पिंपरी | मावळ तालुक्यातील रस्त्यांची वाट बिकट

मावळ – मावळ तालुक्यातील अनेक रस्त्यांची वाट बिकट झालेली असून ठिकठिकाणी खोदकाम, अर्धवट रस्ते केलेले असल्याने या पावसाळ्यातही ग्रामस्थांना चिखल तुडवावा लागणार आहे. दमदार पावसाला सुरवात होण्यापूर्वी गावांतील रस्त्यांची दुरुस्ती, डागडुजी करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. मावळ तालुक्यातील अनेक गावांमध्ये अद्यापही चांगले रस्ते नाहीत. अनेक ठिकणी माती, खडी, मुरूम टाकलेले रस्ते आहेत. त्यातूनच ग्रामस्थांना वाट … Read more

दुबई झाली तुंबई ! वर्षभराचा पाऊस एका दिवसात पडला; विमानतळ, रस्ते, मॉल्समध्ये पाणीच पाणी…

Rain in Dubai । UAE Flood – संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या जोडीने आता वादळानेही थैमान घातले आहे. या वादळी पावसामुळे आगोदरच विसकळीत झालेल्या अमिरातीचे दैनंदिन व्यवहार आता पूर्णपणे खंडीत झाले. रस्त्यांना नदीचे रुप प्राप्त झाले आहे. तर दुबईचा आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील पाण्याखाली गेला आहे. रस्ते आणि रेल्वेमार्ग पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक व्यवस्ता पूर्ण कोलमडली … Read more

पुणे जिल्हा | कनेसरमधील मूलभूत सुविधांची लवकरच पूर्तता

दावडी, (वार्ताहर) – खेड तालुक्यातील कनेसर गावात पावसाळ्यापूर्वी सर्व डागडुजी केली जाईल. तसेच गावातील मूलभूत सुविधांच्या कामातील त्रुटींबाबत वरिष्ठांकडे अहवाल दिला जाईल आणि त्याची पूर्तता त्वरीत केली जाईल, असे आश्‍वासन एमआयडीसी व खेड सिटीच्या ग्रामस्थांना देण्यात आले. कनेरसर येथील सरपंच सुनीता केदारी व ग्रामस्थांनी एमआयडीसी कार्यालय पुणे येथे आंदोलन केल्यामुळे उपजिल्हाधिकारी तथा प्रादेशिक अधिकारी डॉ.अर्चना … Read more

PUNE: सुशोभीकरणावरील निधी झाडीझुडपात; कात्रज चौक परिसरातील रस्ते स्वच्छतेअभावी विद्रूप

कात्रज – दक्षिण पुण्याचेद्वार असलेल्या कात्रजकडून पुणे शहरांमध्ये प्रवेश करताना कात्रज चौकापासून पुढे रस्त्याच्या दुतर्फा महापालिकेतर्फे करण्यात आलेल्या पदपथ व सायकल ट्रॅक आणि त्याच्या बाजूला सुशोभीकरणासाठी लावण्यात आलेल्या शोवभिवंत झाडांमध्ये गवत व इतर झुडपे वाढल्याने रस्त्याची दुतर्फा बाजू विद्रूप दिसत आहे. याकडे महापालिकेच्या छाटणी विभागाचे दुर्लक्ष असल्याने येथे लावण्यात आलेली शोभेची झाडे करपून गेली आहेत. स्वारगेट-सातारा … Read more

सातारा – कोरेगाव मतदारसंघातील अंतर्गत रस्ते होणार चकाचक

कोरेगाव  – आमदार महेश शिंदे यांनी रस्ते मार्गाने संपूर्ण मतदारसंघाचा विकास करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सातारा आणि कोरेगाव तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्यादृष्टीने अत्यंत महत्वाचे असलेले रस्ते आता चकाचक होणार असून, त्यासाठी 25 कोटी 15 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून प्रत्यक्षात कामाला आता सुरुवात होणार आहे. कोरेगाव तालुक्‍यातील अनेक रस्त्यांवरुन … Read more

अहमदनगर – महसूल भवनाचे आज विखे पाटील यांच्या हस्ते भूमीपूजन

अहमदनगर – महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकासमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते नगर येथे महसूल भवन इमारतीच्या भूमिपूजन समारंभ उद्या (शनिवारी) आयोजित करण्यात आला आहे. अध्यक्षस्थानी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले हे असतील. यावेळी आ. बबनराव पाचपुते, आ. मोनिका राजळे, आ. प्रा.राम शिंदे, आ. संग्राम जगताप उपस्थित राहणार आहे. 47 कोटी 86 लाख … Read more

पुणे जिल्हा : आंबेगावमध्ये रस्त्यांना डबक्‍यांचे स्वरूप

पारगाव शिंगवे – आंबेगाव तालुक्‍यातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या अनेक गावांमधील रस्त्यांना मोठमोठे खड्डे पडलेले असून, या खड्ड्यांमुळे रस्त्यांना डबक्‍याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यामुळे नागरिकांसह प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. निरगुडसर, पिंपळगाव ते मंचर हा आंबेगाव तालुक्‍यातील रस्ता, तसेच पूर्वभागातील रांजणी, वळती ते शिंगवे ते पिंपरखेड ते शिंगवे ते पारगाव ते लाखणगाव ते … Read more

पुणे जिल्हा : अवसरी बुद्रुक येथे नाले, रस्ते गेले वाहून

गेल्या आठवड्यातील पावसामुळे नागरिकाचे हाल ः दूध संचालकांनी केली पाहणी अवसरी – अवसरी बुद्रुक आणि परिसरात गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गावातील अनेक वाडी-वस्तीवरील रस्ते, नाले वाहून गेले आहेत, त्यामुळे नागरिकांना दूध, तरकरी, जनावरांचा चारा शेतातून बाहेर काढणे अवघड झाले आहे. या सर्व रस्त्यांच्या दुरवस्थेची पाहणी पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक विष्णूकाका हिंगे यांनी केली. … Read more

पुणे : महापालिका आर्थिक संकटात? ; वेतनाचा निधी रस्त्यासाठी वापरणार

पुणे : कात्रज- कोंढवा रस्त्याच्या रूंदीकरणासाठी राज्यशासनाकडून अद्याप 200 कोटींचा निधी मिळालेला नसल्याने या रस्त्याचे भूसंपादन रखडले आहे. त्यामुळे, तातडीनं हे भूसंपादन मार्गी लावण्यासाठी महापालिकेने चक्क महसूली निधी भांडवली कामासाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी, पालिका कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या फरकासाठी ठेवण्यात आलेल्या निधीचा वापर केला जाणार असून या निधीतून 30 कोटी रूपये कात्रज- … Read more

आदर्श रस्त्यांसाठी ‘रोड मार्शल’ची गस्त; अतिक्रमणे आणि प्रतिबंधात्मक कारवाई करण्यावर भर

पुणे – शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासह अतिक्रमणे, रस्त्यांची दुरवस्था रोखण्यासाठी आता महापालिका प्रमुख 15 रस्त्यांसाठी “रोड मार्शल’ नेमणार आहे. वाहतूक पोलीस, अतिक्रमण निरीक्षक, महापालिकेचा सुरक्षारक्षक तसेच तातडीच्या कामांसाठी मदतनीस (बिगारी) यांचा यात समावेश असेल. तसेच या पथकाला स्वतंत्र वाहन दिले जाणार असून, संपूर्ण दिवसभर त्यांनी नेमून दिलेल्या रस्त्यावर वर्दळीच्या वेळी गस्त आणि प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची … Read more