Pune: १५ क्षेत्रीय कार्यालयांकडून पावसाळी कामे झालीच नाहीत

पुणे – पावसाळा वाहिन्या सफाइचे काम क्षेत्रिय कार्यालयानी एप्रिलमध्ये सुरू केले होते. या कामांसाठी १५ क्षेत्रिय कार्यालय स्तराव प्रत्येकी स्वंतत्र निविदा काढण्यात आली होती. त्यानंतरही मे महिनाअखेरपर्यंत उपगनरांतील ८४ कि.मी. लांबीच्या पावसाळी गटारांची आणि १४ हजार चेंबरच्या स्वच्छतेचे काम बाकी होते. शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र साचलेल्या पाण्यामुळे क्षेत्रिय कार्यालय स्तारावरील कारभारही उघडा पडला आहे. … Read more

PUNE: तक्रार करणाऱ्यांचेच बांधकाम नियमबाह्य; येरवडा परिसरात चाैघांच्या घरावर कारवाई

येरवडा  – घर बांधताना नियम डावलुन बांधले गेले असुन यामुळे येण्या-जाण्यास रस्ता नाही, अशा तक्रारी शेजारी राहणाऱ्यांनी राज्य मानवी हक्क आयोगाकडे केली होती. मात्र, तक्रार करणाऱ्यांसह चारही घरे नियम डावलून बांधली गेली असल्याने या चारही घरावर येरवडा क्षेत्रीय कार्यालयाने मोठी कारवाई करुन नियमबाह्यपणे बांधलेले बांधकाम पाडण्याची कारवाई करण्यात आली. येरवडा गणेशनगर बीएसयुपी योजनेमध्ये जगदीश सोळंकी, … Read more

PUNE: बेवारस वाहने जप्त करण्याची प्रक्रिया सुरू

पुणे – बेवारस वाहने जप्त करण्याची प्रक्रिया महापालिकेने पुन्हा सुरू केली आहे. यात रस्त्यावर अनेक महिने पडून असलेली, नादुरुस्त वाहने उचलली जाणार आहेत. सदर वाहने रस्त्यावर थांबल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होततो. त्याखाली कचरा तयार होऊन दुर्गंधी होत असल्याचे निदर्शनास येत असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. यापूर्वी रस्त्यावरील बेवारस वाहने उचलण्याची कारवाई करण्यात आली आहे. या बेवारस … Read more

पुणेकरांनी अखेर करून दाखवले; पर्यावरण जपले, कृत्रिम हौदात गणेश मूर्ती विसर्जनाला पसंती

पुणे – पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुणेकरांनी आगळा-वेगळा आदर्श घालून दिला आहे. शहरात पाच दिवसांत तब्बल 1 लाख 13 हजार 92 गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यातील 71 हजार 65 मूर्तींचे विसर्जन लोखंडी टाक्‍यांच्या कृत्रिम हौदांत करण्यात आले आहे. राज्यशासनाने यंदा “पीओपी’च्या मूर्तींना मान्यता दिलेली आहे. पण, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशानुसार नैसर्गिक जलस्रोतांमध्ये मूर्ती विसर्जनास महापालिकेने … Read more

PUNE: ना कारवाई, ना दुरुस्ती; पालिकेला पडला खड्ड्यांचा विसर

पुणे – शहरात पाऊस थांबल्यानंतर रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याची घोषणा प्रशासनाने केली. त्यानंतर रस्त्यावर खड्डे आढळल्यास दि. 9 ऑगस्टनंतर अभियंत्यांवर कारवाईचा बडगा उभारण्याचा इशाराही दिला. मात्र, त्यानंतर गेल्या आठ दिवसांत सलग जोडून शासकीय सुट्टया आल्याने महापालिकेची यंत्रणा सुट्टीवर गेली आहे. त्यामुळे रस्ते दुरूस्तही नाही आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली नाही. दरम्यान, जवळपास सर्वच रस्त्यांवर खड्डे असताना … Read more

PUNE: उपनगरांत गल्लीबोळातील रस्त्यांना वाली कोण?

पुणे – शहरातील मुख्य रस्त्यांची खड्डयांमुळे चाळण झालेली असताना उपनगरांमधील गल्ली बोळांमधील क्षेत्रीय कार्यालयांच्या अधिकारात येणाऱ्या 12 मीटर रूंदीच्या रस्त्यांचीही प्रचंड दुरवस्था झाली आहे. पालिका आयुक्‍तांनी 12 मीटरवरील रस्त्यांना मुख्य खात्याला जबाबदार धरले असले तरी दुसऱ्या बाजूला मात्र त्यापेक्षा लहान रस्त्यांची जबाबदारी असलेले क्षेत्रीय कार्यालये मात्र खड्डयांवर केवळ कागदोपत्री खर्च दाखवित आहेत. मागील वर्षी महापालिका … Read more

मिळकतकर बिलांचा गोंधळ संपणार; महापालिकेकडून 40 टक्के सवलतीच्या कामकाजात बदल

पुणे – राज्य शासनाने पुणेकरांना 1970 पासून निवासी मिळकतींच्या कर आकारणीत देण्यात येणारी 40 टक्के सवलत कायम ठेवली असली तरी महापालिकेच्या कर संगणक विभागाच्या कारभारामुळे लाखो पुणेकरांना चुकीची बिले आली आहेत. तर अनेक बिलांमध्ये गोंधळ वाढविणारी रक्कम असल्याने पुणेकरांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. परिणामी, मिळकतकर कर भरणाऱ्यांची संख्या घटली असून त्याचा फटका महापालिकेच्या … Read more

पिंपरी-चिंचवड क्षेत्रीय कार्यालयातील अंतर्गत बदलीसाठी राजकीय वरदहस्ताचा वापर

महिला कर्मचाऱ्यांना त्रास देऊन वरिष्ठांकडून मानसिक खच्चीकरण चऱ्होली – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भोसरी येथील ई क्षेत्रीय कार्यालयात वैयक्तिक स्वार्थ आणि कामचुकार वुत्तीमुळे राजकीय वरदहस्त वापरून मोक्‍याच्या ठिकाणी कर्मचारी बदली करून घेतात. पण यात महिला कर्मचाऱ्यांचा नाहक बळी जात आहे. काही महिन्यातच एका विभागातून दुसऱ्या विभागात अंतर्गत बदलीला महिला कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे चांगले काम … Read more

क्षेत्रीय कार्यालये बनली भंगाराचे दुकान

अतिक्रमण कारवाईचा माल ठेवण्यास नाही जागा लिलाव प्रक्रिया रखडल्याने प्रशासनाची अडचण पुणे – महापालिकेने अतिक्रमण कारवाई करून जप्त केलेले साहित्य क्षेत्रीय कार्यालय तसेच महापालिकेच्या रिकाम्या जागेवर ठेवले आहे. मात्र, अनेक दिवसांपासून ते तसेच पडून असल्याने भंगाराचे ढीग साचले आहेत. या साहित्याची लिलाव प्रक्रिया रखडली असल्याने क्षेत्रीय कार्यालयांमध्ये भंगाराच्या दुकानांसारखी अवस्था झाली आहे. त्यामुळे याबाबत लवकरच … Read more

पुणे – क्षेत्रीय कार्यालयांवर राडारोड्याचा भार

अखेर प्रशासनाने निश्‍चित केली जबाबदारी पुणे – नदीपात्रात राजरोसपणे राडारोडा टाकून जागा बळकाविण्याला लगाम घालण्याची जबाबदारी आता महापालिका प्रशासनाने क्षेत्रीय कार्यालयांवर सोपविली आहे. संबंधित क्षेत्रिय कार्यालयांच्या हद्दीतील नदी, नाले, ओढे यामध्ये राडारोडा टाकण्यात आल्यास संबंधित क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी त्यावर आता तातडीने कारवाई करायची आहे. यासंबंधिचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी आयुक्‍तांकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांकडून देण्यात … Read more