नगर | संशोधन व प्रबंध विकत घेवून वांझोटे संशोधन करू नका : प्रा.सुभाष शेकडे

नगर – संत एकनाथ महाराजांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे केलेले संशोधन हे पहिले संशोधन. सर्व संत मंडळींनी या भूमीला ज्ञानाचे विलोभनीय दान दिले आहे. चिकित्सक पणे संशोधन करून मिळालेल्या ज्ञानाचा वापर समाज हितासाठी करावा. स्वतः अनेक ठिकाणी जाऊन संशोधन करून संदर्भ गोळा करा. संशोधन व प्रबंध विकत घेवून वांझोटे संशोधन करू नका. आपल्याच कष्टातून पूर्ण झलेल्या संशोधनाने … Read more

पुणे | वैद्यकीय शिक्षण, आरोग्य, संशोधन संस्थांमध्ये समन्वय हवा – कानिटकर

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य व संशोधन संस्था यात समन्वय असायला हवा. त्यामुळे आरोग्यविषयक संशोधनात मदत होईल, असे मत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्ट. जन. माधुरी कानिटकर यांनी व्‍यक्‍त केले. भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयातर्फे आयोजित १९ व्या वार्षिक संशोधन परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी त्‍या बोलत होत्‍या. या वेळी भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विवेक … Read more

PUNE: ड्रोन तंत्रज्ञान क्षेत्रात अर्थार्जनाच्या संधी

पुणे – सरकार मोठ्या प्रमाणावर ड्रोन तंत्रज्ञानाच्या संशोधनावर खर्च करीत आहे. सर्व क्षेत्रातील विस्तार पाहता मानवरहित विमान आणि ड्रोन तंत्रज्ञानाला तरुण आणि कल्पक बुद्धिमान व्यक्तींची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांना त्यात संशोधनाच्या, अर्थार्जनाच्या अनेक संधी आहेत, असे सी-डॅकचे वरिष्ठ संचालक जी. संजीवन यांनी सांगितले. भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे ‘मानवरहित विमान प्रणाली आणि ड्रोन तंत्रज्ञान’ या … Read more

आंतरविद्यापीठ संशोधन महोत्सव स्पर्धेत 42 स्पर्धेकांना पारितोषिक

नाशिक – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात अविष्कार -2023 आंतरविद्यापीठ संशोधन स्पर्धेतील विविध गटातील विजेते 42 स्पर्धेकांना कुलगुरु लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. अविष्कार – 2023 विद्यापीठस्तरीय संशोधन स्पर्धेत मानव्यविद्या भाषा व ललीतकला, वाणिज्य, व्यवस्थापन व विधी, विज्ञान, शेती आणि पशुसंवर्धन, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, वैद्यक व औषध निर्माणशास्त्र या सहा … Read more

अरे बापरे.! तुमच्या स्मार्टवॉचमध्ये आहेत टॉयलेट सीटपेक्षाही जास्त बॅक्टेरिया? नवीन संशोधनाने केले आश्चर्यचकित

पुणे – स्मार्टफोननंतर आता स्मार्टवॉच हे प्रमुख गॅझेट बनले आहे. स्मार्टवॉच बाजारात सध्या 1,000 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. एका अंदाजानुसार, आज जवळपास प्रत्येकाकडेच स्मार्टफोन आहे आणि त्याच्याकडे स्मार्टवॉच देखील आहे, परंतु तुम्हाला माहित आहे का की तुमच्या स्मार्टवॉचचे ब्रेसलेट किंवा पट्टा किंवा बँड टॉयलेट सीटपेक्षाही अस्वच्छ आहे. एका नव्या संशोधन अहवालात ही बाब समोर आली आहे. … Read more

संशोधन: वाढत्या तापमानामुळे गाईंच्या दूध देण्याच्या क्षमतेत 35 टक्के घट

वॉशिंग्टन – हवामानातील बदल त्यातही तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याच्या परिस्थितीचा परिणाम फक्त मानवजातीवरच होत आहे असे नाही तर या बदलाचा परिणाम जनावरांनाही सहन करावा लागत आहे. नुकत्याच झालेल्या एका संशोधनाप्रमाणे तापमान वाढीचा फटका जनावरांना बसत असून गाईंच्या दूध देण्याच्या क्षमतेत त्यामुळे 35% घट होत आहे. तसेच आफ्रिका खंडातील हत्तींच्या मृत्यूचे प्रमाणही तापमान वाढीमुळे … Read more

सहारा वाळवंटात सापडला अनोखा उल्कापिंड; हजारो वर्षे अंतराळात राहून पुन्हा परतला पृथ्वीवर

राबात – बुमरँग ही संकल्पना सर्वांनाच माहित आहे. एखादी वस्तू अवकाशात फेकली की पुन्हा ती फेकणाऱ्याकडे येते या संकल्पनेला बुमरँग असे म्हटले जाते हे एक शस्त्रही आहे. आता सहारा वाळवंटात असा एक बूमरँग उल्कापिंड सापडला असून जो हजारो वर्षापूर्वी पृथ्वीपासून उडून अंतराळात गेला होता. आता हजारो वर्षे अंतराळात राहून तो पुन्हा एकदा पृथ्वीवर परतला असल्याचे … Read more

एकटे राहणाऱ्या माणसांचा दृष्टिकोनच वेगळा; कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीने केलेला संशोधनातील निष्कर्ष

वॉशिंग्टन – जगातील मानसशास्त्रज्ञांना नेहमीच मानवी मेंदूचे काम कशाप्रकारे चालते याविषयी आकर्षण असते. गेल्या काही वर्षांमध्ये मानवी संबंध आणि ताणतणाव या विषयावर मोठ्या प्रमाणात संशोधन करण्यात आले आहे. आता कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीने एकटे राहणाऱ्या माणसांच्या भावभावनांवर संशोधन केले असून या संशोधनाच्या निष्कर्षाप्रमाणे अशा प्रकारे एकटे राहणाऱ्या माणसांचा दृष्टिकोनच वेगळा असतो. समूहात राहणाऱ्या माणसांपेक्षा त्यांची विचारसरणीही वेगळी … Read more

सहा इंच उंचीच्या सापळ्याचे रहस्य अखेर उलगडले

वॉशिंग्टन : अंतराळात परग्रहवासीय म्हणजेच एलियन अस्तित्वात आहेत का याबाबत नेहमीच चर्चा केली जाते. यावर परस्पर विरोधी उलटसुलट असे दावेही केले जातात. 2003 मध्ये चिलीमध्ये अशाच प्रकारचा एक फक्त सहा इंच उंचीचा सापळा उत्खननात सापडला होता तो सापळा एखाद्या एलियनचा असावा, अशी आत्तापर्यंत चर्चा केली जात होती. मात्र संशोधकांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. तो … Read more

संशोधन! मुलांनी माती आणि चिखलामध्ये खेळणे फायदेशीर

वॉशिंग्टन – मुलांच्या आरोग्याची जपणूक करण्यासाठी पालक सर्वसाधारणपणे त्यांना माती आणि चिखल यापासून दूर ठेवतात. पण एका नवीन संशोधनाप्रमाणे ज्या लहान मुलांचा माती चिखल किंवा वाळूशी संपर्क होतो त्यांची प्रतिकार क्षमता जास्त होते. याशिवाय त्यांना कधी नैराश्‍याचा किंवा चिंतेचा सामना करावा लागत नाही. या संशोधनाप्रमाणे माती चिखल आणि वाळूमध्ये असे काही सूक्ष्मजीव असतात जे लहान … Read more