Crime News : अनैतिक संबंधातून भाच्याने केला मामीचा खून; स्प्रे मुळे सापडला आरोपी

मुंबई – नालासोपाऱ्यात सापडलेल्या अज्ञात महिलेच्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. या महिलेच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केले होते. अनैतिक संबंधातून या महिलेची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. अनैतिक संबंधातून भाच्याने मामीची हत्या केल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. दरम्यान, मतदार यादी आणि घटनास्थळावरुन भेटलेल्या स्प्रेवरुन या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले … Read more

भारताबरोबरचा सीमा प्रश्‍न म्हणजे द्विपक्षीय संबंध नव्हे; चीनने घेतली समजूतदारपणाची भूमिका

बीजिंग  – भारताबरोबरचा सीमा प्रश्‍न म्हणजे संपूर्ण द्विपक्षीय संबंध नव्हेत, असे चीनने म्हटले आहे. गैरसमज टाळण्यासाठी आणि गैरअर्थ काढले जाऊ नयेत, यासाठी दोन्ही देशांमधील परस्पर सामंजस्य वाढवण्याच्या गरजेवर देखील चीनने भर दिला आहे.जोपर्यंत सीमाभागात शांतता प्रस्थापित होत नाही, तोपर्यंत चीनशी द्विपक्षीय संबंध सुरळीत होऊ शकत नाहीत, अशी भूमिका भारताने कायम ठेवली आहे. जून २०२० मध्ये … Read more

चिटिंग केली, चूक कळली… पुन्हा नातं जोडण्यासाठी ‘या’ टिप्स नक्की वाचा, जोडीदाराचा विश्वास होईल आणखी मजबूत

Relationship : आजकाल, नात्यात विश्वासघात एक सामान्य गोष्ट बनली आहे. याचे कारण हे देखील असू शकते की आजकाल लोकांसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तो त्याच्या इच्छेनुसार आपला जोडीदार बदलत राहतो. काही नाती अशी असतात जिथे फसवणूक होऊनही त्यांना आपला जोडीदार गमवायचा नसतो. तुम्हीही अशाच परिस्थितीतून जात असाल तर. जर तुमचा पार्टनर तुमच्या काही कृतींनंतर तुमच्यावर … Read more

दीर्घकालीन वैवाहिक नातं टिकवायचं असेल तर जाणून घ्या ‘या’ दोन महत्वाच्या गोष्टी

लंडन :  आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभणे किंवा दीर्घकाळ वैवाहिक सहजीवन लाभणे ही निश्चितच महत्त्वाची गोष्ट असते. या संदर्भात नेहमीच अशा आरोग्यपूर्ण जीवनाचे किंवा दीर्घकालीन वैवाहिक जीवनाचे रहस्य काय? असा प्रश्न विचारला जातो. इंग्लंडमधील वेल्स येथे राहणाऱ्या एका जोडप्याने नुकतेच आपल्या वैवाहिक आयुष्याची 63 वर्षे पूर्ण केली असून त्यांना गेल्या महिन्यामध्ये ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने त्यांच्या दीर्घकालीन वैवाहिक … Read more

“राज ठाकरेंचा बांध फुटला अन् बाळासाहेबांचा ‘राजा’…”; काका-पुतण्याच्या नात्याविषयीची मनसेची पोस्ट

MNS post।

MNS post। राज्यात सध्या काका-पुतण्याची चर्चा जोरदारपणे सुरु आहे. जयंत पाटील यांच्या काका-पुतणे हे काँग्रेसला धार्जिण आहेत या वाक्यावरून या चर्चांना उधाण आलंय. आता त्यांच्या याच विधानाचा आधार घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून एक खास पोस्ट शेअर करण्यात आलीय. ज्यामध्ये काका-पुतण्याच्या नात्याविषयी सांगण्यात आलं आहे. मनसेने शेअर केलेल्या पोस्टमध्ये,“आज महाराष्ट्रात राजकीय कुटुंबातील काका – पुतण्या या … Read more

Family Dispute Cases| पती-पत्नीच्या नात्यातील वाढती दरी चिंताजनक! तीन वर्षांत 11 लाख कौटुंबिक वादाची प्रकरणे

Family Dispute Cases| देशात पती-पत्नींच्या नात्यांत दरी पडण्याची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. देशभरातील कौटुंबिक न्यायालयांत २०२१ मध्ये कौटुंबिक वादाची ४,९७,४४७ प्रकरणे होती. २०२३ मध्ये ती वाढून ८,२५,५०२ वर पोहोचली. केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालय तसेच कुटुंब आणि आरोग्य कल्याण मंत्रालयाने सर्व उच्च न्यायालयांमधून २०२१, २०२२ आणि २०२३ च्या कौटुंबिक वादाची माहिती एकत्र केली आहे. कौटुंबिक … Read more

पुणे | फोटो व्हायरल करण्याच्या धमकीप्रकरणी तरुणास अटक

पुणे, – तरुणीला रिलेशनशिप मध्ये राहा, अन्यथा दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वडगाव शेरी येथे राहणाऱ्या एका २६ वर्षीय तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आशिष धोंडीराम कोलते (३०, रा. क्रांतीनगर, छत्रपती शिवाजीनगर) असे … Read more

तितीक्षा तावडे ‘दृश्यम २’ फेम अभिनेता सिद्धार्थ बोडकेसोबत बांधणार लग्नगाठ

Titeekshaa Tawde  – सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिका सध्या चांगली चर्चेत आहे. या मालिकेतील नेत्राचे पात्र साकारणारी अभिनेत्री तितीक्षा तावडे सध्या तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे. तिने पोस्ट शेअर करत चाहत्यांना ललवकरच लग्न करणार असल्याची माहीती दिली आहे. काही दिवसांपूर्वी तितीक्षा तावडेने पोस्ट शेअर करत दृश्यम २ फेम अभिनेता सिद्धार्थ बोडकेसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे … Read more

निज्जर प्रकरणात कॅनडाचा नरमाईचा सूर; संबंध सुदृढ होत असल्याचा थॉमस यांचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली – हरदिप सिंग निज्जर हत्या प्रकरणात कॅनडाला भारताकडून चांगले सहकार्य मिळत असून दोन्ही देशांमधील संबंध चांगले होत असल्याचे शुक्रवारी निवृत्त झालेले कॅनडाचे एनएसआयए जोडी थॉमस यांनी म्हटले आहे. भारत हे सहकार्य करणारे राष्ट्र नाही असे मी म्हणणार नाही आणि आमच्या संबंधांत प्रगती झाली असल्याचे थॉमस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. निज्जर प्रकरणात कॅनडाचे पंतप्रधान … Read more

“जोपर्यंत मी कोठडीत, तोपर्यंत तू मुक्त”

पणजी – बंगळुरूच्या महिला सीईओ सूचना सेठ आणि त्यांचे पती व्यंकट रमण शनिवारी गोव्यातील कळंगुट पोलीस ठाण्यात आमनेसामने आले. सूचना आणि त्यांच्या पतीने एकमेकांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. पोलिसांनी त्यांना १५ मिनिटे भेटण्याची परवानगी दिली. यादरम्यान पोलिसांच्या माहितीनुसार, जोपर्यंत मी पोलीस कोठडीत आहे, तोपर्यंत तू मुक्त आहेस. तुझ्यामुळेच आज माझी ही अवस्था झाली आहे, … Read more