Read more

राज्यात मान्सूनचा जोर; काही जिल्ह्यांत रेड, ऑरेंज अलर्ट जारी

मुंबई- महाराष्ट्राच्या दक्षिणेत मान्सून दाखल झाल्यापासून राज्यात विविध ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यात जवळजवळ सर्व जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईत आज सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली. तसेच पुढील काही दिवसांत मुंबईसह पुणे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तसेच प्रशासनाला सज्ज राहण्याचा … Read more

गोवा बनावटीच्या मद्यासह साडे दहा लाखाचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची कारवाई कोल्हापूर: चंदगड तालुक्यातील तिलारीनगर शेतवडी येथे मंगळवारी पाहटे 3 वाजण्याच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने छापा घातला. यावेळी मुख्य रस्त्याकडे येणाऱ्या बोलेरो जीपला थांबवून तपासणी केली असता 6 लाख 7 हजार रुपये किमतीचे गोवा बनावट मद्याचे 110 बॉक्स, तसेच 4 लाख 57 हजार किंमतीचे वाहन व … Read more

3 लाख 26 हजार रुपायांची गोवा बनावटीची दारु जप्त

उत्पादन शुल्क विभागाचा छापा कोल्हापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने चंदगड तालुक्यातील हेरे येथे अवैधरित्या विक्री करण्यासाठी आणलेल्या मद्य साठ्यावर रविवारी छापा घातला असून. या छाप्यात 3 लाख 26 हजार 640 रुपयांची गोवा बनावटीची दारु जप्त करण्यात आली. अशी माहिती उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांनी दिली. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी अवैध दारु … Read more

हुतात्मा राजगुरू स्मारकाच्या फायली लाल फितीत

– रामचंद्र सोनवणे राजगुरूनगर – राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू यांच्या राष्ट्रीय जन्मस्थळ स्मारकाचा प्रश्‍न वर्षानुवर्षे प्रलंबितच असून याबाबत स्थानिक नागरिक आणि अधिकारीवर्गाचा पाठपुरावा होत नसल्याने या राष्ट्रीय स्मारकाच्या फायली मंत्रालय पातळीवर लाल फितीत अडकून आहेत. ज्यांनी देश स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती दिली त्या थोर क्रांतिकारकांच्या राष्ट्रीय जन्मस्थळ स्मारकाचे काम अजूनही रेंगाळल्याने हे स्थानिक राजकीय नेत्यांचे अपयश … Read more

‘जेट एअरवेज’ चे संस्थापक गोयल यांच्या घरावर ईडी चे छापे

नवी दिल्ली: परकीय चलन विनिमय कायद्याच्या उल्लंघन प्रकरणा संदर्भात जेट एअरवेज कंपनीचे संस्थापक नरेश गोयल यांच्या घरावर ईडी ने छापे मारले आहेत. परकीय चलन विनिमय अधिनियमातील (फेमा)तरतुदींच्या आधारे अतिरिक्त पुरावे गोळा करण्यासाठी गोयल यांच्या मुंबई आणि दिल्ली मधील घरावर हे छापे मारण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे. जेट एअरवेज ही कंपनी सध्या दिवाळखोरीतून जात … Read more