BWF Rankings : सात्विक-चिरागने पुन्हा एकदा रचला इतिहास! ‘अशी’ कामगिरी करणारे ठरले पहिलेच भारतीय…

Chirag -Satwiksairaj break Saina Nehwal’s record : भारताची स्टार बॅडमिंटनपटूंची जोडी चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी यांची यशस्वी घौडदौड सुरूच आहे. आता या भारतीय जोडीने आणखी एका यशाला गवसणी घातली असून त्यांनी लंडन 2012 ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवालचा विक्रम मोडीत काढला आहे. सलग 10 आठवडे पुरूष दुहेरीत जागतिक क्रमवारीत नंबर 1 राहिल्यानंतर चिराग शेट्टी … Read more

BWF World Championship 2022 : अन् महिला एकेरीतील भारताचे आव्हान संपूष्टात

टोकियो  – टोकियोत सुरु असलेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत महिलांच्या एकेरीत भारताची स्टार खेळाडू सायना नेहवाल हिला पुन्हा एकदा अपयशाचा सामना करावा लागला. तिला या स्पर्धेत थायलंडच्या बुसानन ओग्बामुनफान हिच्याकडून 17-21, 21-16, 13-21 असा पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे महिला एकेरीतील भारताचे आव्हान संपूष्टात आले आहे. दरम्यान, भारताच्या ध्रुव कपिला व एमआर अर्जुन या जोडीने पुरुष … Read more

BWF World Championship 2022 : सायनाची उपउपांत्यपूर्व फेरीत धडक

टोकियो – भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालने येथे सुरु असलेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. तसेच महिला दुहेरीत भारताच्या ट्रीसा जॉली व गायंत्री गोपीचंद जोडीनेही विजयी वाटचाल कायम राखली. सायनाने हॉंगकॉंगच्या चेउंग लेआन ली हीच्यावर अवघ्या 38 मिनिटांत 21-19, 21-9 अशी सरळ दोन गेममध्ये मात केली. यंदाच्या मोसमात सातत्याने … Read more

जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : कारकीर्द वाचवण्याची ‘सायना’ला अखेरची संधी

नवी दिल्ली – राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये पदके मिळवलेल्या भारतीय बॅडमिंटनपटूंसमोर येत्या 22 ऑगस्टपासून टोकियोत सुरू होत असलेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत मोठे आव्हान असेल. त्यातही भारताची स्टार खेळाडू फुलराणी सायना नेहवालही या स्पर्धेत सहभागी होत असून, तिची कारकीर्द वाचवण्याची ही अखेरची संधी ठरण्याची शक्‍यता आहे. या स्पर्धेचा ड्रॉ जाहीर झाला असून, त्यात भारतीय खेळाडूंसाठी मोठी परीक्षा … Read more

राष्ट्रकुल स्पर्धेसाठी सायनाला डावलल्यानंतर नवरा कश्यप संतापला; म्हणाला, “जी खेळाडू…”

नवी दिल्ली – राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी घोषित केलेल्या भारतीय बॅडमिंटन संघात फुलराणी सायना नेहवालला स्थान देण्यात आले नसल्याने तीचा पती व नामांकित बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्‍यप याने भारतीय बॅडमिंटन संघटनेवर ताशेरे ओढले आहेत. जी खेळाडू पदक जिंकून देऊ शकेल अशाच सायनाला संघात स्थान न देण्यामागे नक्की काय विचार निवड समितीने केला, असा संतप्त सवालही त्याने केला … Read more

Badminton Asia Championships 2022 : सायनाची विजयी सलामी तर सेनला पराभवाचा धक्का

मनिला – भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू फुलराणी सायना नेहवाल हिने आशिया करंडक बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. तिने यंदाच्या मोसमात या स्पर्धेत थाटात प्रारंभ करत अपयशाची मालिका खंडित केली. मात्र, यंदाच्या मोसमात भरात असलेला लक्ष्य सेन मात्र पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीतच गारद झाला. त्याच्यासह बी साई प्रणितलाही पराभवाचा धक्का बसला. सायनाने दुखापतीतून पूर्ण तंदुरुस्त होत … Read more

Saina Nehwal : सायनाच्या ‘त्या’ निर्णयावर होतेय प्रचंड टीका

बेंगळुरू – राष्ट्रकुल, आशियाई तसेच उबर करंडक बॅडमिंटन स्पर्धेसाठी भारताच्या संघात थेट निवड करण्यात न आल्यामुळे संतापलेल्या सायना नेहवालने पात्रता स्पर्धेतून माघार घेतली होती. तिच्या या निर्णयावर सध्या प्रचंड टीका होत आहे. फुलराणी नावाने प्रसिद्ध असलेली सायना एक अफलातून खेळाडू आहे; पण खेळापेक्षाही ती आता स्वतःला मोठी समजते का, असा सवाल आता चाहते करत आहे. … Read more

भारतीय बॅडमिंटन संघटनेला पत्र लिहित सायनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली – भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने आगामी राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीच्या निवड चाचणीतून माघार घेतल्याचे जाहीर केल्यावर भारतीय बॅडमिंटन क्षेत्रात सर्वकाही अलबेल नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेसाठीची निवड चाचणी 15 ते 20 एप्रिलदरम्यान होणार असून सायनाने का माघार घेतली याचे उत्तर भारतीय बॅडमिंटन संघटनेकडेही नसल्याने … Read more

Swiss Open 2022 | स्विस ओपनमधून सायना बाहेर

बासेल – भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवाल स्विस ओपन स्पर्धेतून बाहेर पडली आहे. महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत मलेशियाच्या किसोना सेल्वादुरेकडून पराभव पत्कारावा लागल्याने सायनाचे आव्हान संपुष्टात आले. 23व्या मानांकित सायनावर 64व्या क्रमांकावर असलेल्या किसोनाने 21-17, 13-21, 13-21 असा विजय मिळविला. या सान्यात सायनाला पहिल्या गेममध्येही सातत्य राखता आले नाही. तथापि, दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. … Read more

#IndiaOpen2022 | महाराष्ट्राच्या मालविकाची सायनावर सनसनाटी मात

नवी दिल्ली – महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरमधून पुढे आलेली प्रतिभावान बॅडमिंटनपटू मालविका बनसोड हिने आपल्या कारकिर्दीतील सर्वात सनसनाटी विजय नोंदवला. तिने येथे सुरू असलेल्या इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताची ऑलिम्पिक पदकविजेती स्टार खेळाडू फुलराणी सायना नेहवालचा पराभव केला. मालविकाने सायनाला 21-17, 21-19 असे सरळ दोन गेममध्ये अवघ्या 34 मिनिटांत पराभूत केले व स्पर्धेतील … Read more