nagar | लंके यांनी घेतली आ.बाळासाहेब थोरात यांची भेट

संगमनेर (प्रतिनिधी) – नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माजी आमदार नीलेश लंके यांनी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आमदार बाळासाहेब थोरात यांची संगमनेर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. संगमनेर येथील सुदर्शन निवासस्थानी नीलेश लंके यांनी शनिवारी रात्री आमदार थोरात यांची भेट घेतली. यावेळी कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्री थोरात व … Read more

nagar | संगमनेरात पुन्हा राडा ; तरुणाला बेदम मारहाण

संगमनेर, (प्रतिनिधी) – शहरातील जोर्वेनाक्यानंतर आता दिल्लीनाका परिसरात मंगळवारी संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान एका समाजातील जमावाने तरुणाला शिवीगाळ करून मारहाण केली. मारहाण सोडवण्यासाठी आलेल्यांनाही जमावाने मारहाण केल्याने संगमनेर तालुक्यातील वातावरण पुन्हा एकदा तणावाखाली आले होते. मात्र, रात्री उशिरा त्या जमावावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान … Read more

nagar | संजय गांधी योजनेचे ३ कोटी १५ लाख खात्यात वर्ग

संगमनेर, (प्रतिनिधी) – राज्‍य सरकार व केंद्र सरकारच्या माध्‍यमातून सुरू असलेल्‍या संजय गांधी निराधार योजना अंतर्गत तालुक्‍यातील लाभार्थ्‍यांना जानेवारी व फेब्रुवारीअखेर ३ कोटी १५ लाख ८ हजार १०० रुपये लाभार्थी खात्‍यात वर्ग करण्यात आल्याची माहिती संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ पाटील यांनी दिली. जानेवारी व फेब्रुवारीचे संजय गांधी निराधार अनुदान योजना सर्वसाधारण ५, … Read more

नगर | नगररचना सहायक संचालक कार्यालय श्रीरामपुरातच

श्रीरामपूर, (प्रतिनिधी) – येथील लवाद नगररचना योजना कार्यालयाचे सहाय्यक संचालक नगररचना शाखा असे नामकरण करण्यात आले असून त्यासाठी पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आला आहे. राज्याच्यानगर विकास विभागाने मंगळवारी त्यासंबंधीचे आदेश पारित केले. या कार्यालयास उत्तर नगर जिल्ह्यातील सर्व तालुके जोडण्यात आली आहेत. आमदार लहू कानडे यांनी यासाठी विशेष प्रयत्न करून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला … Read more

नगर – भिंगार येथील अपघातात माजी सरपंचांचा मृत्यू

नगर – स्टेट बँक चौक ते चांदबीबी महालापर्यंतच्या रस्त्यावर एका महिण्यात ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या महामार्गाची दुरावस्था झाल्याने हे अपघात झाले आहे. शुक्रवार (दि.२) रोजी सकाळी दुचाकीस्वार माजी सरपंच सुनील विजयकुमार बेरड यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. ग्रामस्थांसह … Read more

अहमदनगर – चुकीची माहिती देऊन केली बदनामी

संगमनेर – तालुक्यातील खांडगाव येथील तलाठ्याने बोगस पीक पाहणीची नोंद केली आणि काही लोकांना हाताशी धरून शेवगा पिकाची पीक पाहणी लावली, अशा आशयाच्या वृत्त प्रसारित झाले होते. याचे कात्रण सामाजिक माध्यमामध्ये जाणीवपूर्वक उपसरपंच यांनी फिरवल्याने तलाठी यांची बदनामी झाली. याबाबत त्यांनी चौघांविरोधात महाराष्ट्र राज्य महिला आयोगात तक्रार दिली आहे. खांडगाच्या तलाठी योगिता शिंदे यांनी दिलेल्या … Read more

अहमदनगर – आ. थोरात यांच्या होम ग्राउंडवर बॅटसमन कोण?

अमोल मतकर संगमनेर – संगमनेर तालुक्यातील पठार भागामध्ये पालकमंत्री तथा महसूल मंत्री विखे पाटील यांनी संगमनेरमध्ये नव्या बॅटस्मनची गरज असल्याचे सांगितले असून त्यासाठी आपण योग्य फिल्डिंगही लावणार असल्याचे स्प्षट केले. पण तालुक्यातील काँग्रेसचे पक्षाचे जेष्ठ नेते , आमदार बाळासाहेब थोरात यांच्या होम ग्राउंडवर त्यांच्या विरोधात कोण बॅटमॅन उभा करणार याबाबत संगमनेर तालुक्यातील जनतेला ही उत्कंठा … Read more

सातारा – युवाशक्तीला विकासाच्या प्रवाहात आणणार

कोरेगाव – कोरेगाव मतदारसंघातील युवाशक्तीला विकासाच्या प्रवाहात आणले जाणार आहे. युवाशक्ती बळकट झाल्यास गावे आणि पर्यायाने देश बळकट होईल, असा विश्वास आमदार महेश शिंदे यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख आणि जिहे, ता. सातारा येथील रहिवासी सौरभ भोईटे यांनी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत आमदार शिंदे यांच्या गटात खटाव येथील निवासस्थानी प्रवेश केला. … Read more

अहमदनगर – संगमनेर तालुका गुटखा टीमच्या कॅप्टनपदी आफ्रिदी

तालुका गुटखा टीमच्या कॅप्टनपदी आफ्रिदी प्रशासनाचे दुर्लक्ष; छोट्या दुकानदारांवर कारवाई, बडे मासे मोकाट अमोल मतकर संगमनेर  – राज्यात तंबाखूजन्य पदार्थ, तसेच गुटखाबंदी असूनही तालुक्यासह जिल्ह्यात राजरोसपणे खुलेआम विक्री सुरू आहे. नेहमीच छोट्या-छोट्या व्यावसायिकांवर कारवाई केली जाते. मात्र, बडे बोके नेहमीच बाहेर राहतात. तालुक्यातील गुटखा टीमचे कप्तानपद काही वर्षे अगोदर पाटील यांच्याकडे होते. मात्र, आता कप्तानपदी … Read more

70 वर्षांपासून पुरावे लपवून ठेवले : जरांगे

संगमनेर – महाराष्ट्रात गेली 70 ते 75 वर्षे मराठ्यांच्या जीवावर राज्यातील पक्ष मोठे झाले. त्यांना आपण मोठे केले परंतु आज मराठा समाजाला त्यांची गरज भासू लागली. अनेक ओबीसी नेत्यांनी 30 ते 35 वर्षे सत्ता भोगली आणि तेच आता जातीजातीत मतभेद निर्माण करून त्यांच्यात भांडणे लावण्याचे काम करत आहे. त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी मराठ्यांनी एकजूट करायला … Read more