पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाला आप घालणार घेराव

नवी दिल्ली  -आपने दिल्लीचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ व्यापक निदर्शनांचे सूतोवाच केले आहे. निदर्शनांचा भाग म्हणून २६ मार्चला पंतप्रधान निवासस्थानाला घेराव घातला जाणार आहे. उद्या (शनिवार) आपचे नेते, कार्यकर्ते आणि इंडिया आघाडीचे प्रतिनिधी दिल्लीत लोकशाही वाचवण्याची शपथ घेणार आहेत. दिल्लीतील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये २४ मार्चला आपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या … Read more

ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर यांच्या निवासस्थानी ईडीची कारवाई; नेमकं प्रकरण काय?

Ravindra Waikar   – शिवसेना ( ठाकरे गटाचे नेते ) आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी आज सकाळी १० च्या सुमारास  ईडीच्या पथकाने धाड टाकली. या पथकात १० ते १२ अधिकाऱ्यांचा समावेश होता.  मिळलेल्या माहितीनुसार  जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडीनं रवींद्र वायकर यांच्या घरी झाडाझडती सुरू केली आहे. तसेच, वायकरांशी संबंधित सात ठिकाण्यांवर ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. … Read more

सातारा – सरपंच अभंग यांच्या निवासस्थानी केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांची भेट

विडणी – विडणी, ता. फलटण गावचे सरपंच सागर अभंग व अवर सचिव धीरज अभंग यांच्या निवासस्थानी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा व माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सदिच्छा भेट दिली. आपला संकल्प विकसित भारत या कार्यक्रमानिमित्त विडणी येथे केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे आले होते. … Read more

पुणे जिल्हा : सहकारमंत्र्यांच्या निवासस्थानी बंदोबस्त

“पूजन’ संपर्क कार्यालयावरही खबरदारी मंचर – सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मंचर (ता. आंबेगाव) येथील “मल्हार’ निवासस्थानी आणि संपर्क कार्यालय “पूजन’ येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून मंचर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. लोकप्रतिनिधी आणि काही राजकीय नेत्यांनी मराठा आंदोलनाबाबत चुकीचे वक्तव्य केल्याने त्यांची निवासस्थानी आणि कार्यालयांची फोडतोड करण्यात आली आहे, त्यामुळे खबरदारीची उपायोजना म्हणून … Read more

केजरीवाल यांच्या निवासस्थानाचे कॅग करणार ऑडिट

नूतनीकरणात आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप ; आप आणि भाजपमध्ये जुंपली नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारी निवासस्थानाच्या नूतनीकरणात मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता झाल्याचे आरोप करण्यात आले. त्यावरून केंद्र सरकारने नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांमार्फत (कॅग) विशेष ऑडिट (हिशेब तपासणी) करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे आप आणि भाजपमधील शाब्दिक युद्धाला नव्याने तोंड फुटले … Read more

पश्चिम बंगालमध्ये टीएमसी नेत्याच्या घरी बॉम्बस्फोट; दुर्घटनेत दोघांचा मृत्यू

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये टीएमसी नेत्याच्या घरी रात्री उशिरा बॉम्बस्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अद्याप मृतदेहांची ओळख पटलेली नसल्यचे पोलिसांनी म्हटले आहे. मेदिनीपूरच्या भूपती नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अर्जुन नगर भागात ही घटना घडली, असे पोलिसांनी सांगितले. येथे राहणारे टीएमसी बूथ … Read more

धक्कादायक! जळगावच्या महापौरांच्या निवासस्थानावर पेटत्या सुतळी बॉम्बसह दगडफेक

जळगाव : जळगाव जिल्ह्यात सर्वत्र गणेश विसर्जन शांततेत पार पडत असताना शुक्रवारी रात्री शहरातील मेहरुण परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. मेहरुण परिसरातील महापौर जयश्री महाजन यांच्या घरावर पेटत्या सुटली बॉम्बसह दगफेक विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्या निवासस्थानावर एका सार्वजनिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विसर्जन मिरवणुकीदरम्यान फटाके, गुलाल उधळत दगडफेक केली. त्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले … Read more

मागील सहा महिन्यांत सदावर्तेंच्या निवासस्थानी मॅरेथॉन बैठकांचे सत्र; धक्कादायक महिती समोर

मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थान असलेल्या “सिव्हर ओक’ घरावरील हल्ल्या संदर्भात ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्या निवासस्थानी 6 महिन्यांपासून मॅरेथॉन बैठका होत होत्या, अशी माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. यावरून या बैठकांचे कारण काय असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याचा कट रचण्यासाठी ही बैठक आयोजित केली होती … Read more

Big Breaking: अजित डोवाल यांच्या घरात घुसखोरीचा प्रयत्न; घुसखोरी करणारा म्हणाला,“माझ्या शरिरात चीप…मला कंट्रोल केलं जातंय”

नवी दिल्ली : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि भारतीय गुप्तचर यंत्रणेचे सर्वोच्च अधिकारी अजित डोवाल यांच्या सुरक्षेसंदर्भात सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.  आज सकाळी एका अज्ञात व्यक्तीने कारसहीत अजित डोवाल यांच्या सरकारी बंगल्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यन, या सर्व गोंधळाच्या परिस्थितीमध्ये बंगल्याच्या सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान दाखवत या व्यक्तीला रोखले आणि … Read more

शिवसेना खासदार संजय राऊत शरद पवार यांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई : आजच्या दिवसभरातील मोठी बातमी आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी  आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. संजय राऊत हे पवारांना भेटण्यासाठी त्यांच्या मुंबईतील ‘सिलव्हर ओक’ या निवासस्थानी गेले होते. ही एक सदिच्छा भेट असल्याचे म्हटले जात  आहे. मात्र या भेटीच्या बातमीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राज्यामध्ये सत्तेत … Read more