पुणे | तापमानाच्या चढत्या पाऱ्यामुळे उष्माघाताचे संकट

पुणे, {सागर येवले} – शहरातील उष्णतेच्या पाऱ्याने उच्चांक गाठल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. सकाळी दहा वाजल्यापासूनच उन्हाचा चटका जाणवत असून, दुपारचा चटका तर असह्य करणारा आहे. त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढला असून, नागरिकांनी दुपारी घराबाहेर पडणे टाळावे, उष्माघाताची लक्षणे दिसताच तात्काळ उपचार घ्यावेत, असे आवाहन हवामान विभाग आणि डाॅक्टरांकडून करण्यात आले आहे. अनेक वर्षानंतर पुणे शहरासह … Read more

पिंपरी | वाढत्‍या तापमानामुळे सुती रुमाला, टोपी आणि गॉगल्सला मागणी

पिंपरी, (प्रतिनिधी) – शहरातील तापमानाचा पारा चाळीशी पार गेल्‍याने, उन्हापासून स्वताचा बचाव करण्यासाठी शहरात पांढऱ्या रंगाच्या सुती रुमालाला, मागणी वाढली आहे. केवळ रुमालच नाही तर टोपीची आणि गॉगल्सला देखील मागणी ग्राहकांकडून होत असल्याचे दिसत आहे. दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असल्याने उष्णतेपासून बचाव होण्यासाठी नागरिक टोपी, गॉगल्स, स्कार्प आदी वस्तूंची खरेदी करताना दिसून येत आहेत. त्यामुळे … Read more

संशोधन: वाढत्या तापमानामुळे गाईंच्या दूध देण्याच्या क्षमतेत 35 टक्के घट

वॉशिंग्टन – हवामानातील बदल त्यातही तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याच्या परिस्थितीचा परिणाम फक्त मानवजातीवरच होत आहे असे नाही तर या बदलाचा परिणाम जनावरांनाही सहन करावा लागत आहे. नुकत्याच झालेल्या एका संशोधनाप्रमाणे तापमान वाढीचा फटका जनावरांना बसत असून गाईंच्या दूध देण्याच्या क्षमतेत त्यामुळे 35% घट होत आहे. तसेच आफ्रिका खंडातील हत्तींच्या मृत्यूचे प्रमाणही तापमान वाढीमुळे … Read more

वाढत्या तापमानामुळे पाणीसाठ्यात सतत घट; राज्यावर पाणीटंचाईचेही संकट

मुंबई – राज्यात आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक हैराण आहेत. अशात राज्यावर पाणी टंचाईचे संकट उभे राहिले आहे. सतत वाढणाऱ्या विक्रमी उष्णतेमुळे धरणांतील 27 टक्के पाणीसाठी आटला आहे. यामुळे नागरिकांना वापरासाठी आता केवळ 44 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मुंबईतील धरणांमध्ये 27 टक्के, तर ठाणे जिल्ह्यातील धरणांमध्ये 45 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. वाढत्या तापमानामुळे पाणीसाठ्यात सतत घट … Read more

वाढत्या तापमानामुळे ‘या’ आरोग्य समस्यांचा धोकाही वाढतो! ‘हे’ सोपे उपाय करून सुरक्षित रहा

देशभरात उन्हाळा सुरू झाला आहे. विविध प्रकारची हंगामी फळे आणि भाज्या या ऋतूला नक्कीच खास बनवतात, परंतु तापमानात वाढ झाल्यामुळे अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांचा धोकाही अनेक पटींनी वाढतो. उन्हाळ्यात कडक उन्हामुळे शरीरातून पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होऊ लागते, याशिवाय घाम येणे आणि कडक उन्हामुळे शरीरावर अनेक नकारात्मक परिणाम होण्याचा धोका असतो. या ऋतूमध्ये प्रत्येकाने आरोग्याबाबत … Read more