पुणे | ट्रेनमध्ये चढताना तोल गेलेल्या प्रवाशाला जीवदान

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – फ्लॅटफाॅर्मवरून ट्रेन सुटली आणि एक प्रवासी पळत जाऊन ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यान, त्याचा तोल गेला आणि तो पडला. त्यावेळी आरपीएफच्या जवानाने तत्काळ प्रवाशाला बाजूला केल्यामुळे त्याचा जीव वाचला. जवानाच्या या सतर्कतेमुळे रेल्वे प्रशासनाकडून कौतुक करण्यात आले. बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. फ्लॅटफाॅर्म क्रमांक 3 वर ट्रेन क्रमांक … Read more

PUNE: महिनाभरात १२५ मुलांना पुन्हा मिळाली मायेची उब

पुणे – मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) “ऑपरेशन नन्हे फरिश्ते” अंतर्गत महिनाभरात रेल्वे स्टेशनवर पळून आलेल्या 125 मुलांना पुन्हा घराची उब मिळवून देण्यात आली आहे. त्यांचे समुपदेशन करत त्यांची पालकांसोबत पुन्हा भेट घडवून आणली. दरम्यान मागील आठ महिन्यांत मध्ये रेल्वे विभागातून 858 मुलांची सुटका करण्यात आली आहे. कुटुंबात किरकोळ भांडणामुळे किंवा काही कौटुंबिक समस्यांमुळे, … Read more

PUNE: फरार आरपीएफ हवालदाराच्या मुसक्या आवळल्या

पुणे  – अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या रेल्वे सुरक्षा दलातील (आरपीएफ) हवालदार अनिल पवार याला मंगळवारी अटक करण्यात आली. मागील दोन महिने तो पोलिसांना गुंगारा देत फरार होता. त्याच्या अटकेने आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. याप्रकरणी कमलेश तिवारी (रा. मूळ उत्तरप्रदेश) आणि एका महिलेला नोव्हेंबरमध्ये अटक करण्यात आली होती. मात्र, पवार फरार होता. तेव्हापासून … Read more

PUNE: ‘मिशन जीवन रक्षक’मध्ये बचावले ६६ जीव

पुणे – धावत्या रेल्वेत चढण्याच्या प्रयत्नात किंवा आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या रेल्वे प्रवाशांपैकी तब्बल ६६ जणांचे जीव आरपीएफ (रेल्वे सुरक्ष्ा दल) जवानांनी वाचवले आहेत. मध्य रेल्वेअंतर्गत पाच विभागांतील हे प्रमाण नुकतेच समोर आले. धावत्या ट्रेनमधून चढू नये किंवा उतरू नये, असे आवाहन वारंवार केले जाते. पण, बऱ्याचदा ट्रेन सुटण्याची भीती किंवा झालेला उशीर यामुळे प्रवासी धावतपळत … Read more

‘त्या’ आरपीएफ हवालदाराचे भलतेच कारनामे; आणखी काही मुलींवर अत्याचाराचा संशय

पुणे  -अल्पवयीन मुलीवर रेल्वे सुरक्षा दलातील (रेल्वे प्रोटेक्‍शन फोर्स) हवालदाराने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर लोहमार्ग पोलिसांकडून सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. यात या नराधम अनिल पवार याने आणखी काही मुलींवर अत्याचार केल्याचा संशय व्यक्‍त केला जात आहे. या प्रकरणात लोहमार्ग पोलिसांनी मंगळवारी एका महिलेसह दोघांना अटक केली. विशेष म्हणजे हवालदाराने रेल्वेच्या जागेत बेकायदा … Read more

काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ! धावती ट्रेन पकडण्याचा तरूणाने केला प्रयत्न, तेवढ्यात घसरला पाय आणि मग…

भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असते. पण कधी कधी काही घटना समोर येत राहतात. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) देखील तयार करण्यात आले आहे. आरपीएफने अनेकदा प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत. नुकतेच महाराष्ट्रात आरपीएफच्या जवानांनी ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका प्रवाशाचा जीव वाचवला आहे. वास्तविक, हा प्रवासी मुंबईच्या वसई रोड स्थानकावर धावती ट्रेन … Read more

Video : धावती ट्रेन पकडताना महिलेचा हात सुटला; RPF जवानानं देवदूत बनून वाचवला प्राण

हैद्राबाद – रेल्वे स्थानकावर अनेकजण धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करतात. यामुळे अनेकदा अपघात होण्याची दाट शक्यता असते. तेलंगणातील एका रेल्वे स्थानकावर असाच एक अपघात झाला. मात्र आरपीएफच्या जवानाने वेळीच समयसुचकता साधून महिलेला वाचवले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. थोडक्यात गाडी चुकेल म्हणून महिला धावत सुटली होती. गाडीचा वेग अद्याप वाढलेला नव्हता. ती … Read more

सोलापूर रेल्वे पोलिसांमुळे झाली ताटातूट झालेल्या आई-मुलाची भेट; रेल्वे पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव

सोलापूर, दि. 13 – गुलबर्गा शहरातून हरवलेला मतिमंद कृष्णा 48 तासांच्या अथक प्रयत्नानंतर सोलापूर रेल्वे स्थानकावर सापडला आणि त्याची आई लक्ष्मी कृष्णा भेटल्यामुळे टेन्शन फ्री झाली. लक्ष्मी दोडमनी या गुलबर्गामधील राहणाऱ्या आईचा कृष्णा हा 11 वर्षाचा मतिमंद मुलगा आहे. काल सकाळपासून तो हरवला होता. गुलबर्गा शहरापासून विविध ठिकाणी शोधाशोध केली तरी काही केल्या तो सापडत … Read more

रेल्वेत चढताना अडकला प्रवासी; RPF जवानाने केली कमाल ! थरार कॅमेऱ्यात कैद

मुंबई – रेल्वे प्रवास करताना सर्वांनाच सावधानतेने प्रवास करण्याच्या सूचना देण्यात येतात. मात्र अजुनही काही लोक धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये वयोवृद्ध देखील धावत्या रेल्वेत चढण्याची हिंमत करताना दिसतात. कल्याण स्थानकावर देखील असाच काहीसा प्रकार झाल्याचे समोर आले आहे. चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना प्लॅटफॉर्म आणि रुळाच्या मध्ये एक 79 वर्षांचा वृद्ध प्रवासी अडकला … Read more

आरपीएफ जवानांकडून ‘मिशन बचपन’

पुणे – नेहमी गस्त घालणारे, प्रवाशांना शिस्तीचे पालन करायला भाग पाडणारे, रेल्वे गाड्यांमध्ये सुरक्षेसाठी तैनात असणारे आणि गुन्हेगारांना पकडण्यासाठी विविध “मिशन’ राबवणाऱ्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) सध्या एक अनोखे “मिशन’ हाती घेतले आहे. मागील काही दिवसांपासून श्रमिक विशेष गाडीतून घरी परतणाऱ्या मुलांसाठी आरपीएफ “मिशन बचपन’ ही अनोखी मोहीम राबवत आहे. पुण्यातून सुटणाऱ्या श्रमिक विशेष गाड्यांतून … Read more