रशियाकडून व्हॅक्यूम बॉम्बचा वापर

मॉस्को – व्हॅक्यूम बॉम्बचा वापर करून युक्रेनचे खूप सैनिक मारल्याचा दावा रशियाच्या सैन्य दलाने केला आहे. हा बॉम्ब ज्या भागात टाकला जातो, त्या भागातील जिवंत राहण्यासाठी आवश्‍यक असलेला ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात काढून घेतला जातो. यामुळे श्वासोच्छवास न करता आल्यामुळे सजीवांचा मृत्यू होतो, असे एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे. रशियाच्या सैन्य दलाच्या डेप्युटी चीफ ऑफ आर्म्ड फोर्सेसच्यावतीने … Read more

रशियाच्या वॉन्टेड यादीमध्ये आलं ‘या’ देशाच्या पंतप्रधानाचे नाव

नवी दिल्ली – इस्टोनियाचे पंतप्रधान काजा कलास यांचे नाव रशियाच्या वॉन्टेड गुन्हेगारांच्या यादीमध्ये टाकण्यात आले आहे. गुन्हेगारी आरोप असलेल्या लोकांच्या रशियाच्या अधिकृत यादीमध्ये ही नोंद झाल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. युक्रेनच्या मुद्यावरून रशिया आणि पाश्‍चात्य देशांमधील तणाव वाढत असताना ही बाब उघड झाली आहे. मात्र कलास यांच्यावर कोणते आरोप आहेत, हे स्पष्ट होऊ शकले नाही. वॉन्टेड … Read more

रशियात वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांची धरपकड ! दोन डझन पत्रकारांना घेतले ताब्यात.. सैनिकांच्या पत्नींनी केली होती निदर्शने

नवी दिल्ली – रशियामध्ये एका निदर्शनांचे वार्तांकन करणार्‍ या सुमारे २ डझन पत्रकारांची पोलिसांनी धरपकड केली आहे. राजधानी मॉस्कोच्या मद्यभागामध्ये ही निदर्शने आयोजित केली गेली होती आणि युक्रेनविरोधात लढणार्‍ या रशियाच्या सैन्यातील सैनिकांच्या कुटुंबीयांनी ही निदर्शने केली होती. युद्धावर पाठवण्यात आलेल्या आपल्या आप्तस्वकीयांना परत घरी पाठवण्यात यावे, अशी मागणी या सर्व महिला करत होत्या. केर्मलिन … Read more

रशियामध्ये पुढील वर्षी अध्यक्षीय निवडणुका ? 13 मार्चला निवडणुकांची घोषणा होण्याची शक्‍यता

नवी दिल्ली – रसियाच्या (Russia) अध्यक्षपदासाठी पुढील वर्षी मार्च महिन्याच्या 13 तारखेला निवडणुकांची घोषणा होण्याची शक्‍यता आहे. या निवडणुका डिसेंबरमध्ये होऊ शकतात, असे रशियातील सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे. निवडणुका जाहीर केली जाण्याची तारीख पूर्वी 17 मार्च निश्‍चित केली गेली होती. मात्र त्यामध्ये बदल करून आता 13 मार्चला निवडणुका जाहीर केल्या जाऊ शकते, असे या वृत्तसंस्थेने … Read more

मोठी बातमी..! रशिया -गोवा विमान उडवून देण्याची धमकी; २३८ प्रवाशांचा जीव धोक्यात

रशियाहून गोव्याला जाणाऱ्या अझूर एअरच्या चार्टर्ड फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची माहिती समोर आली आहे. माहिती मिळाल्यानंतर हे विमान उझबेकिस्तानकडे वळवण्यात आले आहे. हे विमान रशियाच्या पर्म विमानतळावरून गोव्याला जात होते. विशेष म्हणजे या विमानात 238 प्रवासी आणि 7 क्रू मेंबर्ससह 245 लोक होते. एका अधिकाऱ्याने सांगितले की, दाबोलिम विमानतळाच्या संचालकांना 12.30 वाजता फ्लाइटमध्ये कथित बॉम्ब असल्याचा … Read more