शिकारीचा पाठलाग करताना विहिरीत पडला बिबट्या; वनविभागाच्या रेस्क्यु पथकाकडून जीवदान

पारगाव शिंगवे (पुणे) – शिंगवे (ता. आंबेगाव) येथील गाढवे मळ्यामध्ये रात्रीच्या वेळी शिकारीचा पाठलाग करताना विहिरीत पडलेल्या बिबट्यास वनविभागाच्या रेस्क्‍यु पथकाने आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने विहिरीच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळविले. शिंगवे गावच्या गाढवे मळा येथील शेतकरी भाऊ भिमाजी गाढवे यांच्या उसाच्या शेतात असलेल्या विहिरीत सोमवारी (दि. 13) पहाटे बिबट्या पडला होता. सकाळी साडेआठच्या सुमारास … Read more

Turkey earthquake: इमारती झाल्या जमीनदोस्त, हजारों लोकांचा मृत्यू, भारत सरकार पाठवणार बचाव पथक

नवी दिल्ली – तुर्की आणि सिरियामध्ये भूकंपात जीवितहानीसोबतच मोठी वित्तहानी झाल्याचा अंदाज व्यक्‍त करण्यात येत आहे. या दुर्घटनेमुळे जगभरातून दु:ख व्यक्‍त केले जात आहे. दरम्यान, भारत सरकार टर्की देशाची मदत करण्यासाठी रेस्क्‍यू टीम पाठवणार आहे. तसेच भूकंपग्रस्त लोकांच्या मदतीसाठी वैद्यकीय पथक, तसेच अन्य सामान पाठवले जाणार आहे. 1300हून अधिक लोक या दुर्घटनेत मृत्यू मुखी पडल्याची … Read more

वरंध घाटात सेल्फी घेताना दरीत पडलेल्या शिक्षकाचा मृतदेह काढण्यात रेस्क्यू टीमला यश

-अब्दुल शेख असं या शिक्षकाचं नाव – माकडांना खायला देताना  सेल्फी घेताना गेला तोल  -घाटात वाघजाई मंदिर परिसरात घडली घटना भोर -(जीवन सोनवणे)  पुण्याहून भोरमार्गे महाडला जाणाऱ्या वरंध घाटात सेल्फी घेताना 600 फूट खोल दरीत पडलेल्या शिक्षकाचा मृतदेह काढण्यात, नऊ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर स्थानिकं रेस्क्यू टीमला मध्यरात्री 3 वाजता यश आले आहे.अब्दुल शेख असं या … Read more

भंडारा, गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती; बचाव पथकामार्फत मदतकार्य सुरू

मुंबई – नागपूर विभागामध्ये गेल्या 24 तासात पडलेल्या पावसामुळे भंडारा, गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून पूरग्रस्त भागात स्थानिक शोध व बचाव पथकामार्फत मदत कार्य सुरु आहे. 1531 नागरिकांना गेल्या 24 तासात सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. राज्यात इतरत्र मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरु असून मंत्रालय नियंत्रण कक्ष राज्यातील सर्व जिल्हा नियंत्रण … Read more

केळवली धबधब्यात बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला

सातारा  – धबधब्यामध्ये बुडालेल्या राहुल सुभाष माने (वय 18, रा. संगमनगर, सातारा) या युवकाचा मृतदेह शोधण्यामध्ये शिवेंद्रसिंहराजे भोसले रेस्क्‍यू टीमच्या जवानांना यश आले. धबधब्याच्या खोल प्रवाहामध्ये राहुल याचा मृतदेह आढळून आला. मंगळवारी सकाळी सात वाजता दोन तासांच्या प्रयत्नानंतर हा मृतदेह शोधण्यात यश मिळाले. या दुर्दैवी घटनेबाबत अधिक माहिती अशी, राहुल मित्रांसमवेत घरच्यांना न सांगता शुक्रवारी … Read more

घरात शिरलेल्या बिबट्याला केले जेरबंद

माणिकडोह बिबट्या रेस्क्‍यू टीमची कामगिरी जुन्नर – पिंपळगाव रोठा (ता. पारनेर, जि.नगर) येथे शनिवारी (दि. 23) कुत्र्याचा पाठलाग करताना एक बिबट्याने घरात प्रवेश केल्याने एकच खळबळ माजली होती. मात्र, माणिकडोह बिबट बचाव केंद्र टीमने या बिबट्याने जेरबंद केल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्‍वास सोडला. येथील दिलीप जगताप यांच्या घरात हा नर बिबट्या घुसल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. … Read more