उजनीच्या तीरावर हृदय पिळवटून टाकणारा मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश

ujani

बिजवाडी : उजनीच्या भिमापात्रात परवा संध्याकाळी वाऱ्याने बोट पलटी होऊन अपघात झाला होता. या अपघातात सहा जण बुडन बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. परवा संध्याकाळपासून या बुडालेल्या लोकांचा शोध घेण्याची मोहीम सुरू होती. ती तब्बल ३६ तासानंतर थांबली. आज सकाळी सहा मृतदेह पाण्यावरती तरंगताना सापडून आले. सोलापूर जिल्ह्यातील कुगाव येथून इंदापूर तालुक्यातील कळाशी येथे सायंकाळच्या … Read more

पुणे जिल्हा : हरवलेली वृद्ध महिला नातेवाइकांच्या ताब्यात

शिक्रापूर पोलिसांकडून चार तास शोध शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरुर) येथे एक जानेवारी रोजी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेली एक वृद्ध महिला हरवल्याची घटना घडल्यानंतर वृद्ध महिलेच्या नातेवाईकांचा शोध घेत महिलेला नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले आहे. शिक्रापूर येथे एक जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमास जाण्यासाठी लाखो अनुयायी आलेले होते. चाकण … Read more

Happy New Year 2024: आपल्या मित्र-नातेवाईकांना नवीन वर्षांच्या पाठवा खास शुभेच्छा; 20 शुभेच्छा संदेश

Happy New Year 2024: लवकरच वर्ष 2023 संपणार असून 2024 वर्ष सुरु होणार आहे. अवघे काही तास बाकी राहिले आहेत. नववर्षानिमित्त अनेक लोक नवीन संकल्प करत असतात. तसेच इतरांना नवीन वर्षानिमित्त शुभेच्छा संदेश पाठवून शुभेच्छा देत असतात. नववर्षानिमित्त लोकांमध्ये मोठा उत्साह अन् आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तुम्ही नववर्षाच्या निमित्ताने जवळच्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक आणि कुटुंबातील … Read more

माळीणच्या जखमा 9 वर्षांनंतरही ओल्याच; स्मृतिदिनानिमित्त मृतांच्या नातेवाइकांचे हृदय गहिवरले

मंचर – आंबेगाव तालुक्‍याच्या आदिवासी डोंगरी भागातील माळीण येथील दुर्घटनेला रविवारी (दि. 30) 9 वर्ष पूर्ण झाले.या स्मृतिदिनानिमित्त ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मृतांच्या आठवणीने कुटुंबातील मुली, मुले व नातेवाइक यांचे हृदय गहिवरून आले. दुर्घटना झालेल्या ठिकाणी बांधण्यात आलेल्या स्मृतीस्तंभाला पुणे जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती संजय गवारी, शिवसेना उद्धव … Read more

कैदी-नातलगांमध्ये आता ‘मोबाइल सेतू’; संवादासाठी येरवडा कारागृहात उपक्रम

पुणे – कारागृहातील बंदीवानांना नातलगांसोबत संवाद साधण्यासाठी कॉईन बॉक्‍सऐवजी स्मार्ट कार्ड मोबाइलद्वारे संवाद साधता येणार आहे. प्रायोगिक तत्वावर येरवडा मध्यवर्ती कारागृहात सेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे. याची अंमलबजावणी चांगल्या रितीने झाल्यास संपूर्ण राज्यात या उपक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे, अशी माहिती अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक (कारागृह व सुधारसेवा) अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली. … Read more

तलावात मुलगा बुडताना पाहून बापाने मारली उडी पण प्रयत्न ठरले अपयशी; जालन्यात पिता-पुत्राचा बुडून मृत्यू

जालना : जालना शहरातील मोती तलावात पोहण्यासाठी गेलेल्या पिता-पुत्राचा बुडून मृत्य झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना काल दुपारी घडली. तब्बल तासाभराच्या शोधकार्यानंतर बुडालेल्या पिता-पुत्राचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. माणिक निर्वळ व त्यांचा १४ वर्षांचा मुलगा आकाश हे आपल्या इतर तीन नातेवाईकांसोबत मोती तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना आकाश बुडत असल्याचे पाहून त्याला … Read more

प्राप्तिकर विभागाच्या छाप्यांनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया; “पाहुणे वेगवेगळ्या घरांत आहेत, ते गेल्यानंतर…”

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी, पार्थ पवार यांच्या मुंबईतील कार्यालयावर प्राप्तिकर विभागाकडून गुरुवारी छापे टाकण्यात आले. तसेच साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला. त्यानंतर  वेगवेगळ्या संस्थांचा कसा वापर केला जात आहे, याचा आता जनतेनेच विचार करावा, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली होती. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा माध्यमांशी बोलताना … Read more

रुग्णांच्या नातेवाइकांची सोशल मीडियावरून भावनिक हाक

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सध्या दररोज अडीच ते तीन हजार रुग्ण आढळून येत आहेत. त्यातच ऑक्‍सिजन बेड, रेमडेसिवरचा तुटवडा भासत आहे. अनेक ठिकाणी प्रयत्न करूनही माहिती मिळत नाहीत. यामुळे नेमकी मदत कोणाकडे मागावी, असा प्रश्‍न रुग्णांच्या नातेवाइकांना पडत आहे. त्यामुळे ते थेट सोशल मीडियाचा आधार घेत आहेत. … Read more

नागपुरात कोरोनाबाधितांचा मृत्यू; रुग्णालयाबाहेर नातेवाईकांकडून तोडफोड

नागपूर : राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. याचा परिणाम आरोग्य यंत्रणेवर होत असून अपुऱ्या आरोग्य व्यवस्थांमुळे अनेक रुग्णांना आपले प्राणही गमवावे लागत आहेत. नागपूर जिल्ह्यातील कन्हान येथील जवाहरलाल नेहरू रुग्णालयात चार कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर एका रुग्णाच्या नातेवाईकाने रुग्णालयाबाहेर तोडफोड करत ऑक्सिजन अभावी या चार रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला … Read more

करोना बाधितावर अत्यंसंस्कारास नातेवाईकांचा नकार

दीडशे फूट लांबून पाहिला मृत्यूदेह; कर्मचाऱ्यांकडे पुरेशा सुरक्षा साधनांचा अभाव पिंपरी (प्रतिनिधी) – घरातील एखाद्या व्यक्‍तीचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या कुडीला कवटाळून धाय मोकलून रडताना आपण अनेकदा पाहिले आहे. मात्र करोनाच्या या संकटामुळे रक्‍ताची नाती दुरावत असल्याचेही आता पहायला मिळत आहे. पुण्यातील एका करोना बाधिताचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी अंत्यसंस्कारास नकार दिला. मुलगा आणि भाऊ फक्‍त … Read more