केसनंदच्या सरपंच पदी प्रमोद हरगुडे यांची निवड

वाघोली :  केसनंद ग्रामपंचायतच्या सरपंच पदी प्रमोद हरगुडे यांची तर उपसरपंच पदी सुजाता गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली आहे. तत्कालीन सरपंच दत्तात्रय हरगुडे,उपसरपंच रेखा बांगर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर मंडलाधिकारी अशोक शिंदे यांच्या उपस्थितीत सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. यावेळी सरपंच पदी प्रमोद हरगुडे व उपसरपंच पदी सुजाता गायकवाड यांची बिनविरोध … Read more

पुणे जिल्हा : जातेगाव खुर्दच्या सरपंचपदी मासळकर बिनविरोध

शिक्रापूर – जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथील सरपंच नंदा रणपिसे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी नुकतीच निवडणूक घेण्यात आली. निवडीत सरपंचपदी मोनिका गणेश मासळकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. जातेगाव खुर्द येथील सरपंच नंदा रणपिसे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंचपदासाठी निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र आळणे व ग्रामविकास अधिकारी छाया साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली … Read more

तरडोलीच्या सरपंच विद्या भापकर यांचे सरपंचपद रद्द; अविश्वास ठरावाच्या बाजूने 9पैकी 7 सदस्यांचे मत

मोरगाव – बारामती तालुक्यातील ग्रामपंचायत तरडोली येथील विद्यमान सरपंच विद्या हनुमंत भापकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता. यावर आज बारामती तहसिलदार गणेश शिंदे यांनी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. अविश्वास ठरावाच्या बाजूने नऊपैकी सात सदस्यांनी मतदान केल्याने बारामती तहसीलदार यांनी विद्या भापकर यांचे सरपंच पद रद्दबातल ठरविले आहे. तरडोली येथील ग्रामपंचायत … Read more

माजी सरपंच गफ्फार पठाण यांच्याकडून अनोखी कार्तिकी पायी दिंडीची सेवा

जामखेड – शहराची नामांतरे, जातीय-धार्मिक तेढ पसरवणाऱ्या अफवांच्या सोशल मीडियावरील पोस्ट्स, हिंदू आक्रोश मोर्चा, व्हॉट्सअपची स्टेटस अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरून अलीकडच्या काळात हिंसाचाराच्या घटना वाढत चाललेल्या आपण पाहिल्या. मात्र तालुक्यातील पाटोदा ग येथील माजी सरपंच गफ्फार पठाण याला अपवाद ठरले आहे! ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ या सानेगुरुजींच्या ओळींचा प्रत्यक्ष अनुभव येतो ते म्हणजे … Read more

भाऊ असावा तर असा! मोठा भाऊ उपसरपंच झाला म्हणून धाकट्या भावाने हेलिकॉप्टरने गावाला घातली प्रदक्षिणा

Sangli: सांगलीतील दोन भावांची सध्या राज्यभरात चांगलीच चर्चा रंगली आहे. अंकुश यांचे बंधू साहेबराव खिलारे हे गावाचे उपसरपंच झाले. त्यानंतर अंकुश खिलारे यांनी गावाला आणि गावातील राम मंदिराच्या शिखराला हेलिकॉप्टरने प्रदक्षिणा घातली. कुटूंबाचे कित्येक वर्षांपासूनचे स्वप्न पूर्ण झाले म्हणून छोट्या भावाने गावाला हेलिकॉप्टरने प्रदक्षिणा घालत आपला आनंद व्यक्त केला. यामुळे सांगलीतील आटपाडीमधल्या खिलारे बंधूंची सर्वत्र … Read more

पुणे जिल्हा : कळमोडीच्या सरपंचपदी सुनीता गोपाळे

बिनविरोध निवड : आमदार दिलीप मोहितेंच्या हस्ते सत्कार राजगुरूनगर – कळमोडी ग्रामपंचयतीच्या सरपंचपदी सुनीता नामदेव गोपाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गेल्या अडीच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये सरपंच हेमलता बजरंग गोपाळे यांनी ठरल्या प्रमाणे सरपंचपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रिक्त झालेल्या सरपंचपदासाठी नुकतीच विशेष सभा बोलावण्यात आली होती. यावेळी सुनीता गोपाळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची … Read more

पुणे जिल्हा : सहकारमंत्र्यांच्या गावात शिंदे गटाचे कारभारी

मंचर – निरगुडसर (ता. आंबेगाव) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) सरपंचपदी रवींद्र जनार्धन वळसे पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पॅनलचे संतोष बबन टाव्हरे यांचा 135 मतांनी पराभव केला. लोकनियुक्त सरपंच म्हणून विजय झालेले रवींद्र वळसे पाटील याच्या धर्मराज पॅनलचे तीन सदस्य निवडून आले आहेत. तर सहकारमंत्री … Read more

जवळा गावाची सत्ता युवकांच्या हाती, जनतेतून सरपंचपदी सुशील आव्हाड यांचा विजय 

जामखेड –  गेल्या १० दिवसांपासून प्रचाराची रणधुमाळी सुरु होती. जवळा येथील ग्रामपंचायत निवडणूक चांगलीच चुरशीची झाली आहे. प्रशांत शिंदे गटाविरोधात गावातील सर्वच राजकीय नेत्यांनी एकत्र येत शेतकरी ग्रामविकास आघाडी उभी केली तर प्रशांत शिंदे गट यांच्या जवळा ग्रामविकास पॅनेलच्या माध्यमातून सरळ लढत झाली. या प्रतिष्ठेच्या लढतीत प्रशांत शिंदे यांच्या जवळा ग्रामविकास पनल बाजी मारत जनतेतून … Read more

Grampanchayat Result: तेलंगणातील BRS ची महाराष्ट्रात एन्ट्री, ‘इतक्या’ ग्रामपंचायतीवर फडकावला झेंडा

Grampanchayat Election Result 2023 – तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती (BRS) पक्षाने राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून पक्ष मजबूत करण्याचे प्रयत्न सुरु केले आहे. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून राज्यातील 10 ग्रामपंचायतींवर विजय मिळविण्यात त्यांना यश आले आहे. या 10 ग्रामपंचायतींमध्ये भंडारा जिल्ह्यातील 9 आणि बीडमधील एक रेवती देवकी ग्रामपंचायतीचा समावेश … Read more

पुणे जिल्हा : मुळशीत 23पैकी चार ग्रामपंचायती बिनविरोध

पौड – मुळशी तालुक्‍यात जाहीर झालेल्या 23 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीत चार ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात ग्रामस्थांना यश आले आहे. यामध्ये वातुंडे, भांबर्डे, जातेडे आणि डावजे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तालुक्‍यातील 23 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी 321 उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननीमध्ये पाच अर्ज बाद झाले. त्यात वेगरे येथील तीन आणि डावजे, भांबर्डे येथील प्रत्येकी एक असे पाच … Read more