‘तो’ परत येतोय! 24 तासांत 4 हजाराच्या जवळपास नवीन करोनाबाधितांची नोंद; 6 महिन्यात पहिल्यांदाच वाढली रुग्णसंख्या

नवी दिल्ली : देशात सध्या करोनाने आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आता रोजच नवीन बाधितांची आकडेवारी समोर येताना पाहायला मिळत आहे. शनिवारी देशात करोनाच्या 4 हजाराच्या जवळपास नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. शनिवारी  3 हजार 824 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मागील 6 महिन्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठा प्रमाणात बाधितांची संख्या वाढली आहे. … Read more

खबरदारी बाळगा! देशात करोनाच्या रुग्णांमध्ये किंचितशी घट ; १६३ नव्या बाधितांची नोंद

नवी दिल्ली : भारतातील करोनाचा प्रादुर्भाव घटताना दिसत आहे. देशात आज 163 नवे करोनाचे रुग्ण आढळले आहेत. शनिवारी ही संख्या 214 होती त्यामुळे आज रुग्ण संख्येत 51 रुग्णांची घट झाली आहे. देशात सध्या ओमायक्रॉनच्या XBB व्हेरियंटचे सात, BF.7 व्हेरियंटचे पाच आणि BQ.1.1 व्हेरियंटचे दोन रुग्ण आहेत. देशात करोनाचा संसर्ग घटताना दिसत आहे मात्र धोका कायम … Read more

“योगी आदित्यनाथांचे शिरच्छेद करणाऱ्याला दोन कोटींचे बक्षीस”; मुख्यमंत्र्यांना फेसबुकवरून पुन्हा जीवे मारण्याची धमकी

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना वारंवारपणे जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. दरम्यन, आज पुन्हा एकदा त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यावेळी फेसबुकवर मेसेजद्वारे पोस्ट टाकून शिरच्छेद करण्याची धमकी देण्यात आली असून या पोस्टमध्ये, शिरच्छेद करणाऱ्याला दोन कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असे म्हटले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकीची … Read more

पुणे : दैनिक “प्रभात’ जनमत चाचणीत नोंदवल्या प्रतिक्रिया

95 टक्‍के पालक पाल्यांना शाळेत पाठवण्याबाबत अनुकूल पुणे – राज्य शासनाने शुक्रवारी शाळा पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठवण्यासाठी अनुकूल आहेत का? सरकारच्या या निर्णयाविषयी त्यांची काय प्रतिक्रिया आहे? हे जाणून घेण्यासाठी दैनिक “प्रभात’च्या डिजिटल माध्यमावर जनमत चाचणी घेण्यात आली. राज्यातील 2 हजारांहून अधिक पालकांनी याबाबत आपल्या … Read more

समाधानकारक! पुण्यात दिवसभरात फक्‍त 180 नवे बाधित

करोनाच्या दहशतीत वावरणाऱ्या पुणेकरांना दिलासा पुणे – करोनाच्या नव्या बाधितांची संख्या सोमवारी फक्‍त 180 नोंदवली गेली. यामुळे गेल्या काही दिवसांपासून शहरावर असलेले करोनाचे सावट दूर होण्याला सुरुवात झाली आहे. दरम्यान, दिवसभरात 751 बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला. 4 लाख 69 हजार 927 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यातील 4 लाख 55 हजार 651 जण बरेही झाले आहेत. … Read more

योद्धयांची लढाई अपयशी! देशात २४ तासांत करोनामुळे तब्बल ‘एवढ्या’ डॉक्टरांचा मृत्यू

नवी दिल्ली : करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशाच्या सर्वच यंत्रणांना पोखरून टाकल्याचे दिसत आहे.  करोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी दिवसरात्र  लढणाऱ्या डॉक्टरांनाही याचा मोठ्या प्रमाणात फटका  बसला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, करोनाच्या दुसऱ्या लाटेत २४४ डॉक्टरांनी आपला जीव गमावला आहे. रविवारी ५० डॉक्टरांच्या मृत्यूची नोंद झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सर्वाधिक मृत्यू बिहार … Read more

मृतांचा आकडा काही कमी होईना! २४ तासांत तब्बल साडे तीन हजार बाधितांचा मृत्यू

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशाला आपल्या विळख्यात घेतले आहे. दिवसागणिक कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत भारतात तीन लाख 68 हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 3 हजार 417 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच तीन लाख 732 रुग्ण उचारानंतर कोरोनामुक्त झाले … Read more

करोनाच्या नव्या विषाणूचा एकही रूग्ण आढळलेला नाही

नवी दिल्ली – करोनाच्या विषाणूमध्ये म्युटेशन (बदल) होऊन तयार झालेला हा नवा विषाणू आणखी घातक असण्याची शक्‍यता आहे. शास्त्रज्ञांनी या विषाणुला B.1.1.7 असे नाव दिले आहे. करोना विषाणूच्या या नव्या स्ट्रेनमुळे जगभरातील अनेक देशांचे धाबे दणाणले आहेत. त्यातही प्रामुख्याने ब्रिटनमधून लोकांची ये-जा सुरु असलेले देश अधिक चिंतेत आहेत. दरम्यान, कोरोना विषाणूची नवी प्रजाती अद्याप भारतात … Read more

#Photos : सेलिब्रेटींचे सार्वजनिक ठिकाणी ‘सुईss सटक!’

चालता चालता घसरून पडणे, ही एक नैसर्गिक बाब आहे. आपण सगळेच कधी ना कधी धडपडतो, चक्क घसरून पडतो, काहींचा तर कपाळमोक्ष ही होतो. मात्र, एखादी प्रसिद्ध व्यक्ती जर सार्वजनिक ठिकाणी पडत असेल तर त्याची लागलीच बातमी होते. त्यांचा फोटो, व्हिडीओ व्हायरल होतो. योगगुरू बाबा रामदेव योगा करताना हत्तीवरून खाली पडल्याचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर … Read more

चिंताजनक ! देशात कोरोनाबाधितांची संख्या सव्वाचार लाखांवर

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा थैमान काही केल्या कमी होत नाही उलट तो झपाट्याने वाढतच आहे. त्यातही गेल्या 24 तासात पहिल्यांदाच देशात 400 पेक्षा जास्त बळी कोरोनामुळे गेले आहेत. 24 तासात 445 बळींची नोंद करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाबाधितांच्या संख्येत 14 हजार 821 ने वाढ झाली आहे. देशातील … Read more