PUNE: बॅनरवरून वाद, मारहाण; एफटीआयआय संस्थेतील प्रकार

पुणे – फिल्म अॅंड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया या संस्थेत वादग्रस्त बॅनर लावण्यावरुन वाद उफाळला. बाहेरील काही विद्यार्थी संघटनांनी संस्थेच्या आवारात जाऊन हा बॅनर जाळला. तर, या संघटनेच्या सदस्यांना संस्थेतील विद्यार्थ्यांनी मारहाण केली. यानंतर डेक्कन पोलीस ठाण्यात मोठा जमाव एकत्र आला होता. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. संस्थेमध्ये एफटीआयआय स्टुडंट असोसिएशन … Read more

PUNE: गणेशोत्सवानिमित्त सुविधा पुरवण्यासह पालिकेची जय्यत तयारी; भाविकांसाठी पार्किंग, मोबाइल टॉयलेटची सोय

पुणे -गणेशोत्सवाच्या काळातील मंडप आणि कमानींवर लावण्यात येणाऱ्या जाहिरातींसाठी महापालिकेकडून आकारण्यात येणारे शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येईल. 50 मीटर रनिंग मंडपापर्यंत ते माफ असेल, तसेच उत्सवकाळात चारशे मोबाइल टॉयलेट उभारण्यात येतील. याशिवाय उत्सव पाहण्यासाठी शहरात येणाऱ्या भक्तांच्या वाहनांना पार्किंग करणे सोईचे जावे यासाठी महापालिका शाळांची मैदाने आणि शासकीय अभियांत्रिक महाविद्यालयाचे (सीओईपी) मैदान उपलब्ध करून देण्याची घोषणा … Read more

PUNE: दहीहंडीमुळे मध्य भागातील वाहतुकीत आज बदल; ‘या’ पर्यायी मार्गाचा करावा लागणार वापर

पुणे – गोकुळअष्टमीच्या सणानिमित्त शहर व लगतच्या परिसरात गुरुवारी (दि. 7) दहीहंडीचा उत्सव जल्लोषात साजरा केला जाणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. त्याचबरोबर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहन व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. यानिमित्ताने विशेषतः शहरातील मध्यभागातील शिवाजी रोड, लक्ष्मी रोड, बाजीराव रोड, टिळक रोड येथे दहिहंडी पाहण्यासाठी गर्दी … Read more

गणेशोत्सवात सर्व मंडळांना समान सन्मान मिळावा; पोलीस आयुक्‍तालयातर्फे आढावा बैठक

पुणे – “गणपती विसर्जन मिरवणुकीत काही मंडळांना तीन, तर उर्वरित मंडळांना फक्‍त दोन ढोल ताशा पथकांची परवानगी दिली जाते. हा भेदभाव दूर करून सर्व मंडळांसाठी ढोल-ताशा पथकांची आणि पथकातील ढोल व ताशांची संख्या निश्‍चित करावी. पथकांची संख्या मर्यादित ठेवली, तर मिरवणूक लवकर संपवता येईल,’ अशी भूमिका गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासन आणि मंडळांच्या बैठकीत मांडली. गणेशोत्सवाच्या … Read more

पेरुगेट चौकीला कुलूप; आरोपी अर्धा तास दारात, नागरिक संतप्त

पुणे – तरुणीवर वार करणाऱ्या शंतनू जाधवला स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आणि नागरिकांनी पकडून ठेवले. यानंतर समोरच असलेल्या चौकीत त्याला नेण्यात आले. मात्र चौकीला चक्क कुलूप होते. आक्रमक झालेल्या आरोपीला संभाळत काहींनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला, मात्र पोलीस तब्बल अर्धा तास उलटल्यावर दाखल झाले. यामुळे नागरिकांचा संताप अनावर झाला होता. या घटनेची दखल घेण्यात आल्याची … Read more