रस्त्यांवर वाहने झाली उदंड… खासगी वाहनांची संख्या 36 लाखांच्या घरात; प्रदूषण आणि कोंडीतही वाढ

पुणे – सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याने शहरातील खासगी वाहनांची संख्या 2022 मध्ये दुपटीने वाढली आहे. परिणामी, जून 2023अखेर शहरातील खासगी वाहनांचा आकडा तब्बल 35 लाख 94 हजार झाला आहे. महापालिकेच्या पर्यावरण अहवालातून ही बाब समोर आली आहे. 2021 मध्ये शहरात 1 लाख 69 हजार 552 नवीन वाहनांची खरेदी झाली. तर 2022 मध्ये 2 लाख … Read more

रस्ते आणि शाळांसाठी सव्वादोन कोटींचा निधी

सणबूर  -महाराष्ट्र खनिज विकास निधी अंतर्गत प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेतून पाटण मतदारसंघातील रस्ते व जिल्हा परिषद शाळेतील कामांसाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी राज्याचे खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे निधीची मागणी केली होती. त्यानुसार 2 कोटी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती ना. देसाई यांच्यावतीने प्रसिध्दीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे … Read more

संगमनेरमधील रस्ते घेतात मोकळा श्‍वास; आता कत्तलखानेही होणार भुईसपाट?

अमोल मतकर संगमनेर – शहरातील जोर्वे नाका परिसरात झालेल्या किरकोळ वादामुळे दोन समाजात दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाने दुसऱ्याच दिवशी भांडणाचे मूळ असलेले रस्त्यावरील अतिक्रमण काढून टाकले. त्यामुळे शहरातील इतर भागात असलेले अतिक्रमानधारक कारवाई करण्याआधीच निघून गेल्याने रस्त्यांनी मोकळा श्‍वास घेतला आहे. लवकरच कत्तलखान्यांवर ही कारवाई होऊन अनधिकृत बांधकाम … Read more

…तर एका खड्ड्याला एक लाख रुपये दंड – मुख्यमंत्री शिंदे

ठाणे :-  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी(दि. 22) ठाण्यातील नालेसफाई आणि रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई, रस्त्यांची कामे ही दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. कॉनवूड जंक्शन येथील चौक सुशोभीकरण व रस्त्याचे काम, पवार नगरमधील रस्त्यांची कामे, टिकुजीनी वाडी ते नीलकंठ रस्ता, घोडबंदर रोडवरील आनंद नगर येथील नाला, कोरम मॉल मागील … Read more

महामार्गावरील वृक्षांचे पुनर्रोपण करावे : सयाजी शिंदे

कराड – सध्या पुणे-बेंगलोर महामार्गाचे रुंदीकरण सुरू असून या कामादरम्यान जवळपास 7 हजार वटवृक्ष तोडण्यात आले आहेत. परंतु, या झाडांचे पुनर्रोपण करणे गरजेचे असून वाहगाव ता. कराड येथे यातील काही झाडांचे आपण पुनर्रोपण करणार असल्याची माहिती प्रसिद्ध चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे यांनी दिली. महामार्गावरून प्रवासात करताना मंगळवार दि. 14 रोजी त्यांनी महामार्गावरील विस्तारीकरणामध्ये तोडण्यात आलेल्या … Read more

साताऱ्यातील रस्त्यांची होणार दुरुस्ती

सातारा  – भुयारी गटार योजनेमुळे खराब झालेल्या रस्ता दुरुस्तीला पालिकेने मुहूर्त शोधला आहे. खुदाई पूर्ण झालेल्या शहराच्या पश्‍चिम भागातील रस्त्यांच्या दुरुस्ती प्रस्तावांना पालिकेने हिरवा कंदिल दिला आहे. पालिकेच्या कमिटी हॉलमध्ये मंगळवारी झालेल्या प्रशासकीय सभेत एकूण 63 विषयांना मंजुरी देण्यात आली आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी प्रशासक अभिजित बापट होते. अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या शाहू चौक ते बोगदा … Read more

पाटणमधील पाणंद रस्त्यांच्या कामांना मंजुरी

सणबूर  – पाटण मतदारसंघातील शेत/पाणंद रस्त्यांची प्रलंबित कामे तातडीने मार्गी लागण्यासाठी राज्य उत्पादन शुल्कमंत्री व सातारा, ठाणे जिल्हा पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी पाटण मतदारसंघातील 38 गावातील सुमारे 50 कि.मी. लांबीच्या शेत/पाणंद रस्त्यांची कामे ही राज्य शासनाने नव्याने सुरु केलेल्या मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजनेतून मंजूर होण्यासाठी रोजगार हमी मंत्री ना. संदिपान भुमरे यांचेकडे शिफारस … Read more

नेमबाजपटू रुचिरा लावंडची हेलिकॉप्टरने एन्ट्री

सातारा – सातारा जिल्ह्याची आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू रुचिरा लावंड हिने गुरुवारी स्वतःच्या विवाह सोहळ्यासाठी थेट हेलिकॉप्टर मधून अनोखी एन्ट्री केली. तिच्या या आगमन शैलीचे साऱ्यांनाच कौतुक वाटले. हा विवाह सोहळा कास पठार परिसरातील हेरिटेज वाडी या प्रशस्त हॉटेलच्या दालनात रंगला. या अनोख्या विवाह सोहळ्याची आणि रुचिराच्या ग्रॅंड एंट्री ची साताऱ्यात चर्चा चांगलीच रंगली होती. रुचिरा ही … Read more

विरोधाचे निवेदन देऊन नगरसेवक गायब

नगर – महापालिकेची महासभा सुरू असतांनाच विषयपत्रिकेवरील सावेडी दफनभूमी- स्मशानभूमीसाठी 32 कोटी रुपयांची चार एकर जागा खरेदीच्या विषयाला सत्ताधारी शिवसेनेसह काही नगरसेवकांनी विरोध करीत महापौरांना निवेदन दिली. मात्र प्रत्यक्षात महासभेत या विषयावर चर्चा करण्यासाठी अवघे 15 ते 20 नगरसेवक उपस्थित होते. त्यामुळे फारशी चर्चा न होताच हा वादग्रस्त विषय मंजूर करण्यात आला. ज्या नगरसेवकांनी विरोधात … Read more

अधिकारी नगरसेवकांना वेड्यात काढतात

महापालिकेच्या सभेत रस्ते, पाणी व आरोग्य विभागाचे वाभाडे नगर – राष्ट्रपुरुषांचे पुतळे उभारणे, शहरातील रस्ते, वारंवार विस्कळीत होणारा पाणीपुरवठा, फेज-2 पाणीयोजनेसह अमृत योजनेवरून आयुक्‍तांसह अधिकाऱ्यांना नगरसेवकांनी आज झालेल्या महापालिकेच्या महासभेत चांगलेच धारेवर धरले. आयुक्‍तांसह अधिकारी नगरसेवकांना वेड्यात काढतात, अशा शब्दात विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी वाभाडे काढले. पुलाचे कौतुक करता; पण त्याच पुलाखाली शहरातील रस्त्यांची … Read more