पुणे : डायटच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या वेतनाचा तिढा मिटणार

पुणे : राज्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थामधील (डायट) अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन अदा करण्यासाठी पदे अनिवार्य खर्च लेखाशीर्षामध्ये समाविष्ट करण्यास व त्याकरिता लेखाशीर्षाखाली आर्थिक तरतूद करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे अधिकारी व कर्मचारी यांच्या नियमित वेतनाबाबतचा तिढा मिटणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, १९८६ मध्ये शिक्षकांच्या प्रशिक्षणांना प्राधान्य देण्यात आल्याने केंद्र शासनाने देशातील … Read more

सातारा : लोणंदच्या वाहतूक कोंडीचे ” ग्रहण ” सुटणार तरी कधी ?

प्रशांत ढावरे लोणंद – –लोणंदच्या वाहतूक कोंडीचे ग्रहण सुटणार तरी कधी ? असा संतप्त सवाल लोणंदकरांना गेल्या अनेक वर्षांपासून पडलेला आहे. लोणंदमधील वाहतूक कोंडीची समस्या हे नित्याचे दुखणे झालेले आहे. कोंडी सोडवण्यासाठी लोणंदमधे सम विषम पार्किंग व्यवस्था लवकरात लवकर लागू करणे आवश्यक असून त्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी नागरिक, व्यापारी करत आहेत. लोणंद पोलीस स्टेशनच्या … Read more

पुणे जिल्हा : पिण्याचे पाणी, वाहतूक कोंडी सुटणार कधी?

वाघोलीकरांचा प्रश्‍न : वाढत्या नागरीकरणाला सुविधा पुरवण्यास प्रशासनाची कसरत वाघोली  – वाघोली मधील समस्या सोडवण्यासाठी वाघोलीकर चर्चा, भेटीगाठी, निवेदने, आंदोलने करून देखील समस्यांना प्रशासनाकडून वारंवार देण्यात आलेल्या पोकळ आश्‍वासनांनी वाघोलीच्या समस्या सुटणार का, असा प्रश्‍न ग्रामस्थांकडून केला जात आहे. वाघोलीमध्ये गेल्या 4 ते 5 वर्षांत अनेक छोटे-मोठे गृहप्रकल्प पूर्ण होऊन वाघोलीच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ झालेली … Read more

वाहन क्षेत्रातील मंदी निवळली

  मुंबई, दि. 2- करोनामुळे वाहन विक्रीवर परिणाम झाला होता. त्यानंतर सेमीकंडक्‍टर आणि इतर सुट्या भागाच्या तुटवड्याचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आता हे प्रश्न संपुष्टात येत असून वाहन कंपन्यांच्या विक्रीत वेगाने वाढ होत आहे. जुलै महिन्यामध्ये वाहन कंपनीच्या विक्रीत भरमसाठ वाढ झाली असल्याची आकडेवारी या कंपन्यांनी जारी केली आहे. मारुती सुझुकी कंपनीची वाहन विक्री … Read more

एसटी महामंडळाच्या 93 हजार कर्मचाऱ्यांचा प्रलंबित वेतनाचा प्रश्न सुटणार

मुंबई  : परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाकडून एसटी महामंडळाला मानव विकास कार्यक्रमातंर्गत दुसऱ्या टप्प्यातील 231 कोटी 30 लाख रूपयांचा निधी मिळणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय 12 ऑक्टोबर, 2021 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे एसटी महामंडळाच्या 93 हजार कर्मचाऱ्यांचा प्रलंबित वेतनाचा प्रश्न सुटणार … Read more

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी कोरोनामुक्त गावाचा संकल्प करावा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : दुसऱ्या लाटेचा आपण चांगला मुकाबला केला असला तरी कोविडचे आव्हान कायम आहे. तिसरी लाट रोखण्यासाठी आपण कोविडमुक्त गावाचा संकल्प करून देशासाठी एक उत्तम उदहारण घालून द्या, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. आज मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला समाजमाध्यमाद्वारे थेट संबोधित केले त्यावेळी ते बोलत होते त्यांनी चांगली कामगिरी करून कोविडमुक्त गाव करणाऱ्या … Read more

सांगली | धनगरवाडा येथील शेतकऱ्यांच्या जमिनीचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार…

सांगली  : वन विभागाकडून विनोबा ग्राम संस्थेस शिराळा तालुक्यातील धनगरवाडा येथील वेळोवेळी हस्तांतरित करण्यात आलेल्या जमिनी या वाटप केलेल्या शेतकऱ्यांच्या नावे लागण्या संदर्भात शेतकऱ्यांची मागणी बऱ्याच काळापासून प्रलंबित आहे. या अनुषंगाने गावठाणासाठी देण्यात आलेली जमीन व शेती कसण्यासाठी देण्यात आलेली जमीन सातबारावर शेतकऱ्यांची नावे लागली आहेत. गट नं 221 अ चे क्षेत्र 166 एकरच्या बाबतीत … Read more

श्रीगोंदा-जामखेड राष्ट्रीय महामार्गाचाही प्रश्न मार्गी

जामखेड : जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाचा असलेल्या न्हावरा-इनामगाव-काष्टी-श्रीगोंदा-जळगाव-जामखेड (राज्यमार्ग-55) या राज्यमार्गाला आता राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त झाला आहे. आता हा राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्ग 548(ड) म्हणून नव्याने मंजुर झाला असुन (सेक्शन-2) आढळगाव ते जामखेड या  62.775 कि.मी. दुपदरी महामार्गाच्या कामाची इ-निविदा नुकतीच जाहीर झाली असल्याने राष्ट्रवादीचे युवा नेते आ.रोहित पवार पुन्हा एकदा ‘पॉवरफुल’ ठरले आहेत. पंधरा दिवसांपुर्वीच … Read more

पोलीस ‘या’ व्हॉट्सॲप क्रमांकावरून करणार शंकाचे समाधान

पुणे : शहरात सध्या संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र या  संचारबंदी विषयी  नागरिकांच्या अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. याच शंकांचे निरसन आता पुणे पोलीस करणार आहेत. पोलीस आयुक्तांच्या कलम 144 आदेशाबद्दल तसेच वाहन विषयक आदेशाबद्दल नागरिकांच्या शंकांना उत्तर देण्यासाठी आणि विनंतीला प्रतिसाद देण्यासाठी पुणे पोलिसांनी खालील चार व्हाट्सॲप क्रमांक निर्धारित केले आहेत. 9145003100, 8975283100, … Read more