satara | आदर्श सरपंच गौरव पुरस्काराने सरपंच सौ. सारिका शेंडे सन्मानित

दहिवडी, (प्रतिनिधी) – माण तालुक्यातील भारतीय जनता पार्टी पुरस्कृत शिखर शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच सारिका शेंडे यांना गोवा येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात राष्ट्रीय आदर्श सरपंच गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. बेळगावी येथील नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन व इंदिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटी यांच्यातर्फे सरपंच सारिका शेंडे यांची निवड करत त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. गोव्यातील … Read more

पुणे जिल्हा | महाळुंगे इंगळेच्या उपसरपंच पदी नितीन फलके

महाळुंगे इंगळे, (वार्ताहर)- नितीन फलके यांची महाळुंगे इंगळे ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली. महाळुंगे इंगळे येथील उपसरपंच पदाची निवडणूक सरपंच तथा अध्यासी अधिकारी अर्चना मुकुंद महाळुंगकर यांच्या अध्यक्षतेखाली 2 एप्रिल रोजी घेण्यात आली. विश्वनाथ महाळुंगकर यांनी त्यांच्या उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी निवडणूक घेण्यात आली. उपसरपंच पदासाठी नितीन तानाजी फलके व किशोर विष्णू भालेराव … Read more

सरपंचासह ग्रामपंचायत सदस्य भाजपात

bjp

जामखेड :आमदार प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत जामखेड तालुक्यातील जातेगाव येथील राष्ट्रवादीच्या महिला सरपंचासह ग्रामपंचायत सदस्य व इतरांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टीत शनिवारी जाहीर प्रवेश केला. आमदार शिंदे यांच्या चोंडी येथील निवासस्थानी हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. जामखेड तालुक्यातील जातेगावचे सरपंचपद गेल्या एक वर्षांपासून रिक्त होते. 21 मार्च रोजी सरपंचपदाची निवडणूक … Read more

पुणे जिल्हा | माळेगाव खुर्दच्या सरपंचपदी काटे देशमुख

माळेगाव, (वार्ताहर)- राजकारणात दिलेल्या शब्दाला जागणारी म्हणून संपूर्ण तालुक्यात ओळख असलेल्या ग्रामपंचायत माळेगाव खुर्द (ता. बारामती) येथील सरपंच पल्लवी काटे यांनी ठरल्याप्रमाणे सरपंच पदाचा राजीनामा दिला होता. रिक्त जागेवर सदस्य आदित्य काटे देशमुख यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड केल्याचे निवडणूक अधिकारी तथा मंडळाधिकारी विनोद धापटे यांनी जाहीर केले. याकामी तलाठी अमोल मारग व … Read more

नगर | लाचलुचपत विभागाच्या कारवाईमुळे अधिकारी वर्गात खळबळ

जामखेड, (प्रतिनिधी) – शहरात लाच मागणाऱ्यांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाईचा धडाका लावला आहे. दोनच दिवसांपूर्वी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत वैयक्तिक जलसिंचन विहीर खोदण्याकरिता प्रस्ताव मंजूर करण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच घेताना एका ग्रामसेवकासह सरपंच पतीला रंगेहात पकडण्यात आले होते. या कारवाईमुळे पंचायत समिती विभाग लाच मागणीमध्ये आघाडीवर राहिल्याचे कारवाईतून स्पष्ट झाले आहे. … Read more

पुणे जिल्हा | जलजीवनबाबत सरपंचांनी विशेष दक्षता घ्यावी

पळसदेव, (वार्ताहर) -सरपंच ग्रामसेवकांनी जल जीवन मिशन योजनेचे काम सुरू असताना कामाच्या दर्जाबाबत दक्षता घेतल्यास या योजनेची कामे दर्जेदार होण्यास मदत होईल. सरपंचांनी गावाच्या पुढील तीस वर्षांच्या भविष्याचा विचार करून हस्तांतरानंतर योजना योग्य नियोजन करून व्यवस्थित चालवल्यास या योजनेचा हेतू सध्या होईल व नागरिकांना शुद्ध पाणी नियमित प्यायला मिळेल. त्यामुळे सरपंचांनी या योजनेबाबत विशेष दक्षता … Read more

नगर | महामार्गाच्या कामामुळे गाव अडचणीत

नगर, (प्रतिनिधी)- तालुक्यातील अरणगाव हे राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे अडचणीत सापडले आहे. गावाच्या भौगोलिक रचनेचा गांभार्याने अभ्यास न करता सुरू असलेले रस्त्याचे काम गावकऱ्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरू लागल्याने अरणगांवमधील ग्रामस्थांसह सरपंचांनी नगरमधील कार्यालयात प्रकल्प संचालकांना ्र निवेदन देत उपोषण सुरू केले आहे. अरणगावचे सरपंच पोपटराव पुंड, उपसरपंच विठ्ठल दळवी, ग्रामपंचायत सदस्य सतीश दळवी, नाथा शिंदे, बापू … Read more

पुणे जिल्हा : कुंभारगावच्या उज्ज्वला परदेशी पुन्हा सरपंचपदी

गामविकास मंत्र्यांचा निर्णय : 1 जानेवारीला ठरवले होते अपात्र वालचंदनगर : एक महिन्यापूर्वी अपात्र ठरविण्यात आलेल्या कुंभारगावच्या सरपंच उज्ज्वला परदेशी यांची सरपवंचपदाची खूर्ची कायम राहिली आहे. तससा निर्णय ग्रामविकास मंत्रालयाने दिला आहे. इंदापूर तालुक्यातील कुंभारगांव ग्रामपंचायतीच्या सरपंच उज्वला दत्तात्रय परदेशी यांच्या विरुद्ध शाळेच्या कामकाजामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत गावातील ज्ञानराज कुंडलिक धुमाळ व गोकुळ किसन … Read more

पुणे जिल्हा : कुंजीरवाडीच्या सरपंचपदी हरेश गोठे बिनविरोध

लोणी काळभोर : बहुचर्चित कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी हरेश शामराव गोठे हे बिनविरोध निवडून आले. कुंजीरवाडीच्या तत्कालिन सरपंच अंजू गायकवाड यांनी निवडणूक खर्चाचा हिशेब राज्य निवडणूक आयोगाला निर्धारीत वेळेत सादर केला नव्हता. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख त्यांचे सदस्यत्व रद्द केले होते. तसेच पुढील सहा वर्षांच्या कालावधीसाठी ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहण्यास तसेच ग्रामपंचायत सदस्य … Read more

सातारा : सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवकांसाठी दहिवडीत जिल्हास्तरीय कार्यशाळा

दहिवडी/वडूज : केंद्र शासन व जागतिक बँक पुरस्कृत अटल भूजल योजना अंतर्गत येणाऱ्या माण तालुक्यातील 35 गावांचे व खटाव तालुक्यातील 31 गावांतील सरपंच उपसरपंच ग्रामसेवक पाणीपुरवठा स्वच्छता समितीचे सदस्य भूजल मित्र प्रगतशील शेतकरी यांच्यासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा दि. 3 जानेवारी 2024 रोजी दहिवडी कॉलेज येथे आयोजित करण्यात आली आहे. दि. 3 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 … Read more