राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कामबंद आंदोलन; सायंकाळी आंदोलन स्थगित

पुणे – ससून रूग्णालयातील परिचारिकांनी जुन्या पेन्शन योजना, रिक्त पदे यासह विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन केले. त्याचा फटका रूग्णसेवेवर झाला. मात्र, सायंकाळी आंदोलन मागे घेतल्यानंतर रूग्णालयातील रूग्णसेवा सुरळीत सुरू झाली. परिचारिकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, रिक्तपदे भरावी, खासगीकरण रद्द करावे, अनुकंप तत्वावरील नियुक्ती विनाशर्त करावी, निवृत्तीचे वय 60 वर्षे करावे, वेतन त्रुटीमधील अन्याय दुर करावा … Read more

PUNE: डॉ. ठाकूर दोषी आढळल्यास कारवाई; ससून ड्रग्ज प्रकरणात गृहमंत्री फडणवीस यांची माहिती

पुणे – ससून रुग्णालयातील ड्रग्ज प्रकरणी तत्कालीन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांची चौकशी सुरू आहे. चौकशीत पुरावे असतील, तर बडतर्फीची कारवाई करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले. ससून रुग्णालयाच्या गेटवरून कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केल्याबाबत सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, ससून रुग्णालयातील वरिष्ठ अधिकारी … Read more

PUNE: आगीतील जखमींमध्ये तीन जणांची प्रकृती गंभीर; तर एकाच्या प्रकृतीत चांगली सुधारणा

पुणे – तळवडे येथील आगीच्या दुर्घटनेतील एका रूग्णाची प्रकृती सुधारत असून, अन्य रूग्णांवर उपचार सुरू आहे. त्यामध्ये तीन रूग्ण जास्त भाजल्यामुळे आणि त्यांच्या फुफ्फुसात स्पार्क गेल्यामुळे प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती ससून रूग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली. आगीच्या दुर्घटनेतील दहा रूग्णांना ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये नऊ महिला आणि पुरूष … Read more

…आणि तिचे लष्करात जाण्याचे स्वप्न राहिले अपुरे

पुणे  – कुटुंबाला हातभार लावण्यासाठी शिक्षण घेत ती काम करत होती…तिचे लष्करात जाण्याचे स्वप्न होते. पण, तळवडे आग दुर्घटनेने आता सारेच संपले. घर चालवण्यासाठी ती त्या कारखान्यातून पैसे मिळवत होती. पण, घात झाला.. आणि या आगीत सुमारे ९० टक्के भाजलेल्या प्रतिक्षा तोरणे हिने शनिवारी प्राण सोडला. मुलगी गेल्याचे समजताच आई-वडिलांनी हंबरडा फोडला. बाळा तू कुठेस … Read more

PUNE: पोलीस उपनिरीक्षकासह दोघे सेवेतून बडतर्फ; ललित पाटीलला पळून जाण्यास मदत भोवली

पुणे – ड्रग तस्कर ललित पाटील याला ससून रुग्णालयातून पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी कोर्ट कंपनीच्या पोलीस उपनिरीक्षक मोहिनी डोंगरे आणि सहायक फौजदार जनार्दन काळे यांना पोलीस दलातून बडतर्फ (शासकीय सेवेतून बडतर्फ) करण्यात आले आहे. ललित पाटील पळून गेल्यानंतर ३ ऑक्टोबर रोजी १० मोहिनी डोंगरे आणि जनार्दन काळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. यापूर्वी कोर्ट कंपनीचे … Read more

PUNE : ललित पाटीलचा आणखी एक आश्रयदाता अटकेत

पुणे- अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डाॅ. प्रवीण देवकाते यास गुन्हे शाखेने अटक केली. ललितला उपचारासाठी दाखल करण्याची शिफारस केल्याप्रकरणी येरवडा कारागृहातील डाॅ. संजय मरसाळे यास गुन्हे शाखेने सोमवारी अटक केली होती. त्यानंतर डाॅ. देवकातेला अटक झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. डॉ. देवकाते हा ऑर्थोपेडिक स्पेशालिस्ट आहे. ललित पाटीलला ऑर्थोपेडिक्स संदर्भातील कोणतेही … Read more

PUNE: ललित पाटीलप्रकरणी सहा जणांविरुद्ध दोषारोपपत्र

पुणे – ड्रग्ज माफिया ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेल्याच्या प्रकरणात सहभागी असलेल्या एकूण १४ पैकी सहा आरोपींविरुद्ध प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कार्यवाही केली आहे. दरम्यान, या प्रकरणात ससून रुग्णालयातल वैद्यकीय अधिकारी डाॅ. प्रवीण देवकाते याचाही सहभाग समोर आला असून, त्यालाही अटक करण्यात आली आहे. दत्तात्रय ढोके … Read more

PUNE: ससूनच्या अधिष्ठातापदी अखेर डॉ. काळे यांची नियुक्ती; वैद्यकीय शिक्षण विभागाचा आदेश

पुणे – ससूनच्या अधिष्ठातापदी पुन्हा एकदा डॉ. विनायक काळे (Dr. Vinayak kale) यांची पुन्हा वैद्यकीय शिक्षण विभागाने नियुक्ती केली असून बुधवारी रात्री उशिरा त्यांची ऑर्डर काढण्यात आली आहे. त्यामुळे, काळे पुन्हा ससूनमध्ये बॅक टू पॅव्हेलीयन येणार असून आज ससूनच्या अधिष्ठाता पदाचा पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. आता काळे पुन्हा एकदा ससूनमध्ये आपला पदभार स्वीकारू शकतात. जानेवारी … Read more

PUNE: ललित पाटील प्रकरण: ससून रुग्णालयातील कर्मचाऱ्याला पोलिसांकडून अटक

पुणे–  ड्रग माफिया ललित पाटील हा ससून रुग्णालयात असताना ड्रग रॅकेट चालवत असल्याचे पोलिसांच्या छाप्यात निष्पन्न झाले. त्यानंतर या प्रकरणात आत्तापर्यंत एकूण 14 जणांना पोलिसांनी अटक केली असून ड्रग तस्करीचे रॅकेट उघडकीस आणले आहे. याप्रकरणात ससून रुग्णालयातील कैद्यांच्या वार्ड क्रमांक 16 मध्ये कैद्यांची बडदास्त ठेवणारा आणि ललित पाटील याला सहाय्य करणारा कर्मचारी महेंद्र शेवते याला … Read more

पुणे – ससून रुग्णालयात लिफ्टमध्ये अडकलेल्या सहा जणांची अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका

पुणे – ससून रुग्णालय (नवीन इमारत) येथे  आज दुपारी ११ च्या सुमारास  लिफ्ट अडकली  आतमध्ये काही इसम अडकले आहेत अशी वर्दि मिळाली.  त्याचवेळी अग्निशमन दलाच्या मुख्यालयातून एक फायरगाडी व एक रेस्क्यु व्हॅन तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. घटनास्थळी पोहोचताच ससून रुग्णालयाच्या नवीन इमारतीत (क्रमांक १००) चौथ्या ते पाचव्या मजल्यादरम्यान लिफ्ट सुमारे तासभर अडकली असून आतमध्ये सहा … Read more