वारी विशेष : पालखी विठोबा मंदिर

मंदिराचा जीर्णोद्धार सुमारे 30 वर्षांपूर्वी करण्यात आला, याचवेळी मंदिरातील जुन्या मूर्ती बदलून नवीन मूर्तींची स्थापना करण्यात आली. मंदिरात मुख्य गाभाऱ्यापुढे मोठे सभागृह आहे. संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या मूर्तीसह गाभाऱ्यासमोर गरूड विराजमान आहे. मंदिराच्या सभागृहातच माऊलींच्या पादुका दर्शनासाठी ठेवल्या जातात. मंदिरात वर्षभरात तीन मोठे सप्ताह होतात. कृष्णजन्माष्टमी, संत सावतामहाराज जयंती आणि तुकाराम ीज यावेळी … Read more

वारी अंतरंग : दिंडीप्रमुख-संस्थान कमिटीतील दुवा

  माझे माहेर पंढरी । आहे भीवरेच्या तिरी।। बाप आणि आई ।। माझी विठ्ठल रखुमाई।। आषाढी पायीवारी पालखी सोहळा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचे वैभव आहे. नदी सागराला मिळते आणि सागररूप होते तशीच ही विठ्ठलरुपी भक्तीची गंगा पंढरपूरच्या विठ्ठलाशी एकरूप होते, ती म्हणजे पालखी दिंडीच्या स्वरुपात. लाखोंच्या संख्येने वारकरी विविध संतांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होऊन पंढरपूरला … Read more

माउलींचे आज सातारा जिल्ह्यात आगमन

लोणंद – श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज यांचा पालखी सोहळा उद्या दि. 18 रोजी सातारा जिल्ह्यात प्रवेश करीत आहे. यावर्षी जिल्ह्यात पाच मुक्कामांसाठी पालखी सोहळ्याचे आगमन होते आहे. यापैकी पहिला अडीच दिवसाचा मुक्काम लोणंद येथे असणार आहे. लोणंदमधील मुक्काम आटोपल्यानंतर पुढील मुक्कामासाठी फलटण तालुक्‍यातील तरडगाव हद्दीत माउलींचे पहिले ऊभे रिंगण होऊन संध्याकाळी तरडगाव येथे वैष्णवांचा मेळा … Read more

माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाचे दोन अश्‍व

आषाढी वारीसाठी आळंदी-पंढरपूर प्रवासासाठी चिकोडी तालुक्‍यातील अंकली येथून माउलींचे मानाचे दोन अश्‍व वैशाख शुद्ध दशमीला शितोळे सरकारांच्या राजवाड्यातून प्रस्थान ठेवतात. याबरोबरच मानाची दिंडीही असते. अंकलीतील अंबाबाई मंदिरात पूजन, आरती, जरीपटक्‍याचे पूजन, जरीपटका अश्‍व स्वाराच्या स्वाधीन केल्यावर दोन्ही अश्‍वांसह लवाजमा असलेल्या वाहनाचे पूजन होते आणि हा सोहळा आळंदीकडे मार्गस्थ होतो. माऊलींच्या पालखी सोहळ्यात दोन अश्‍वांचा समावेश … Read more

पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी फलटणमध्ये प्रशासन सज्ज

फलटण  – संत ज्ञानेश्‍वर महाराजांचा पालखी सोहळा मंगळवार, दि. 20 रोजी फलटण तालुक्‍यात प्रवेश करणार आहे. फलटण तालुक्‍यात या सोहळ्यातील एक उभे रिंगण चांदोबाचा लिंब येथे होणार असून, तरडगाव, फलटण व बरड येथे तीन मुक्काम आणि आठ ठिकाणी सोहळ्याचे विसावे आहेत. या सोहळ्याच्या स्वागतासाठी प्रशासनाने सज्ज झाले आहे, अशी माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली. … Read more

संत ज्ञानेश्‍वर माऊलींच्या दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान; कर्मभूमीत रंगले दिंडीतील पहिले रिंगण

नेवासा – ज्ञानोबा-माऊली तुकारामचा गजर करत नेवासा येथील संत ज्ञानेश्‍वर महाराज पैस खांब मंदिर देवस्थानच्या वतीने काढण्यात आलेल्या माऊलींच्या आषाढी वारी पायी पालखी दिंडीचे बुधवारी हभप शिवाजी महाराज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूरकडे प्रस्थान झाले. दिंडीत सुमारे पाचशे वारकऱ्यांचा सहभाग असून माऊली माऊली, असा जयघोष करत संत ज्ञानेश्‍वर माऊलींच्या कर्मभूमी असलेल्या नेवासेनगरीत दिंडीतील पहिले रिंगण रंगले. … Read more

जिल्हाधिकारी जयवंशी यांच्याकडून पालखी सोहळ्यातील तळाची लोणंद येथे पाहणी

लोणंद – श्री.संत ज्ञानेश्‍वर महाराजांचा पालखी सोहळा 18 जुनला नीरा स्नान आटोपून सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. त्या पार्श्‍वभुमीवर साताऱ्याचे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्‍वर खिलारी यांनी पाडेगांव (ता.खंडाळा) येथील नीरा नदी तीरावरील श्री.दत्त घाटावरील नीरा स्नानाच्या स्थळाची रविवारी (दि.28) सकाळी साडेदहा वाजता पाहणी केली. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक … Read more