पुणे जिल्हा : कारेगावातील तरुणाचा खून झाल्याचे उघड

रांजणगाव पोलिसांकडून आरोपीला बेड्या रांजणगाव गणपती – कारेगाव (ता. शिरुर) येथील फिनिक्‍स सिटीच्या प्लॉटिंगमधील ऑफिसचे शेडमध्ये प्लॉटिंगमध्येच झालेल्या तरूणाच्या मृत्यूप्रकरणाचा तपास घात झाल्याचे निष्पन्न झाल्याने रांजणगाव पोलिसांनी आरोपीला पुणे हडपसर येथून ताब्यात घेतले. कारेगाव येथे विठ्ठल केशव शेळके (वय 35, रा. मुंडेकरवाडी, जि. नगर) याचा मृतदेह (दि.5) आढळला. याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली … Read more

पुणे : ड्रग कंपनीची कार्यपद्धती पोलिसांना उलगडली

आठवड्याला तयार व्हायचे 30 ते 50 किलो मेफेड्रोन “ससून’मधील “ललित’कथा पुणे – ससून रुग्णालयातून पसार झालेल्या ड्रग माफिया ललित पाटीलच्या कंपनीची कार्यपद्धती पोलिसांनी उलगडली आहे. त्याच्या कंपनीत आठवड्याला 30 ते 50 किलो मेफेड्रोन तयार होत होते. याची आंतरराष्ट्रीय बाजारानुसार 30 ते 50 कोटी इतकी किंमत होते. हे उत्पादन 2019 पासून सुुरू होते. कंपनीत उत्पादनाचे काम … Read more

संजय गायकवाडांनी बावनकुळेंना सुनावले,’कोण काय म्हणतं त्याला महत्व नाही, आम्ही 125 ते 130 जागा लढवणार’

मुंबई : आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा शिवसेनेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्यचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका कार्यक्रमा दरम्यान म्हटले होते. परंतु, त्यांच्या या विधानावर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया आल्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासोबतच ज्या कार्यक्रमात ते बोलले होते तो एक व्हिडीओही डिलीट केला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हणाले होते … Read more

आगामी विधानसभा जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळे अगोदर म्हणाले,”भाजप २४० जागा लढवणार” अन् नंतर केली सारवासारव

मुंबई : आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा शिवसेनेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्यचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका कार्यक्रमा दरम्यान म्हटले होते. परंतु, त्यांच्या या विधानावर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया आल्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासोबतच ज्या कार्यक्रमात ते बोलले होते तो एक व्हिडीओही डिलीट केला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी,”आगामी विधानसभा … Read more

नेदरलँडमध्ये खजिन्याचा शोध सुरू; नाझी सैनिकांनी लपवलेल्या खजिन्याचा नकाशा जाहीर

ओमेरेन : लपवलेल्या खजिन्याचे सर्वांनाच आकर्षण असते आणि या खजिन्याबाबत जर एखादे कागदपत्र किंवा नकाशा उपलब्ध झाला तर या खजिनाचा शोधही सुरू होतो. सध्या नेदरलँडमधील एका छोट्या शहरामध्ये अशाच प्रकारे खजिन्याचा शोध सुरू झाला आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या कालावधीमध्ये जर्मनीच्या नाझी सैनिकांनी ज्या ठिकाणी खजिना लपवला होता त्या ठिकाणचा संभाव्य नकाशा प्रसिद्ध करण्यात आल्याने आता सर्वच … Read more

जुळ्या मुलांचे बाप मात्र वेगवेगळे; डीएनए टेस्टनंतर मामला झाला उघड

ब्राझीलिया : एखाद्या महिलेने जुळ्या मुलांना जन्म देणे जरी दुर्मिळ गोष्ट नसली तरी या जुळ्या मुलांचे पिता वेगळे असल्याची घटना मात्र दुर्मिळ मानण्यात येते. ब्राझीलमध्ये अशीच एक घटना उघडकीस आली आहे. महिलेने आपल्या जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर आठ महिन्यानी जी डीएनए टेस्ट करण्यात आली त्यामध्ये या दोन्ही मुलांचे वडील वेगवेगळे असल्याचे लक्षात आले. अशी घटना … Read more

व्यंगचित्रकार पराडकर यांनी उलगडली रेषांची भाषा

  प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 1 – व्रत म्हणून व्यंगचित्र काढत आलो आहे. व्यंगचित्रकाराकडे जादूचा चष्मा असतो, तो माझ्याकडेही आहे. त्यामुळे मला व्यक्तीच्या मागील बाजूही दिसते, ती विनोदाची असते. प्रत्येक व्यंगचित्रकाराची शैली वेगळी, अनाकलनीय असते. शब्दांसह, शब्दविरहित असे चित्रांचे प्रकार असले तरी त्यात तुलना होऊ शकत नाही. आशय व्यक्त होण्यासाठी शब्दांची आवश्‍यकता असते, चित्राखाली ओळ … Read more

धोनीच्या निवृत्तीच्या निर्णयाने धक्‍का, रवी शास्त्री यांनी केला खुलासा

मुंबई – महेंद्रसिंह धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय कोणालाही पुसटशी कल्पनाही न देता घेतला. त्याने ड्रेसिंगरूममध्ये आमची सर्व खेळाडूंशी चर्चा सुरू होती तेव्हाच त्याने अचानक आपला निर्णय सर्वांना सांगितला. त्याच्या या निर्णयामुळे माझ्यासह सगळ्यांनाच धक्‍का बसला, असा खुलासा भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केला आहे. त्यांचा बीसीसीआयशी असलेला करार संपल्यावर आता … Read more

इस्लामपूर : खुनाच्या बदल्यात केला खून…

इस्लामपूर (प्रतिनिधी) : भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी तुजारपूर येथील अर्जुन प्रल्हाद बाबर याने भाच्याच्या मदतीने अक्षय उर्फ तुकाराम अशोक भोसलेचा निर्घृणपणे खून केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. खून प्रकरणी मृत अक्षयचा मित्र मदन संभाजी कदम ( वय ३५ रा. कि.म गड ता. वाळवा) याला पोलिसांनी अटक केली आहे. मुख्य संशयित अर्जुन बाबर सह त्याचा … Read more

पुणे : पासोड्या विठोबा मंदिर चोरी प्रकरण उघडकीस…

पुणे(प्रतिनिधी) – बुधवार पेठेतील पासोड्या विठोबा मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रक्कम चोरल्याप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. गुन्ह्यातील त्याचा साथीदार मात्र फरार झाला आहे. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली होती. या प्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत आरोपीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार ताब्यात घेतलेला … Read more