करोनासदृश लक्षणे दिसल्यास त्वरित आरटी-पीसीआर करा

ओमायक्रॉनचे बाधित वाढले, मनपा आरोग्य विभागाचे आवाहन पुणे- करोनासदृश लक्षणे दिसल्यास त्वरित आरटी-पीसीआर टेस्ट करावी. त्यामुळे उपचाराला दिशा मिळते, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये “ओमायक्रॉन’च्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. करोनाचीच लक्षणे असली तरी तीन-चार दिवसांत बरे होण्याचे प्रमाणही जास्त आहे. मात्र सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे असतानाही अनेक डॉक्‍टर आरटी-पीसीआर … Read more

‘ओमायक्रॉन’ संदर्भात दिलासादायक बातमी; ‘ICMR’ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली- भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) करोना विषाणू ओमायक्रॉनच्या नवीन व्हेरियंटची चाचणी करण्यासाठी OmiSure किटला मान्यता दिली आहे. OmiSure हे किट टाटा मेडिकलने विकसित केले आहे. टाटा मेडिकल अँड डायग्नोस्टिक्स लिमिटेडच्या TATA MD CHECK RT-PCR OmiSure ला ICMR ने 30 डिसेंबर रोजीच मान्यता दिली होती, परंतु त्याची माहिती आज मंगळवारी समोर आली आहे. Omisure … Read more

पुणे : परदेशांतून आलेल्या दीड लाख जणांची आरटी-पीसीआर

पुणे – “ओमायक्रॉन’ संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर परदेशातून आलेल्या सुमारे दीड लाख नागरिकांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली असून, त्यातील 20 हजार 920 नागरिक अतिजोखमीच्या देशातून आले आहेत. तर, अन्य 1 लाख 22 हजार 206 नागरिक हे अन्य देशातून भारतात आले आहेत. अतिजोखमीच्या देशातून आलेल्या सर्वच नागरिकांची आरटीपीसीआर टेस्ट केली असून, अन्य देशातून आलेल्या 3 हजार 691 जणांची … Read more

आंध्र प्रदेशात परतलेले 60 पैकी 30 परदेशी प्रवासी ‘बेपत्ता’, सरकार RT-PCR चाचणीसाठी घेत आहे शोध

भारतात ओमायक्रॉन या करोनाच्या नवीन प्रकाराचा धोका हळूहळू वाढत आहे. दरम्यान, आंध्र प्रदेशातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आंध्र प्रदेशात गेल्या 10 दिवसांत विदेशातून सुमारे 60 प्रवासी येथे दाखल झाले आहेत. यापैकी नऊ जण आफ्रिकेतून आले आहेत. 60 पैकी 30 प्रवासी विशाखापट्टणममध्ये थांबले आहेत. तर उर्वरित 30 जण राज्यातील विविध ठिकाणी रवाना झाले आहेत. … Read more

पुणे : आता फक्‍त “आरटी-पीसीआर’ धरणार ग्राह्य

करोना संसर्ग दर मोजणीसाठी शासनाचा नियम ः लॉकडाऊनचा निर्णयही त्यावरच ऍन्टिजेन तपासणीचा अहवालाचा समावेश नसणार पुणे – करोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी नमुने तपासणीवर भर दिला जात आहे. राज्यात दररोज दोन ते अडीच लाख संशयितांची नमुने तपासणी केली जात आहे. त्यामध्ये आरटी-पीसीआर आणि ऍन्टिजेन तपासणीचा समावेश आहे. यातील एकूण पॉझिटिव्ह अहवालातून बाधित दर काढला जातो. मात्र, … Read more

महाराष्ट्रातून शेजारच्या ‘या’ राज्यात जाण्यासाठी आरटी-पीसीआर निगेटिव्ह अहवाल अनिवार्य

पणजी : तुम्ही गोव्याला जाण्याचा प्लान केला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण गोव्यात जाण्यासाठी तुम्हाला कोविड निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र बाळगावे लागणार आहे. हे प्रमाणपत्र नसेल तर तुम्हाला गोव्यात प्रवेश करता येणार नाही, असे आदेश गोवा सरकारने काढले आहेत. मात्र आपण गोव्याचे रहिवासी असाल तर त्याचा पुरावा देऊन तुम्ही गोवा राज्यात प्रवेश … Read more

आरटी-पीसीआर चाचणी शासन दरानुसारच बंधनकारक

पिंपरी – भारतीय आयुर्विज्ञान संस्था आणि एनएबीएल मान्यताप्राप्त खासगी प्रयोगशाळांकडून करोनासाठी असलेल्या आरटीपीसीआर तपासणीचे दर निश्‍चित केले आहेत. मात्र, काही प्रयोगशाळा जास्त दर आकारत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर महापालिका वैद्यकीय विभागाने सर्व खासगी प्रयोगशाळांना पत्र पाठवून तंबी दिली आहे. शहरातील मान्यताप्राप्त खासगी प्रयोगशाळांनी पिंपरी-चिंचवडमधील रुग्णांकडून शासन निर्णयानुसारच आकारणी करावी, असे बंधनकारक आहे. … Read more

पुण्यात आरटी-पीसीआर टेस्ट किट संपल्या

बहुतांश खासगी लॅबमध्ये स्वॅब घेणे बंद : समस्या वाढली पुणे – करोनाच्या “आरटी-पीसीआर’ टेस्टसाठी किटच उपलब्ध नसल्याने बहुतांश खासगी लॅबमध्ये स्वॅब घेणेच बंद करण्यात आले आहे. स्वॅबसाठी चौकशी केली, तर एका आठवड्यानंतरची अपॉइंटमेंट दिली जात असल्याने, संशयित रुग्ण हवालदिल झाले आहेत. करोनाच्या सुरूवातीला महापालिकेच्या माध्यमातूनच स्वॅब कलेक्‍शन केले जात होते आणि ते “एनआयव्ही’कडे पाठवले जात … Read more

ब्रिटनहून आलेल्या 342 जणांचे होणार ‘जिनोम टॅपिंग’

स्वखर्चाने “आरटी-पीसीआर’ चाचणी करावी लागणार करोनाच्या नव्या प्रकारामुळे महापालिकेचा निर्णय पुणे – ब्रिटनमध्ये करोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याच्या पार्श्‍वभूमीवर, गेल्या तीन आठवड्यांत युरोप आणि मध्य पूर्व आशियातून शहरात आलेल्या 542 नागरिकांना घरातच विलगीकरणात (होम क्वारंटाईन) राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यातील 342 जण पुण्यातील आहेत, या सगळ्यांचीच “जिनोम टॅपिंग’ अर्थात विषाणूच्या जनुकीय रचनेच्या अभ्यासाद्वारे चाचणी होणार … Read more

सिटी स्कॅन तपासणीवरही पुणे पालिकेची नजर

ऍन्टिजेन, आरटी-पीसीआर तपासणीकडे नागरिकांची पाठ पुणे – करोनाची लक्षणे असलेले संशयित नागरिक खासगी लॅब तसेच महापालिकेच्या कोविड केअर सेंटर येथील रॅपिड ऍन्टिजेन टेस्ट तसेच आरटी-पीसीआर चाचण्यांकडे पाठ फिरवत आहेत. तर, करोनाचे योग्य निदान होण्यासाठी एक्‍स-रे तपासणी तसेच सीटी स्कॅन करण्यावर भर देत असल्याचे समोर आले आहे. एक्‍स-रे तपासणी, सीटी स्कॅन तपासणीनंतर अनेक संशयित नागरिक परस्परच … Read more