पुणे : ‘एसआरए’च्या सदनिका विक्री मुदत मर्यादा कमी करणार

१० वर्षांएवजी सात वर्षेच्या प्रस्तावास मंजुरी पुणे . झोपडपट्टी प्राधिकरणाच्या माध्यमातून झोपडीधारक लाभार्थ्यास प्राप्त झालेली विनामूल्य सदनिका कोणत्याही प्रकारे हस्तांतरीत करण्यास १० वर्षे कालावधीपर्यंत मनाई आहे. ही मर्यादा कमी करून सात वर्षे करण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. तथापि ही मर्यादा पाच वर्षापर्यंत कमी करण्याच्या लोकप्रतिनिधींच्या मागणीसंदर्भात कायदेशीर सल्ला घेऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मांडला जाईल, … Read more

कॅन्सरला दूर पळवाचंय तर मग रोज हे काम करा…; र्करोगाचा धोका होईल 20 टक्क्याने कमी

वॉशिंग्टन : आधुनिक काळामध्ये सर्वांची जीवनशैली बदलून गेली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये हृदयविकारासह कर्करोगाचा धोकाही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आता एका नवीन संशोधनाप्रमाणे दररोज घरातलीच कामे करून तुम्ही कर्करोगाला दूर ठेवू शकता. दररोज दम लागेपर्यंतअसे किमान एक जरी काम केले तरी कर्करोगाचा धोका 20 टक्क्याने कमी होतो, असे या संशोधन अहवालात म्हटले आहे. सर्वसाधारणपणे आधुनिक … Read more

Petrol-Diesel : ‘पेट्रोल-डिझेल’वरील मूल्यवर्धित कर राज्यानेही केला कमी

मुंबई : केंद्र शासनाने काल(शनिवार,21 मे 2022) पेट्रोल आणि डिझेलचे अबकारी कर कमी केल्यानंतर राज्य शासनाने आज 22 मे पासून पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात ( VAT) अनुक्रमे 2 रुपये 8 पैसे आणि 1 रुपया 44 पैसे प्रती लिटर कपात केली आहे. यामुळे वार्षिक सुमारे 2500 कोटी रुपये राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे. मूल्यवर्धित कर … Read more

गुणवत्तेशी तडजोड न करता बांधकामाचा खर्च कमी करायला हवा – नितीन गडकरी

नवी दिल्‍ली – गुणवत्तेशी तडजोड न करता बांधकामाचा खर्च कमी करायला हवा, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. इंडियन इन्फ्रास्ट्रक्चरने आयोजित केलेल्या ‘भारतातील रस्ते विकास’ या विषयावरील 17व्या वार्षिक परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले की, रस्ते बांधणीत टाकाऊ रबर आणि प्लॅस्टिक यासारख्या सामग्रीचा वापर करून सिमेंट आणि स्टीलवरील … Read more

PF Interest Rate: केंद्र सरकराचा सामान्यांना मोठा झटका; EPFO च्या व्याजदरात ऐतिहासिक कपात

नवी दिल्ली : केंद्र सरकारने  सर्वसामान्यांना पुन्हा एकदा मोठा झटका दिला आहे. भविष्य निर्वाह निधीवर मिळत असलेल्या व्याजदरात आजपर्यंतची सर्वात मोठी कपात केली आहे. आता ईपीएफओ ​​अंतर्गत उपलब्ध पीएफचा व्याजदर 8.50 टक्क्यांवरून 8.10 टक्के करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ईपीएफओने आर्थिक वर्ष 2022-23 साठी व्याजदर 8.5 टक्क्यांवरून 8.1 टक्के केला आहे. गुवाहाटी येथे सुरू … Read more

पुणे: जिल्हा परिषदेचे बजेट 80 कोटींनी घटले

230 कोटी 50 लाखांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी ; अनेक गावे पालिकेत आल्याचा फटका पुणे – महापालिकेतील समाविष्ट 23 गावे आणि जिल्हा परिषदेच हक्का मुद्रांक शुल्काची रक्कम न मिळाल्यामुळे पुणे जिल्हा परिषदेच्या यंदाच्या अर्थसंकल्पावर परिणाम झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत 80 कोटी रुपयांनी यंदा अर्थसंकल्पात घट झाली आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, अर्थ व वित्त समितीचे सभापती रणजित शिवतरे … Read more

कोविडचा धोका कमी झाल्यावर राज्यातील यात्रा, जत्रांना परवानगी – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

मुंबई : कोविड पार्श्वभूमीवर राज्यात गेल्या दीड वर्षापासून सांस्कृतिक कार्यक्रमांना राज्यात बंदी घालण्यात आली आहे. कोविडच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका वर्तविण्यात येत असल्याने हळूहळू राज्यातील यात्रा आणि जत्रा यांना परवानगी देणार असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने आज सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांची … Read more

सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; खासगी रुग्णालयातील लसींच्या साठ्यात करणार कपात?

नवी दिल्ली : देशातील करोनाला रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींनी ८ जून पासून खासगी रुग्णालयांना देशात उत्पादित होत असलेल्या लशींपैकी २५ टक्के लस खासगी रुग्णालयांना देण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र  आता या लसींच्या बाबतीत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. खासगी रुग्णालये लसीची निर्धारित किंमत वगळता एका डोसला १५० रुपये सेवा कर आकारु शकतात. त्यानंतर … Read more

रेमडेसिवीर इंजेक्शनच्या किमती नियंत्रित करून 1500 पर्यंत कमी होणार

मुंबई : राज्यात कोविड-19 या साथरोगाचे रुग्ण ऑक्टोबर, 2020 ते जानेवारी 2021 या काळात बरेच कमी झाल्याचे दिसून आले होते. परंतु फेब्रुवारी, 2021 च्या मध्यापासून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असून दरदिवशी सुमारे 10,000 नवीन रुग्ण वाढत आहेत. आज रोजी राज्यात 98859 सक्रीय रुग्ण आहेत. सदर परिस्थिती बघता राज्यात कोविड-19 या साथरोगाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेची शक्यता नाकारता … Read more

विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही : एकनाथ शिंदे

मुंबई –  मूलभूत सोयी सुविधा योजनेअंतर्गत राज्यातील कुठल्याही महापालिका व नगरपालिकांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत दिली. नागपूर महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधा योजनेअंतर्गत निधी अप्राप्त असल्याबाबत विधान परिषद सदस्य प्रवीण दटके यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते विधान परिषदेत बोलत होते. एकनाथ शिंदे म्हणाले, कोविड-19 च्या … Read more