शिवाजी विद्यापीठाचे कोरोनाबाबत महत्त्वपूर्ण संशोधन

-‘व्हायरस कवच’ फॅब्रिक स्प्रेची निर्मिती
-कोरोना विषाणूला ९९ टक्क्यांहून अधिक निष्क्रिय करण्याची क्षमता

माझ्या शरीरावर करोना विषाणूचे संशोधन करा!

सोलापूर – करोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यासह केंद्राकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, करोनावर अद्याप कोणतीही लस, ठोस तसेच उपचार अद्याप सापडलेला नाही. तसेच जगभरात माकडाला लस देऊन त्यांच्यावर प्रयोग घेतले जात आहेत. त्यातच, माझ्या शरीरावर करोना विषाणूचे संशोधन करा, अशी मागणी सोलापुरातील पॅरोलवर तुरुंगाबाहेर आलेल्या कैद्याने केली आहे. पॅरोलवर असलेला कैदी गणेश हनुमंत घुगे … Read more

उष्ण, कोरड्या पृष्ठभागावर करोना विषाणू कमी तग धरतो “आयआयटी’च्या संशोधकांचे संशोधन

नवी दिल्ली – करोना विषाणू हा उष्ण आणि कोरड्या पृष्ठभागावर कमी काळ टिकाव धरू शकतो, असा निष्कर्श मुंबईतील “आयआयटी’च्या संशोधकांनी काढला आहे. या निष्कर्शाचा उपयोग करून सार्वजनिक ठिकाणच्या निर्जंतुकीकरणाच्या सूचना आता जगभर दिल्या जाव्यात, असे मतही या संशोधकांनी मांडले आहे. “जर्नल फिजिक्स् ऑफ फ्ल्युईड’ या वैज्ञानिक नियतकालिकामध्ये याबाबतचा निबंध प्रसिद्ध झाला आहे. एखाद्या व्यक्ती्ला शिंक … Read more

पृथ्वीजवळ नवजात ग्रह शोधण्यात यश

वॉशिंग्टन : रोचेस्टर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीने नवा भव्य ग्रह पृथ्वीजवळ शोधला आहे. या नवजात ग्रहाचे नाव 2 मास 1155-7919 बी असे ठेवण्यात आले आहे. आपल्या पृथ्वीपासून तो केवळ 330 प्रकाश वर्ष दूर आहे. अमेरिकन ऍस्टॉनॉमिकल सोसायटीच्या रिसर्च नोटस्‌मध्ये हा शोध प्रसिध्द करण्यात आला आहे. वायु आवरणापासून ग्रह बनण्याची प्रक्रियेवरचे नवे संशोधन मांडण्यात आले आहे. हा … Read more

मत्स्योद्योग विकासासाठी आइसलॅंडबरोबरच्या सामंजस्य कराराला मंजूरी

नवी दिल्ली : शाश्वत मत्स्योद्योग विकास क्षेत्रामध्ये भारत आणि आइसलॅंड यांच्यामध्ये सामंजस्य कराराला आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली. दोन्ही देशांमध्ये हा करार गेल्या वर्षी 10 सप्टेंबर रोजी झाला होता. खोल सागरामध्ये आणि इतर ठिकाणी मासे पकडण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी आपल्याकडील ज्ञानाची देवाण-घेवाण करणे. तसेच मासेमारीसाठी योग्य स्थानावर विविध … Read more

शिक्षण पूर्ण करण्यासाठी ‘ते’ राहिले वुहानमध्येच

 धुळे : कोरोना विषाणूमुळे चीनमध्ये अक्षरशः थैमान घातले आहे. या विषाणूमुळे आतापर्यत ४०० पेक्षा जास्त जणांचा प्राण गेला आहे. वुहान प्रांतातून प्रत्येक नागरिक बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो आहे. परंतु धुळ्याच्या दोन तरुणांनी वुहानमध्येच राहण्याचा निर्णय घेतला आहे. शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ते वुहानमध्येच राहणार आहे. या विद्यार्थ्यांना चीन सरकारतर्फे बॅटरीवर संशोधन करण्यासाठी फेलोशिप दिली जाते. तंत्रीक … Read more

संशोधनात सापडली मावकर मुकादमांची समाधी!

इतिहास संशोधक प्रा. प्रमोद बोराडे, डॉ. प्रिया बोराडे यांचे संशोधन कामशेत – मावळ तालुक्‍यात शिवकालातील आंदर, पवन व नाणे मावळ समाविष्ट होतात. यातील गावांचे ढोबळमानाने तीन प्रकार मध्ययुगात करण्यात आले आहेत. यामध्ये मौजे, कसबे व शहर अशा वर्गीकरणात नाणे मावळमधील माऊ हे मौजे माउ (सध्याचे आंदर मावळातील माऊ) म्हणून संबोधले जाते. इतिहास संशोधक प्रा. डॉ. … Read more

बीएलओंनो …दुबार बोगस मतदार शोध !

नगर  – लोकसभा आणि आता विधानसभेची निवडणूक संपत नाही तोच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ)ना आता दुबार,बोगस,मयत मतदार शोधून त्या याद्या अद्यावत करण्याचे काम करावे लागणार आहे. नवीन मतदार शोधून त्यांची नोंदवून मतदारयाद्या अद्यावत करण्याचे काम बाराही महिने करावे लागते.त्यात या कामाचे मानधनही वेळेत मिळत नाही. लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या कामांचे मानधन अजूनही मिळालेले नाही. बीएलओ … Read more

“एआयएसएसएमएस’मध्ये नावीन्यपूर्ण संशोधन

पुणे – ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या (एआयएसएसएमएस) अभियांत्रिकी महाविद्यालयातील केमिकल विभागातील सहायक प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी केंद्र शासनाच्या “स्वच्छ भारत अभियानाला’ सकारात्मक प्रतिसाद देत नावीन्यपूर्ण संशोधन करून तीन पेटंट दाखल केले आहे. इंग्लंड, चीन, भारत संपूर्ण जगात प्लॅस्टिकच्या जास्तीत जास्त निर्मितीस हातभार लावतात. भारतात सुमारे दहा हजार टन प्लॅस्टिक कचरा तयार होतो. पॉलिमरचा मोठा … Read more

संशोधनासाठी आयुका-विद्यापीठामध्ये करार

विविध प्रकल्पांवर संयुक्‍तपणे काम करणार : विकास व शैक्षणिक कार्यक्रम राबविले जाणार पुणे – संशोधनाच्या विविध प्रकल्पांवर संयुक्‍तपणे काम करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अस्ट्रॉनॉमी अँड अस्ट्रोफिजिक्‍स (आयुका) या दोन महत्त्वाच्या संस्थांमध्ये आज सामंजस्य करार करण्यात आला. त्याअंतर्गत भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र, खगोलभौतिकी, अवकाश विज्ञान, वातावरण विज्ञान, उपकरणशास्त्र, तंत्रज्ञान आणि इतर महत्त्वाच्या … Read more