Pune: डांबरीकरण केलेला रस्ता तीन दिवसांत खोदला

पुणे – महापालिकेकडून अवघ्या महिन्याभरापूर्वीच शहरात कोणत्याही प्रकारची खोदाई करायची झाल्यास खोदाई काम करणाऱ्या यंत्रणा आणि पथ विभागात समन्वय ठेवला जाईल तसेच नव्याने केलेल्या रस्त्यावर अतिरिक्त आयुक्तांच्या मान्यतेशिवाय खोदाईस परवानगी दिली जाणार नाही असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, महिन्याभराच्या आत पालिकेच्या पथ विभागाला आपल्या निर्णयाचा विसर पडला आहे. सदाशिव पेठेतील टिळक स्मारक मंदिर ते … Read more

पुणे | हलक्या पावसाने उकाड्यावर फुंकर

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरासह जिल्ह्यातील बहुतांश भागात शुक्रवारी (दि. 1) सकाळी हलका पाऊस झाला. त्यानंतर दिवसभर ढगाळ वातावरण होते. मध्यवर्ती भागांत शिवाजीनगर, सदाशिव पेठ यांसह हडपसर, मुंढवा, कोथरूड, पाषाण, औंध, नऱ्हे, कात्रज परिसरात रिमझिम झाली. दरम्यान, पुढील 24 तास शहरातील हवामान ढगाळ तर मेघगर्जनेसह हलक्या सरी पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. शहर-जिल्ह्यात गेल्या … Read more

पुणे: सदाशिव पेठेत इमारतीच्या बाथरूममध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

पुणे – सदाशिव पेठेतील इमारतीच्या बाथरुममध्ये एका महिलेचा मृतदेह आढळला. ही महिला मृत होऊन दोन ते तीन दिवस झाले असल्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तवली. या इमारतीच्या नूतनीकरणाचे काम सुरु असल्याने येथे कोणी रहात नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, सासवडकर नावाच्या कुटूंबाच्या मालकीची 971 सदाशिव पेठ येते दत्तकृपा नावाची इमारत आहे. या इमारतीच्या नूतनीकरणाचे काम सुरु आहे. यामुळे … Read more

सदाशिव पेठेतील औषधगल्ली पुन्हा सुरू

पुणे – सदाशिव पेठेतील औषधगल्ली पुन्हा जोमात सुरू झाली आहे. येथील एका दुकानातील कर्मचारी, मालक आणि त्या सगळ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना करोनाची लागण झाली आहे. त्यातील सुमारे 37 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, या प्रकारानंतर पुणे केमिस्ट असोसिएशनच्या वतीने शुक्रवार ते रविवार असे तीन दिवस ही बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही बाजारपेठ सोमवारी … Read more

सर्वाधिक मताधिक्‍य मिळणार – टिळक

सदाशिवपेठ, नारायण पेठ परिसर नेहमीच भाजपसोबत राहिला पुणे – शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सदाशिव पेठ आणि नारायण पेठ या भागाचे गेले 20 वर्षे कार्यकर्ती आणि लोकप्रतिनिधी म्हणून प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे. या कालावधीत या भागासाठी काम करण्याची संधी मिळाली तसेच खासदार गिरीश बापट यांच्या माध्यमातूनही या भागात आमदार म्हणून मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली असून … Read more

#2019Ganeshotsav : बिस्कीटांची सजावट

पुणे – ग्राहक पेठेच्या वतीने अनेक वर्षांपासून गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा तब्बल 20 हजार बिस्कीटे आणि चॉकलेट्‌सचा वापर करुन बिस्कीटांचे गणेश मंदिर साकारण्यात आले आहे. केवळ सजावटच नव्हे तर बिस्कीटांची गणेश मूर्ती देखील साकारण्यात आली आहे. टिळक रस्त्यावरील ग्राहक पेठेतर्फे गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदा 18 हजार बिस्कीटे आणि 2 हजार 800 … Read more

पुणे – सदाशिव पेठेतील अॅसिड हल्ला बदला घेण्यासाठी

गोळीबारामागचे रहस्य उलगडले :आरोपीच्या बॅगेत कोयते आणि चाकू पुणे – सदाशिव पेठेत तरुणावर अॅसिड हल्ला करुन आत्महत्या केलेल्या सिद्धराम कलशेट्टी हा त्या संपूर्ण कुटूंबालाच संपविण्याच्या उद्देशाने आला होता. त्याच्याकडील बॅगेत दोन कोयते आणि दोन चाकूही आढळून आले आहेत. त्याने तरुणावर अॅसिड हल्ला करुन गोळीबार केला होता. यानंतर समोरच्या इमारतीत लपून बसल्यावर शोध घेतलेल्या पोलिसांवरही गोळीबार … Read more

सदाशिव पेठेत युवकावर अॅसिड हल्ला

टिळक रस्त्यावरील घटना : पोलिसांवरही गोळीबार पुणे – सदाशिव पेठेतील टिळक रस्त्यावर मैत्रिणीबरोबर गप्पा मारत थांबलेल्या एका युवकावर अज्ञाताने अॅसिड टाकल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सायंकाळी घडली. या घटनेत जखमी झालेल्या युवकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी अज्ञाताला पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्याने पोलिसांवर गोळीबार केला. त्याचा शोध घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू … Read more