कराड जिल्ह्याच्या दृष्टीने विकासकामे केली

कराड  – मी राज्याचा मुख्यमंत्री असताना कराडसाठी हजारो कोटींचा निधी दिला. त्यामध्यामातून कराडला विविध प्रशासकीय कार्यालये, बस स्थानक, आरटीओ कार्यालय, रस्ते, विश्रामगृह आदी. मोठी कामे झाली. नवीन कराड जिल्हा निर्माण करण्याच्या दृष्टीने आवश्‍यक असणारी बहुतांश शासकीय कामे मार्गी लावली असून सर्वार्थाने कराडचे महत्व वाढवण्यासाठी प्रयत्न केला. तसेच भविष्याच्या दृष्टीने आणखीही काही कामे होणे आवश्‍यक असून … Read more

मुंबई पालिका क्षेत्रातील रस्ते काँक्रिटचे करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई  : मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व रस्त्यांचे टप्प्या टप्प्याने काँक्रीटीकरण करणार अशी माहिती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली. सदस्य अतुल भातखळकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, मुंबई शहरातील रस्त्यांवर दर पावसाळ्यात खड्डे पडतात. त्यांचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतो. … Read more

पुणे जिल्हा : राजगुरूनगरात समस्यांचा डोंगर; रस्त्यांची बिकट अवस्था

उपाययोजना करण्यात नगरपरिषदेला अपयश राजगुरूनगर – शहरातील विविध प्रश्‍न सोडवण्यात यावेत व नगरपरिषदेत नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याची मागणी जोर धरत आहे. राजगुरूनगरमध्ये रस्ता, पाणी व कचरा समस्या वाढल्या आहेत. वाहतूक कोंडी, अनधिकृत बांधकामे वाढली आहेत. दिवसागणिक शहरातील नागरिकांच्या समस्या वाढत आहेत नगरपरिषदेच्या माध्यमातून उपाय योजना केल्या जात नाहीत. राजगुरूनगर शहरातील रस्त्यांची बिकट अवस्था झाली आहे, … Read more

पुण्यात पाणी पिणारे रस्ते!

मनपा अभियंत्याच्या संकल्पना, मेहनतीचे मिळतेय फळ… तीन वर्षांत लाखो लिटर पाणी भूर्गभात ः उपक्रम आता शहरभर राबविणार सुनील राऊत पुणे – विकासकामांमुळे बेसुमार कॉंक्रिटीकरण झाले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याचे प्रमाण घटले आहे. हा जलसाठा वाढविण्यासाठी महापालिकेच्या पथ विभागाच्या कार्यकारी अभियंत्याने पुढाकार घेतला आहे. पावसाचे पाणी थेट जमिनीत मुरविण्यासाठी शहरातील काही प्रमुख रस्त्यांवर हा … Read more

नितीन गडकरींचा मोठा निर्णय ! पुणे जिल्ह्यातील ‘या’ दोन रस्त्यांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा

मुंबई : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग ज्योतिर्लिंग जोडणी प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील ‘खेड- भीमाशंकर’ या मार्गाप्रमाणेच ‘बनकर फाटा-तळेघर’ रस्त्यालाही नवीन राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. केंद्र शासनाच्यावतीने घेण्यात आलेल्या या निर्णयाची माहिती देणारा ट्विट संदेश गडकरी यांनी केला आहे. या निर्णयामुळे एकूण 66 कि.मी. लांबीच्या … Read more

पिंपरी: शहरातील डांबरी रस्त्यांची होणार चाचणी

चाचणीशिवाय रस्ते कॉंक्रिट नाही – आयुक्‍त राजेश पाटील यांचे धोरण पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करून रस्ते कॉंक्रीट केले जातात. मात्र अनेकदा डांबरी रस्ते सुस्थितीमध्ये असतानाही ते खोदून त्यावर सिमेंट कॉंक्रीट केले जाते. यामुळे विनाकारण खर्च होतो. मात्र आता शहरातील डांबरी रस्त्यांची फॉलिंग वेट डिफ्लेक्‍टोमीटर ही चाचणी केल्याशिवाय रस्ते कॉंक्रिट केले … Read more

पुणे : रस्ते, पूल, उड्डाणपुलांचे सुयोग्य नियोजन; वेळेत पूर्तता

पुणे- पुण्यातील रस्त्यांचा स्तर उंचाविण्यासाठी “अर्बन स्ट्रीट डिझाईन गाईडलाईन्स’नुसार रस्ते विकसित करण्यास गेल्या पाच वर्षांत सुरूवात झाली. पादचारी, दिव्यांग यांना केंद्रस्थानी ठेवत हे रस्ते तयार झाले. उड्डाणपुलांचे सुयोग्य नियोजन झाले. ठरलेल्या वेळी पूल पूर्णत्वास गेले. पायाभूत सुविधा विकसित करतानाच वस्ती भागातील तरुणांना कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी देण्यासाठी “लाईटहाऊस’ उपक्रम सुरू करण्यात आला. याविषयी महापालिकेतील … Read more

रस्त्यांसाठी छोट्या गुंतवणूकदारांकडून पैसे मिळवू – मंत्री नितिन गडकरी

मुंबई – देशातील रस्ते आणि महामार्ग उभारण्यासाठी प्रचंड गुंतवणूक लागणार आहे. मात्र या गुंतवणुकीसाठी परदेशी गुंतवणूकदारांच्या पैशाची फारशी गरज नाही. देशातील छोटे गुंतवणूकदार यासाठी पैसे देतील आणि याच पैशातून महामार्ग उभारले जातील असे रस्ते विकास मंत्री नितिन गडकरी यांनी म्हटले आहे. देशातील छोटे गुंतवणूकदार आठ टक्के व्याजदराने प्रत्येकी किमान एक लाख रुपये देऊ शकतील असा … Read more

नोटीसनंतरही वाहने न हटविल्यास जप्त करणार; आयुक्‍तांचा इशारा

पिंपरी  – रस्ते, पदपथ, उड्डाणपुलाखालील किंवा इतर ठिकाणच्या बंद अवस्थेतील, बेवारस, नादुरुस्त वाहने, त्यांचे सांगाडे काही वाहन मालकांनी स्वत:हून काढून घेतली आहेत. तर काही वाहने नोटीस बजावून देखील आहे त्याच ठिकाणी आहेत. नोटीस देऊनही जी वाहने हटवण्यात आली नाहीत, अशा वाहने तातडीने काढून न घेतल्यास जप्त करण्यात येणार आहेत, असा इशारा महापालिकेचे आयुक्त आयुक्त राजेश … Read more

…यामुळे हिमाचल प्रदेशातील तब्बल 685 मार्ग बंद

शिमला : हिमाचल प्रदेशात होत असलेल्या बर्फवृष्ठीमुळे संपुर्ण देशात गारठा पसरला आहे. याच बर्फवृष्ठीमुळे हिमाचल प्रदेशातील तीन राष्ट्रीय महामार्गांसहीत तब्बल 685 मार्ग बंद करण्यात आले होते. त्यात शिमला, लाहुल स्पिती, चंबा, किन्नौर, सिरमौर, सोलन या परिसरातील काही भागांचा समावेश आहे. तब्बल 685 मार्ग बंद असल्यामुळे स्थानिक नागरिकांची तारांबळ उडाली आहे. प्रशासनाकडून याबाबत संपुर्ण खबरदारी घेतली … Read more