कोल्हापूर, सिंधूदुर्गमध्ये अतिवृष्टी, तर पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पाऊस

पुणे – नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) रविवारी (दि. 9) मुंबईत दाखल झाले असून, त्याने अरबी समुद्राचा उर्वरीत भाग, उत्तर अरबी समुद्राचा काही भाग आणि महाराष्ट्राच्या काही भाग व्यापला आहे. दरम्यान, पुढील 48 तासात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर, सातारा आणि पुणे या जिल्ह्यात मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. मराठवाडा आणि … Read more

सातारा | ‘किसन वीर’वर उद्या ऊस पीक कार्यशाळा

भुईंज – येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर सोमवारी (दि. 10) सकाळी 9 वाजता ‘बदलत्या हवामानात पर्यावरणपूरक खोडवा उसाचे शाश्वत व विक्रमी उत्पादन’ या विषयावर शेतकर्‍यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती व्हाइस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. या पत्रकात म्हटले आहे की, सतत बदलणार्‍या हवामानाचा परिणाम शेतीवर होतो. त्यानुसार शेतकर्‍यांनीही आपल्या … Read more

राजघराण्यातील सदस्यांना केंद्र व राज्यात मंत्रिपद द्या

सातारा – केंद्रात खासदार उदयनराजे भोसले यांना व राज्यामध्ये आमदार शिवेंद्रसिहराजे भोसले यांना मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश करण्याची मागणी भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुवर्णादेवी पाटील यांनी भाजपच्या वरिष्ठ पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सौ. पाटील यांनी नमूद केले आहे की, संविधान बदलण्याबाबतचा अपप्रचार अल्पसंख्याकांमध्ये जाणीवपूर्वक निर्माण केलेले असुरक्षिततेचे वातावरण, आरक्षणावरुन निर्माण … Read more

सातारा | मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मला मुक्त करा

कोयनानगर –  लोकसभा निवडणुकीत सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले उभे नसून शंभूराज देसाई उभे राहिले आहेत. त्यामुळे शिवसेना व देसाई गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मताधिक्य देवून विजयी करावे असा प्रचार मी करुनसुध्दा उदयनराजे भोसले यांना पाटण विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य मिळाले नाही. उदयनराजे भोसले विजयी झाले असले तरी घटलेल्या मताधिक्यामुळे शंभूराज देसाई यांचा पराभव झाला … Read more

उदयनराजेंचा विजय म्हणजे महायुतीच्या शिलेदारांचे कष्ट

सातारा – लोकसभा निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांनी मिळवलेला विजय हा महायुतीतील जिल्ह्यातील सर्व आमदार, ज्येष्ठ नेते यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षांचे सर्व जिल्हाध्यक्ष, सर्व विधानसभा प्रमुख, सर्व विस्तारक, बूथ प्रमुख, विधानसभा समन्वयक व विशेषतः सर्व पक्षांच्या महिला आघाडी पदाधिकारी यांनी घेतलेल्या कष्टाचे फलित आहे. म्हणून छत्रपतींच्या राजधानीत प्रथमच जिल्ह्याच्या इतिहासात भाजपचा … Read more

सातारा पालिकेने हटवले जाहिरात फलक

सातारा – सातारा पालिकेने शहराच्या परिसरात वर्दळीच्या रस्त्यावर असणारे आणि वाहतुकीला अडथळे ठरणारे 22 फलक काढून टाकले. शनिवारी सुट्टीच्या दिवशी सुद्धा पालिकेच्या शहर विकास विभागाने उसंत न घेता ही कारवाई सुरु ठेवली. पोवई नाका ते जिल्हा रुग्णालय तसेच जिल्हा रुग्णालय ते कूपर बंगला यादरम्यान दीड तास झालेल्या कारवाईत हे फलक जप्त करण्यात आले. सातारा पालिकेने … Read more

अजिंक्यतारा हा शेतकऱ्यांची काळजी घेणारा एकमेव कारखाना

सातारा – स्व. भाऊसाहेब महाराजांनी अजिंक्यतारा कारखान्याची उभारणी करून सातारा व आसपासच्या तालुक्यांतील शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीच्या प्रवाहात आणले. आज या कारखान्यामुळे हजारो शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावले आहे. शेतकऱ्यांच्या प्रगतीच्यादृष्टीने कारखाना व्यवस्थापन वेगवेगळ्या योजना, ऊस पीक उत्पादन वाढीसाठी विविध कार्यशाळांचे आयोजन सातत्याने करत असते. यामागे शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त फायदा हाच एकमेव उद्देश आहे. अजिंक्यतारा शेतकऱ्यांची सर्वार्थाने … Read more

सातारा | जिथे येळगावकर तिथे पराभव – सुरेंद्र गुदगे

मायणी – कोणत्याही निवडणुकीत जिथे येळगावकर असतील तो उमेदवार पराभूत होतो, अशी टीका जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी केली. मायणी येथे पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. श्री. गुदगे म्हणाले, गेल्या विधानसभा निवडणुकीत डॉ. येळगावकर यांनी प्रभाकर देशमुख यांचे काम केले. त्यामुळे प्रभाकर देशमुख यांचा निसटता पराभव झाला. आता लोकसभा निवडणुकीत डॉ. येळगावकरांनी रणजितसिंह … Read more

Satara Lok Sabha Constituency : साताऱ्यात उदयनराजे भोसले पिछाडीवर ; शशिकांत शिंदे २६४३ मतांनी आघाडीवर

Satara Lok Sabha Constituency : देशातल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल आता हळूहळू समोर येताना दिसून येत आहेत. त्यातच आता महाराष्ट्रातील काही ठिकाणचे कल हे धक्कादायक स्वरूपात दिसून येत आहे. त्यात साताऱ्यात भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले हे पिछाडीवर पडल्याचे दिसून येतंय सातारा लोकसभा मतदारसंघाचे निकाल हाती येत आहेत. साताऱ्यात शशिकांत शिंदे यांनी आघाडी घेतली आहे तर भाजपचे … Read more

सातारा स्थानकात एसटीची मिठाईचे दुकानाला धडक

सातारा – सातारा मध्यवर्ती बस स्थानकामध्ये शनिवारी सकाळी सहा वाजता चालकाचे नियंत्रण सुटल्याने एसटीने मिठाई दुकानाला धडक दिली. या अपघातामध्ये दुकानातील कामगार देविदास सोनटक्के (वय ३५, रा. लातूर) गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकारामुळे एसटी स्थानकात एकच खळबळ उडाली. काळ आला होता. परंतु, वेळ आली नव्हती असा प्रत्यय … Read more