“एका भावाला बहिणीबरोबर…”, ते वादग्रस्त वक्तव्य सुधीर मुनगंटीवारांच्या अंगलट येणार? निवडणुक आयोगाने घेतली दखल

Sudhir Mungantiwar : चंद्रपूर येथील सभेत बोलताना भाजपचे चंद्रपूर लोकसभेचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या वक्तव्याची क्लिप काॅंग्रेस नेते सचिन सावंत यांनी एक्सवर पोस्ट करत निवडणुक आयोगाला टॅग केली. सुधीर मुनगंटीवार यांनी आचार संहितेचे उल्लंघन केले असून त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे. त्या पोस्टची निवडणुक आयोगाने दखल घेतली आहे. त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांच्यावर आता कारवाई … Read more

“कमळाबाईच्या रिमोट कंट्रोलने शिंदेंची शिवसेना…”; श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीवरून काँग्रेसची जहरी टीका

Kalyan Lok Sabha Election 2024|

Kalyan Lok Sabha Election 2024| लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. मात्र अद्याप महायुती आणि महाविकास आघाडीतील काही मतदार संघातील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून भाजप आणि शिंदे गटात रस्‍सीखेच सुरू होती. या मतदारसंघातून सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे खासदार आहेत. मात्र, त्यांच्या उमेदवारीला भाजपकडूनच तीव्र … Read more

“AI च्या DeeFake वर कारवाई करण्यासाठी नियमावली बनवणे आवश्यक..” प्रदेश कॉंग्रेसची राज्य सरकारकडे मागणी

मुंबई – कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे (AI) निर्माण केल्या जाणाऱ्या डीपफेक्‍स (Deepfake) तंत्रांच्या बनावट व्हिडीओच्या समस्येला सामोरे जाण्यासाठी कायदेशीर आणि नियामक फ्रेमवर्क तयार करण्यासाठी राज्य सरकारने एक समिती स्थापन केली पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीने केली आहे. कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत (Sachin Sawant) म्हणाले की डीपफेक ओळखण्यासाठी आणि त्यांचा पर्दाफाश करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आवश्‍यक … Read more

‘तीन तिगाडा काम बिगाडा’ सरकारची अवस्था; ‘या’ चित्रपटातील व्हिडिओ शेअर करत काँग्रेसने उडवली खिल्ली

मुंबई  – शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी  काँग्रेसमध्ये देखील मोठी फुट पडली. अजित पवार यांनी राष्ट्रवादीतील दिग्गज नेत्यांसह शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सध्या भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांचे सरकार आहे. सध्या या राजकीय घडामोडीवर विरोधक टीका करताना दिसतात. यातच आता काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी ट्वीटद्वारे वेगळ्यापद्धतीने सरकारवर निशाणा … Read more

“मोदींचा खरा चेहरा तो हाच..” अजित पवारांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर काँग्रेस नेत्याची प्रतिक्रिया चर्चेत

मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भुंकप घडला आहे. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीमध्येही मोठी फूट पडली आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांनी दिलेला अल्टिमेटम शरद पवारांनी मान्य न केल्यामुळे शरद पवार नाराज असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आज शपथविधी सोहळा पार पडला आहे. या राजकीय नाट्यानंतर आता राजकीय वर्तुळातून … Read more

“घराणेशाहीच्या नावाने बोंब ठोकणाऱ्या भाजपाची राजेशाहीकडे वाटचाल सुरु”; काँग्रेसची गंभीर टीका

मुंबई : देशातील विविध योजनांना नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले आहे. तसेच नरेंद्र मोदी यांचे नाव स्टेडियमलाही देण्यात आलं आहे. त्यावरून आता काँग्रेस आक्रमक झाल्याचं दिसतं आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी याबाबत ट्विट करत भाजपाची वाटचाल ही राजेशाहीकडे चालली आहे  असा गंभीर आरोप केला आहे. नरेंद्र मोदी हे देश हुकूमशाहीच्या दिशेने नेत … Read more

“भीमाशंकर ज्योतिर्लिंगावरच आसाम भाजप सरकारने मालकी हक्क सांगितलाय, ‘शंख’ फुंकावाच लागेल”

साम सरकारने एक जाहीरात प्रसिद्ध केली आहे. 6वं ज्योतिर्लिंग आसाममध्ये आहे अशी जाहिरात आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी केलीय. या जाहीरातीवरुन  आता नवा वाद निर्माण झाला आहे. यावरून आता शिवभक्तांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. यावरून   सध्या  विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. अशात आजच्या सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने राज्य मोदी सरकारला  इशारा दिला आहे. काय … Read more

उद्योग केले देवही गेले..! भीमाशंकर (आसाम) नंतर महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग अशा प्रकारे पळवण्यात येऊ शकतात

मुंबई –  साम सरकारने एक जाहीरात प्रसिद्ध केली आहे. 6वं ज्योतिर्लिंग आसाममध्ये आहे अशी जाहिरात आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी केलीय. या जाहीरातीवरुन  आता नवा वाद निर्माण झाला आहे. यावरून आता शिवभक्तांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. यावरून  काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी  सरकारवर निशाणा साधला आहे. तर सुप्रिया सुळे यांनी ज्योतिर्लिंग वादावरून शिंदे … Read more

ज्योतिर्लिंग वादावरून सुप्रिया सुळे यांची शिंदेवर टीका,“तिथं तुमची सर्व सोय.. बदल्यात ज्योतिर्लिंग देऊन आला नाहीत ना?”

मुंबई – आसाम सरकारने एक जाहीरात प्रसिद्ध केली आहे. 6वं ज्योतिर्लिंग आसाममध्ये आहे अशी जाहिरात आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी केलीय. या जाहीरातीवरुन  आता नवा वाद निर्माण झाला आहे. यावरून आता शिवभक्तांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. यावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे, याच  वादावर खासदार सुप्रिया सुळे  यांनीही शिंदे फडणवीस सरकारला … Read more

शिवभक्त संतापले..! ‘केवळ उद्योगच नव्हे तर आता भाजपाला महाराष्ट्रातून भगवान शंकरांनाही हिसकावून न्यायचे आहे’

मुंबई – केवळ उद्योगच नव्हे तर आता भाजपला महाराष्ट्रातून भगवान शंकरांनाही हिसकावून न्यायचे आहे. आता भाजपच्या आसाम सरकारचा दावा आहे की, भीमाशंकरचे सहावे ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील पुणे जिह्यात नसून आसाममध्ये आहे. या अत्यंत आगाऊपणाच्या दाव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. यावर शिंदे-फडणवीस सरकारने तत्काळ भूमिका स्पष्ट करून आसाममधील भाजप सरकारच्या या निंदनीय कृतीचा निषेध केला पाहिजे. … Read more