Pune: आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक पदाच्‍या लेखी परीक्षा जूनमध्ये

पुणे – जिल्हा परिषदेच्या आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक पदाच्या भरतीसाठीच्‍या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्‍यानुसार या परीक्षांना जूनपासून सुरुवात होणार आहे. जिल्हा परिषदेची भरती अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. परीक्षा या लवकरात-लवकर घेण्यात याव्यात, पण उमेदवारांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळेल, यादृष्टीने किमान ३० दिवस आधी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणीही उमेदवारांच्या वतीने करण्यात आली होती. … Read more

अहमदनगर : ग्रामविकास विभागाचे महसूल विभागाच्या अधिकारावर अतिक्रमण

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे खंडपीठात प्रतिज्ञापत्र नेवासा (राजेंद्र वाघमारे ):  शासकीय जागेतील अतिक्रमण नियामनुकुल करण्याचा महसूल विभागाचा ४ एप्रिल २००२ चा शासन निर्णय रद्द करून ग्रामविकास खात्याने महसूल खात्याला दणका दिला. महसूल खात्याचा शासनादेश रद्द केल्याबाबतची बाब अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामुळे उघडकीस … Read more

शिक्षण, आरोग्याचे प्रश्‍न पूर्णतः सुटलेले नाहीत; ग्रामविकासमंत्र्यांनी व्यक्‍त केली खंत

पुणे – ग्रामीण भागातील लोकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना आहेत. या योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जात असताना अजूनही ग्रामीण भागातील शिक्षण, आरोग्याचे प्रश्‍न पूर्णतः सुटले नसल्याची खंत ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली. दरम्यान हे प्रश्‍न सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेने आणि कल्पकतेने काम करावे. गाव स्वच्छ आणि सुंदर होईल यासाठी … Read more

“जिल्हा परिषद भरतीप्रक्रियेत प्रलोभनाला बळी पडू नका’ – ग्रामविकास विभाग

पुणे – राज्यातील 35 जिल्हा परिषदेत रिक्‍त पदावर सरळ सेवेने भरतीप्रक्रिया सुरू आहे. यात भरती प्रक्रिया राबविनाताना काही व्यक्‍तींकडून प्रलोभने दाखवून आर्थिक फसवणूक होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे अशा कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये, असे आवाहन ग्रामविकास विभागाकडून करण्यात आले आहे. ग्रामविकास विभागाची संपूर्ण भरतीप्रक्रिया शासनाने मान्यता दिलेल्या “आयबीपीएस’ या त्रयस्थ कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. राज्यातील … Read more

ग्रामविकास विभाग भरतीप्रक्रिया | उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये – मंत्री गिरीश महाजन

मुंबई :- ग्रामविकास विभागाची संपूर्ण भरतीप्रक्रिया शासनाने मान्यता दिलेल्या आय.बी.पी.एस. या कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. त्यामुळे सदर परीक्षा अत्यंत पारदर्शक व काटेकोर पद्धतीने होणार आहे. तथापि, काही समाजविघातक प्रवृत्तींच्या व्यक्तींकडून प्रलोभने दाखवून आर्थिक फसवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा फसवणुकीपासून उमेदवारांनी दक्षता घ्यावी, तसेच अशाप्रकारच्या कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये, असे आवाहन ग्रामविकास व … Read more

ग्रामविकास विभागाच्या भरतीप्रक्रियेतील उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये – मंत्री गिरीष महाजन

मुंबई :- ग्रामविकास विभागाच्या परिक्षेची संपूर्ण भरतीप्रक्रिया शासनाने मान्यता दिलेल्या आय.बी.पी.एस. या कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. त्यामुळे सदर परीक्षा अत्यंत पारदर्शक व काटेकोर पद्धतीने होणार आहे. तथापि, काही समाजविघातक प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून प्रलोभने दाखवून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा फसवणूकीपासून उमेदवारांनी दक्षता घ्यावी, तसेच अशा प्रकारच्या कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये, असे आवाहन … Read more

Ashadhi Ekadashi 2023 : पालखीमार्गात भाविकांना स्वच्छता-सुविधांसाठी ग्रामविकास विभागाकडून 21 कोटींचा निधी – गिरीश महाजन

मुंबई  : आषाढी एकादशी निमित्त पुणे, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांतून मार्गक्रमण करणाऱ्या विविध संतांच्या पालख्यांसोबत असणाऱ्या भाविकांना स्वच्छता – सुविधा पुरविण्यासाठी मुक्कामाच्या ठिकाणी तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था करण्याच्या कामांसाठी २१ कोटी रूपये निधीस मंजुरी देण्यात आली असल्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. मंत्री महाजन म्हणाले की, आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी दरवर्षी … Read more

सरपंच पदाची थेट निवडणूक; ग्रामविकास विभागाचा अध्यादेश जारी

मुंबई : महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम 30 नुसार सरपंचाची निवड ही पंचायतीच्या निवडून आलेल्या सदस्यांद्वारे व त्यांच्यामधून केली जात होती. याबाबतच्या महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमामध्ये आणखी सुधारणा करण्यात आली आहे. या अधिनियमद्वारे आता गावातील पात्र मतदारांकडून पंचायतीच्या सरपंच पदाची थेट निवडणूक करण्याची पद्धती अवलंबिण्यात येणार आहे, असा अध्यादेश ग्रामविकास विभागाकडून निर्गमित करण्यात आला आहे. प्रत्येक सार्वत्रिक … Read more

ग्रामपंचायतीतील अपहार पडणार महागात

अपहार झाल्यास थेट होणार कारवाई पुणे – जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये होणाऱ्या अपहारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे शासनाचे नुकसान होत असून, चौकशीही नीट होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. ग्रामपंचायतीतील हे प्रकार थांबविण्यासाठी आता जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास विभागाने कंबर कसली असून अपहार झाल्यास थेट कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. याचे परिपत्रक मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार काढण्यात आले … Read more

20 हजार तलाव मासेमारीसाठी खुले होणार

राज्यात पाच लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट : ग्रामविकास विभाग सकारात्मक पुणे – राज्यातील ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषदांचे तलाव मासेमारीसाठी खुले करण्यास ग्रामविकास मंत्रालयाने सहमती दर्शवली आहे. त्यामुळे 5 लाखांहून अधिक रोजगार निर्मिती होऊ शकेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. राज्यात जिल्हा परिषदेचे 20 हजार तलाव आहेत. हे तलाव, जलाशय ग्रामविकास विभागाच्या अखत्यारित येतात. या तलावांमध्ये शास्त्रीय पद्धतीने … Read more