पिंपरी | नदीपात्रालगत टाकलेला भराव काढून टाका

किवळे, (वार्ताहर) – प्रशासन निवडणूक कामात गुंतल्‍याचे पाहून काही जणांनी देहूतील इंद्रायणी नदीत संत तुकाराम महाराज देऊळवाड्याच्या विरुद्ध दिशेला काही नागरिकांनी राडारोडा टाकलेला आहे. यामुळे नदीचे पात्र अरूंद झाले आहे. पावसाळ्यात येणाऱ्या पुरामुळे संत तुकाराम महाराज देऊळवाडा, पित्ती धर्मशाळा व इतर भागाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित जागामालकांनी १५ दिवसांत टाकलेला भराव … Read more

पुणे जिल्हा : स्मारकाच्या फरशा काढण्याची परवानगी कोणी दिली? – हर्षवर्धन पाटील

ठेकेदारासह पीडब्ल्यूडीच्या कारभाराविरुद्ध नागरिक संतापले इंदापूर – तुम्हाला स्मारकाच्या फरशा करण्यासाठी कोणी परवानगी दिली, असा सवाल ठेकेदाराला जागेवर जाऊन, शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत राज्याचे माजी मंत्री भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केला. इंदापूर शहरातील पुणे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर शासनाच्या निधीतून मालोजीराजे स्मारक अद्यावत उभारले होते; आता या रस्त्याचे काम सुरू असल्याने कोणाचीही परवानगी न घेता संबंधित … Read more

अजित पवार यांच्याकडून प्रदेशाध्यक्ष पदावरुन हकालपट्टी; जयंत पाटील म्हणाले,“नोशनलिस्ट पार्टीला…”

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाने जयंत पाटील यांची पक्षाच्या प्रदेशाध्यपदावरून हकालपट्टी केल्याचे वृत्त समोर आले आहे. सुनील तटकरे यांची या पदावर नियुक्ती केल्याची घोषणा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केली. नव्या नेमणुका जाहीर करून मूळ राष्ट्रवादी पक्षाला आव्हान देण्यात आले होते. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या … Read more

“शिवसेनेच्या पाच मंत्र्यांना मिळणार डच्चू ” ; एकनाथ खडसे यांचा मोठा दावा

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यात पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना  उधाण आले आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४ मे रोजी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी मोठा दावा केला आहे. एका … Read more

सुषमा अंधारे म्हणल्या,”एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रीपद जाणार” ; तर उदय सामंतांनी उत्तर देत म्हटले,”पुढचे मुख्यमंत्री..”

मुंबई : शिवसेनेच्या ( ठाकरे गटाच्या ) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी  एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत एक मोठा दावा केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीवरून राजीनामा तयार ठेवण्याबाबत सूचना दिल्या असल्याचे वृत्त गुजरातमधील एका वृत्तपत्रात छापलं असल्याची धक्कादायक माहिती सुषमा अंधारे यांनी दिली आहे. त्याच्या या दाव्यानंतर आता शिंदे गटाकडून यावर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. … Read more

अकोल्यातील अंतर्गत वादातून मुख्यमंत्री शिंदेंची मोठी कारवाई; ‘या’ नेत्याची पदावरून हकालपट्टी

मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह शिवसेनेत बंड केले. या बंडानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटाला निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय घेतला. मात्र आता शिंदे गटातील अंर्तगत कलह चव्हाट्यावर आला असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण शिंदे गटाचे नेते गोपीकिशन बाजोरिया यांच्याकडे सोपवण्यात आलेली संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. त्यांची … Read more

वीजबिल न भरल्यास महावितरण वायरसह मीटरही काढणार…

बारामती(प्रतिनिधी) – वारंवार संधी देऊनही वीजबिल भरण्यास कानाडोळा करणाऱ्या ग्राहकांवर महावितरणने कठोर कारवाई सुरु केली आहे. जुलै अखेर मुख्यालयाने दिलेले 1813 कोटी रुपयांच्या वसूलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी महावितरणने कंबर कसली असून, थकबाकीदारांचे मीटर-वायर काढून आणण्याचे आदेश बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी सोलापूर, सातारा व बारामती मंडलातील अभियंत्यांना आढावा बैठकीत दिले आहेत. कारवाई टाळायची असेल … Read more

नसते उद्योग : एमआयडीसी जागा काढून घेणार

अनेक उद्योजकांनी ठेवले पोटभाडेकरू : व्याज व दंडात 50 टक्‍के सूट देऊनही थकविली रक्‍कम पिंपरी  – एमआयडीसीकडून उद्योग सुरू करण्यासाठी मिळालेल्या जागेवर पोटभाडेकरू ठेवून भाडे वसूल करणाऱ्या उद्योगांवर कारवाई करण्याचा निर्णय एमआयडीसीने घेतला आहे. या उद्योगांना व्याज व दंडात 50 टक्‍के सूट देऊनही या उद्योगांचा वसुलीला प्रतिसाद मिळत नसल्यास, करारनाम्यातील अटी-शर्तींचा आधार घेत, या उद्योगांची … Read more

नितीन गडकरींची मोठी घोषणा! सरकार पुढील वर्षभरात सर्व टोलनाके हटवणार

नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरूवारी संसदेत मोठी घोषणा केली. पुढील वर्षभरात सरकार सर्व टोलनाके हटवणार असल्याचे म्हटले आहे. त्याच योजनेवर सध्या काम सुरु असल्याचे त्यांनी संसदेत सांगितले. येत्या काळात चालकांना तंत्रज्ञानाच्या मदतीने टोल तेवढाच द्यावा लागेल जेवढे त्यांचे वाहन रस्त्यांवर चालेल, असे त्यांनी स्पष्ट केले. अमरोहा येथील बसपचे खासदार … Read more