पुणे जिल्हा : आदिवसी प्रतिनिधीच ‘भीमाशंकर’ ट्रस्टवर हवा

संघर्ष समितीच्यावतीने अपर तहसीलदार शिंदे यांना निवेदन राजगुरूनगर – खेड तालुक्यातील बारा ज्योतिर्लिंग असलेल्या भीमाशंकर मंदिराच्या देवस्थान ट्रस्टवर आदिवासी समाजाचे प्रतिनिधी असावेत या मागणीसह अन्य 12 मागण्याचे निवेदन भीमाशंकर संघर्ष समिती खेड, आंबेगाव यांच्या वतीने मंगळवारी (दि. 5) अपर तहसीलदार नेहा शिंदे यांना देण्यात आले. ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र भीमाशंकर देवस्थान ट्रस्टवर आदिवासी समाजाचा प्रतिनिधी असावेत, भीमाशंकर … Read more

पुणे जिल्हा : द्राक्षशेतीत काटेकोर व्यवस्थापन हवे

डॉ. सुजय सहा : तरंगवाडी येथे शिवार फेरी व्यवस्थापन चर्चासत्र इंदापूर – शेतीमध्ये काटेकोर व्यवस्थापनाला अनन्यसाधारण महत्त्व असते, असे प्रतिपादन राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे वरिष्ठ रोग शास्त्रज्ञ रडॉ. सुजय सहा यांनी केले. तरंगवाडी येथे आयोजित द्राक्ष शिवार फेरी व कीड रोग व्यवस्थापन चर्चासत्रात ते बोलत होते. द्राक्ष बागेमध्ये येणाऱ्या केवडा (डाऊनी), भुरी (पावडरी) व करपा … Read more

जादूटोणाविरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी होण्यासाठी व्यापक प्रयत्न आवश्यक – मंत्री मुंडे

मुंबई  : जादूटोणाविरोधात कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असून अंधश्रद्धाळू अफवा व त्यामधून घडणाऱ्या कुप्रथा यांना आळा घालण्यासाठी या कायद्याची राज्यात कडक अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी सामाजिक न्याय विभागाने या कायद्याची प्रचार व प्रसार समिती स्थापन केली आहे. या समितीच्या माध्यमातून व्यापक प्रयत्नांची गरज असून सर्वांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सामाजिक न्याय मंत्री … Read more

समृद्धी महामार्गाच्या बांधकाम साहित्याची वाहतूक करण्यासाठी परवानगीची आवश्यकता नाही – नगरविकासमंत्री शिंदे

मुंबई : सार्वजनिक वाहतुकीसाठी असलेल्या रस्त्यांवरुन समृद्धी महामार्गाच्या बांधकाम साहित्याची वाहतूक करण्यासाठी स्वतंत्र परवानगीची आवश्यकता नसल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत सांगितले. अमरावती जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्याअंतर्गत असेलेले रस्ते दुरुस्त करण्याबाबतचा तारांकित प्रश्न विधानसभा सदस्य बळवंत वानखेडे, सुरेश वरपुडकर, भास्कर जाधव, रवी राणा, हिरामण खोसकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता. मंत्री शिंदे म्हणाले … Read more

पुणे: बूस्टरसाठी ज्येष्ठांना सहव्याधी असल्याचे डॉक्‍टरांचे प्रमाणपत्र आवश्‍यक

दि.10 जानेवारीपासून कागदपत्रे पाहूनच देणार लस पुणे – हेल्थकेअर आणि फ्रंटलाइन वर्कर्सशिवाय साठ वर्षांवरील नागरिकांना करोना प्रतिबंधक लसीचा “बूस्टर’डोस दिला जाणार आहे. मात्र, “कोमॉर्बिड’ अर्थात अन्य गंभीर आजार असलेल्याच ज्येष्ठ नागरिकांना “बूस्टर’चा डोस मिळणार असून, तसे प्रमाणपत्र त्यांनी डॉक्‍टरांकडून आणणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा डोस देण्याची प्रक्रिया अगोदरप्रमाणेच असणार आहे. आधार क्रमांकाच्या आधारेच ही … Read more

प्रशासन सतर्क! दुबईहून आलेल्या प्रवाशांना सात दिवस विलगीकरण सक्तीचे; सार्वजनिक परिवहन सेवा वापरण्यासही मनाई

मुंबई : राज्यात वाढत जाणाऱ्या ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर विमानाने दुबईहून येणाऱ्या प्रवाशांवर कडक निर्बंध लावण्याचे पालिका प्रशासनाने ठरवले आहे. ओमायक्रॉनचे रुग्ण जास्त असलेल्या जोखमीच्या देशातून येणारे प्रवासी दुबईमार्गे आपला प्रवास करत असतात त्यामुळे दुबई विमानतळावर जगभरातील प्रवाशांचा संपर्क येत असतो. त्यामुळे दुबईहून येणाऱ्या प्रवाशांना सात दिवस गृह विलगीकरण सक्तीचे करण्यात आले आहे. ओमायक्रॉनच्या वाढत्या धोक्यामुळे मुंबईचे … Read more

मराठवाड्यातील विविध प्रमुख कार्यालयांचा विस्तार आवश्‍यक – अशोक चव्हाण 

नांदेड – मराठवाड्याचे विस्तीर्ण क्षेत्र, आठ जिल्ह्यातील विकास कामांचा असलेला अनुशेष आणि नागरिकांच्या गरजांचा प्राधान्यक्रम निश्‍चित करणे अत्यावश्‍यक आहे. हे लक्षात घेऊन प्रमुख कार्यालयांचा विस्तार व अतिरिक्त सुविधा निर्माण करुन देणे अत्यावश्‍यक झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत रस्ते, पूल, इमारती यांचे संकल्पचित्र, गुणवत्ता नियंत्रण व दक्षता या संदर्भातील प्राथमिक कामे वेळीच पूर्ण होण्याच्या दृष्टीने नांदेड … Read more

शुभमंगल सावधान! आता वधू-वर हजर नसतानाही करता येणार विवाह नोंदणी

नवी दिल्ली : विवाहाची नोंदणी करण्यासाठी  वधू-वर  या दोघांनाही विवाह नोंदणी कार्यालयात  हजर  राहावे लागत होते. मात्र आता केरळ न्यायालयाने या विषयी दिलेल्या निर्देशांनुसार वधू-वर उपस्थित नसतानाही लग्नाची नोंदणी करता येणार आहे. विशेष विवाह अधिनियमानुसार एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने असे निर्देश दिले आहेत. दोन्ही पक्षांची ओळख पटवण्यासाठी आता तंत्रज्ञानाचा वापर करता येऊ शकतो, असेही … Read more

अतिवृष्टी व पुरामुळे हानी झालेल्या रस्ते व पुलांच्या दुरुस्तीसाठी 2224 कोटींची आवश्यकता – अशोक चव्हाण

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे झालेल्या रस्ते व पुलांच्या हानीचा आज सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी विभागनिहाय आढावा घेतला. आतापर्यंतच्या अंदाजानुसार, राज्यातील हानीग्रस्त रस्ते व पुलांच्या दुरुस्तीसाठी सुमारे 2 हजार 224 कोटी रुपयांचा निधीची आवश्यकता असल्याचे मंत्री चव्हाण यांनी यावेळी सांगितले. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या आढावा बैठकीस विभागाचे सचिव (रस्ते) … Read more

येणाऱ्या काळात 50 खाटांवरील रुग्णालयांना स्वत:ची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा असणे बंधनकारक

मुंबई : गेल्या दीड वर्षांपासून आपण कोविडशी मुकाबला करीत आहोत. अजूनही कोविडची तिसरी लाट येऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी ऑक्सिजनची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहे. हे लक्षात घेता येणाऱ्या काळात 50 खाटांवरील रुग्णालयांना स्वत:ची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा असणे बंधनकारक करण्यात आल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख … Read more