पुणे जिल्हा : जल जीवन हा विचार भविष्यात जबाबदारीचा – आढळराव पाटील

वाघोली भागात प्रचार दौरा महावीर जयंतीच्या शोभायात्रेत जैनधर्मियांना दिल्या शुभेच्छा वाघोली  – जल जीवन हा विचार भविष्यात जबाबदारीचा ठरणार आहे. जलसंवर्धन, पाणी बचत, वृक्षारोपण आणि संगोपन हे आपले आद्य कर्तव्य ठरणार असल्याचे प्रतिपादन महायुतीचे शिरुरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांच्या वाघोली दौऱ्यात नागरिकांशी संवाद साधताना केले. वाढत्या शहरीकरणामुळे जलस्त्रोतांवर ताण येत आहे. पाण्याचे प्रश्न आणि ड्रेनेज, … Read more

मॉस्कोतील दहशतवादी हल्ल्यातील मृतांची संख्या ९३; इस्लामिक स्टेट खोरसानने स्वीकारली जबाबदारी

मॉस्को – रशियाची राजधानी मॉस्को येथे काल झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी ११ संशयितांना ताब्यात घेतले आहे. मॉस्कोमधील एका संगीत समारंभामध्ये ४ सशस्त्र दहशतवाद्यांनी घुसून बेछुट गोळीबार केला होता. या भीषण दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्यांची संख्या आता ९३ पर्यंत पोचली आहे. रशियाच्या फेडरल सिक्युरीटी सर्व्हिसच्या प्रमुखांनी अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांना आज याबाबतची माहीती दिली. दहशतवादी … Read more

नगर – शहरात सर्वेक्षणाचा गोंधळ सुरु; पहिली पास कर्मचाऱ्यांवर सोपविली सर्वेक्षणाची जबाबदारी

नगर – देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या कोट्यावधी मराठा समाज बांधवांना सध्या एकच अपेक्षा आहे. ती म्हणजे समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावं. मागासवर्गीय आयोगाच्या आदेशानुसार मंगळवारपासून जिल्ह्यात मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण सुरू झाले. नगर शहरात महापालिकेने पहिली पास असलेल्या व कधीं शाळेत न गेलेल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. चतुर्थ श्रेणीत काम करणाऱ्या शिपाई, बिगारी, सुरक्षा रक्षक … Read more

कृषिमंत्री धनंजय मुंडेंनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या 4 मुलींच्या शिक्षणाची घेतली जबाबदारी

यवतमाळ | यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या 4 मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. तसेच उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी यांना फोन लावून आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबांना तात्काळ अर्थसहाय्याची मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. सविस्तर माहिती अशी की, कृषिमंत्री धनंजय मुंडे हे शुक्रवारी यवतमाळ दौऱ्यावर होते. यवतमाळ जिल्ह्यातील मनोज राठोड व … Read more

आमदार थोपटे यांच्यावर लातूरची जबाबदारी ; प्रदेश कॉंग्रेसच्या बैठकीत पक्षनिरीक्षकपदी निवड

भोर – महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीतर्फे लातूर लोकसभा मतदारसंघाचे पक्ष निरीक्षक म्हणून भोर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संग्राम थोपटे यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. लातूर येथील प्रदेश कॉंग्रेसची स्वानंद मंगल कार्यालयाच्या सभागृहात बैठक झाली. यावेळी आमदार संग्राम थोपटे यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यावेळी आमदार संग्राम थोपटे यांचा लातूर कॉंग्रेसतर्फे सन्मान करण्यात आला. बैठकीत लातूर लोकसभा … Read more

‘दादा’ची IPL मध्ये पुन्हा एंट्री ! ‘या’ टीमसाठी स्वीकारली मोठी जबाबदारी

नवी दिल्ली – आयपीएल सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. अशात सर्व संघ आपली रणनीती ठरवत आहेत. या सगळ्यात दिल्ली कॅपिटल्सने मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीने ऋषभ पंतच्या जागी डेव्हिड वॉर्नरला कर्णधारपद दिले आले. यासोबतच दिल्लीच्या टीमने एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. ज्यामुळे भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचे चाहते चांगलेच खुश झाले आहेत. … Read more

खलिस्तानी दहशतवादी हरविंदर रिंडाचा पाकिस्तानात मृत्यू; सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातही आले होते नाव समोर

लाहोर : मोस्ट वॉन्टेड खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंह रिंडा याचा पाकिस्तानात मृत्यू झाल्याची माहिती समोर येत येत आहे. त्याच्या मृत्यूची माहिती पंजाब पोलिसांमधील सूत्रांनी दिली आहे. अनेक दहशतवादी कारवायांमध्ये रिंडा सामील होता. रिंडाची पाकिस्तानात गोळ्या घालून हत्या केल्याचा दावा दविंदर भांबिहा या गुन्हेगारी टोळीने सोशल मीडियावर केला आहे. मे महिन्यात पंजाब पोलीस गुप्तचर मुख्यालयावर ‘रॉकेट … Read more

सोलापूरची जबाबदारी पुन्हा “मामां’कडे

जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सांभाळल्याने पक्षाकडून संधी ः बैठका, कार्यक्रमांचा सिलसिला इंदापूर – महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे आमदार दत्तात्रय भरणे हे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अनेक चांगल्या – वाईट चर्चेमध्ये सातत्याने राहिले; मात्र ज्या ठिकाणी आमदार दत्तात्रय भरणे काम करतात. ते नागरिक, तो भाग कधीही भरणे यांना विसरू शकत नाही. तीच किमिया करत सोलापूरकरांच्या मनात … Read more

पुणे : अवयव प्रत्यारोपण कागदपत्र पडताळणी, खासगी रुग्णालयांचीही ‘जबाबदारी’

पुणे- अवयव प्रत्यारोपण करण्यासाठी सादर केल्या जाणाऱ्या कागदपत्रांची पडताळणी संबंधित खासगी रुग्णालयांनीही करणे आवश्‍यक आहे, असे निर्देश देऊन वैद्यकीय शिक्षण विभागाने खासगी रुग्णालयांची जबाबदारी निश्‍चित केली आहे. शहरात गाजत असलेल्या किडनी रॅकेट प्रकरणांवरून हा निर्णय घेण्यात आला आहे. अवयव प्रत्यारोपण करायचे असेल तर खासगी रुग्णालयाकडून जी कागदपत्रे विभागीय प्रत्यारोपण समितीकडे पाठवली जातात तीच मुळात अपुरी … Read more

“भाजपचे स्थानिक नेते कमी पडतात म्हणून फडणवीसांवर नगर जिल्ह्याची जबाबदारी”; रोहित पवारांची राम शिंदेंवर टीका

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील भाजपचे नेते इथले काम करण्यास कमी पडतात म्हणूनच भाजपने ‘मिशन- 2024’ अंतर्गत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नगर जिल्ह्याची जबाबदारी  दिली असल्याचे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी नाव न घेता माजी मंत्री राम शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडी स्थापन होऊन आता जवळपास अडीच वर्ष होत आली असताना भाजपने मिशन … Read more