Pune | रेमडेसिवीर इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री प्रकरणात तिघांना ‘या’ अटीवर जामीन

पुणे, दि.८ – कोविड सेंटर येथून प्राप्त करून बेकायदेशीरपणे रेमडेसिवीर इंजेक्शनची विक्री केल्याप्रकरणात न्यायालयाने तिघांना जामीन मंजूर केला आहे. पुराव्यामध्ये ढवळाढवळ न करणे, तपासास सहकार्य करणे, या अटीवर १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सत्र न्यायाधीश जी.पी. आगरवाल यांनी हा आदेश दिला आहे. प्रताप सुनील जाधवर (वय २४, रा. तळेगाव दाभाडे, ता.मावळ), अजय गुरुदेव मोराळे (वय २५, … Read more

मुलाची परवड पाहून मन सुन्न; आईचा मृतदेह बाईकवर स्मशानात नेण्याची वेळ!

श्रीकाकुलम – रुग्णवाहिका किंवा शववाहिका न मिळाल्याने कुटुंबीयांनी मोटारसायकलवरून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेला. ही धक्कादायक घटना आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात काल घडली. मरण पावलेली 50 वर्षीय महिला मांडासा गावातील होती. At a time when fear of #COVIDSecondWave grips #Srikakulam dist, a family was forced to shift the body of a 50 yr old woman on a … Read more

स्कुल बसचा वापर आता शववाहिकेसाठी!

पुणे  -शहरातील वाढत्या करोना रुग्णसंख्येमुळे मृतदेहाची ने-आण करण्यासाठी शववाहिका कमी पडत आहेत. या पार्श्‍वभूमीवर आरटीओच्या सहकार्यातून पुणे महापालिकेस 10 स्कुल बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. स्कुलबसमध्ये आवश्‍यक ते बदल करून त्या “शववाहिका’ म्हणून वापरण्यात येतील. स्कुलबसमध्ये आवश्‍यक ते बदल करण्यात आले आहेत. यासाठी स्कुल बस म्हणून वापरल्या जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलर, मोठया बसमधील पॅसेंजर सीट … Read more

राज्य सरकारचा पुण्याबाबत दुजाभाव

पुणे  -महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने महाविकास आघाडी सरकार पुणे शहराबाबत दुजाभाव करत आहे. त्यामुळेच ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिविर इंजेक्‍शन आणि कोविडच्या लसींचा शहराला अपुरा पुरवठा होत आहे. ससूनव्यतिरिक्त अन्य कोणत्याही ठिकाणी राज्य सरकार काम करत नाही. अशी टीका भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली. करोनाची सद्यस्थिती आणि आगामी काळातील नियोजनाबाबत भाजपच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त विक्रम कुमार … Read more

पुणे – आणखी 4,936 डिस्चार्ज, 3,978 नवे बाधित

पुणे  -शहरात गेल्या चोवीस तासांत 3 हजार 978 नव्या करोना बाधितांची वाढ झाली असून, बरे झालेल्या 4 हजार 936 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, बाधित मृतांचा आकडा वाढतच असून, गेल्या चोवीस तासांत शहर हद्दीतील 58 जणांसह 85 जणांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसांतील मृतांची ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. शहरातील ऍक्‍टिव्ह बाधितांची संख्या 44 … Read more

लस केंद्रासाठी खडाजंगी

पुणे  – प्रभागातील नागरिकांसाठी लसीकरण केंद्र सुरू करण्यावरून नगरसेवकांमध्ये चढाओढ सुरू आहे. त्यात लसीकरण केंद्रास मान्यता मिळत नसल्याने तसेच अधिकारी प्रतिसाद देत नसल्याने राग अनावर झालेल्या भाजप नगरसेवक धनराज घोगरे यांनी सहायक आरोग्य प्रमुख डॉ. वैशाली जाधव यांच्याशी वाद घातला. हा प्रकार आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांच्या समोरच घडल्याने विभागात मोठा गोंधळ उडाला. या … Read more

सलग दोन दिवस लसच नाही!

पुणे  -केंद्र सरकारने 18 वर्ष वयापुढील नागरिकांच्या लसीकरणासाठी आजपासून कोविन ऍपवर नोंदणी सुरू केली आहे. मात्र, मागील साडेतीन महिन्यांपासून सुरू असलेल्या लसीकरणासाठी सलग दुसऱ्या दिवशी लसच मिळाली नसल्याने लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. लसींच्या पुरवठ्याच्या या घोळामुळे लसीकरणाबाबत नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. शहरात 182 लसीकरण केंद्र असून त्यामध्ये सातत्याने वाढ … Read more

करोना मृतांच्या आकडेवारीत महापालिकेची लपवाछपवी?

पुणे, दि. 28 -करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या आकडेवारीत महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष लपवाछपवी करत असून या आकडेवारीबाबत आयुक्‍तांनी उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. याबाबतचे पत्रक माजी आमदार, प्रदेश कॉंग्रेस कमिटी उपाध्यक्ष मोहन जोशी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष, आमदार चेतन तुपे तसेच शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांनी दिले आहे. करोना नियंत्रणात भाजपला … Read more

पोलिसांच्या मुलांची नागरिकांना भावनिक साद

पिंपरी  – शहरातून करोना हद्दपार व्हावा, यासाठी आमचे आई-बाबा रस्त्यावर उतरून तुमचे करोनापासून रक्षण करण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही घरी राहून त्यांना सहकार्य करा. जेणेकरून हे युद्ध लवकर संपेल आणि आमचे आई-बाबाही घरी सुखरूप येतील, अशा भावनिक साद पोलिसांच्या मुलांकडून नागरिकांना घातली जात आहे. गेल्या वर्षभरात करोनामुळे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्‍तालयाच्या हद्दीत 810 पोलीस कर्मचारी … Read more

ऑक्‍सिजन प्लांटसाठी कॅन्टोन्मेंटची धडपड

पुणे -करोनाच्या रुग्णांना वेळेत ऑक्‍सिजन मिळावा, यासाठी त्याचा पुरेसा पुरवठाही गरजेचा आहे. त्यासाठी ऑक्‍सिजन प्लांट उभा करण्याचा विचार पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड करत आहे. यासंबंधी संरक्षण मंत्रालयाशी पत्रव्यवहार करण्याच्या हालचाली सुरू आहेत. बोर्डाच्या सरदार पटेल रुग्णालयात दररोज 200 च्या आसपास ऑक्‍सिजनची गरज भासते. खडकी कॅन्टोन्मेंटने ऑक्‍सिजन प्लांट उभारण्याबाबत संरक्षण मंत्रालयाशी पत्रव्यवहार केला आहे. त्याच धर्तीवर पुणे … Read more