पुणे जिल्हा | पाबळ फाटा येथे बस थांबा उभारा

सविंदणे (वार्ताहर)-  उरण- पनवेल – नेरळ – भोरगीरी – वाडा – खेड – शिरुर – पाबळ रस्ता राज्य मार्ग १०३ हा पाबळ फाटा शिरूर हद्दीपर्यंत सार्वजनिक बांधकाम उपविभाग शिरूर यांच्या अखत्यारीत असून संबंधीत रस्ता हा “उरण-पनवेल-नेरळ-भोरगीरी-वाडा-खेड-शिरुर-पाबळ रामलिंग-आण्णापूर- निमगाव भोगी – आमदाबाद – टाकळीहाजी- जांबूत- मलठण – कान्हूर मेसाई – कवठे-सविंदणे, अशा विविध ठिकाणी जोडणारा एक … Read more

पुणे जिल्हा : सविंदणेमध्ये दाम्पत्याला मारहाण करत जबरी चोरी ; सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरट्यांकडून लंपास

शिरूर (अरुणकुमार मोटे) : येथील सविंदणे – कवठे रस्त्यावरील नरवडे मळा  याठिकाणी आज पहाटे चार ते पाच अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाची कडी कोयंडा उचकटून एका दाम्पत्यास जबर मारहाण करत जबरी चोरी केली असल्याची माहिती समोर आली आहे. संभाजी नरवडे यांच्यासह त्यांच्या पत्नीला यावेळी चोरटयांनी मारहाण केल्याने दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, संभाजी … Read more

पुणे जिल्हा : सविंदणे येथे अमृतमहोत्सवी वर्षात ज्ञानार्जनासाठी आटापिटा

अरूणकुमार मेटे सविंदणे – देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांत प्रगतीची दालने सर्वसामान्यांसाठी खुली जात असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, पुण्याला खेटून असलेल्या शिरूर तालुक्‍यातील सविंदणे गावाजवळील वस्तीमधील मुलांना ओढ्यातील पाण्यातून जीवघेणी वाट काढत ज्ञानार्जनासाठी शाळेची वाट धरावी लागत आहे. पुणे जिल्हा हा राज्याच्या नकाशावरील प्रगत जिल्हा म्हणून ओळखला जातो. परंतु त्याचबरोबर जागतिक नकाशावर झळकलेला हा प्रगत … Read more

जागतिक महिला दिनी विविध क्षेत्रातील महिलांचा सविंदणे ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान

शिरूर – सविंदणे (ता. शिरूर) येथील सविंदणे ग्रामपंचायतीच्या वतीने महीलादीनी एक आगळावेगळा उपक्रम राबवला आहे. गावामध्ये विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदयमान सरपंच सोनाली खैरे ह्या होत्या. सामाजिक वनीकरण विभागाच्या वनपरीक्षेत्र आधिकारी तनुजा शेलार, बचत गटाच्या तालुका व्यवस्थापक कक्षाच्या शिल्पा ब्राम्हणे, डॉ. कमल राठोड,आरोग्य कमर्चारी, आशा सेविका, अंगणवाडी कर्मचारी, … Read more

पुणे जिल्हा : सविंदणेच्या सरपंचपदी सोनाली खैरे

सविंदणे (प्रतिनिधी) : सविंदणे (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली खैरे यांची तर उपसरपंचपदी भाऊसो लंघे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुक झाल्यानंतर सरपंच, उपसरपंचपदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी सोनाली खैरे यांचा सरपंचपदासाठी व भाऊसो लंघे यांचा ऊपसरपंचपदासाठी एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीनंतर ग्रामस्थांच्या वतीने सरपंच, उपसरपंच यांचा नागरी सत्कार … Read more

अधिकारी-ठेकेदाराच्या हलगर्जीपणा नडला; २ वर्षीय चिमुकलीने गमावला जीव

सविंदणे – दोन महिन्यापूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे शिरूर-नारायणगाव रस्त्यावरील कवठे येमाई येथील काळूबाई नगर येथे अर्धवट स्थितीमध्ये रस्त्याचे काम राहिल्याने या रस्त्याच्या लगत असणाऱ्या संतोष इचके यांच्या घरामध्ये पाणी शिरले होते. ठेकेदाराने त्या ठिकाणी रस्त्यालगत व घराजवळ दोन महिन्यापासून मोठा खड्डा खोदून ठेवला आहे. त्या ठिकाणी बॅरीगेट व इतर कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना केल्या नसल्याने या … Read more

अखेर ‘तो’ बिबटया गजाआड…..

सविंदणे (प्रतिनिधी) : सविंदणे (ता. शिरूर) येथे दोन दिवसापूर्वी एका बिबट्याने आई गोट फार्ममधील सानेन जातीच्या दहा बोकडांवर हल्ला करून त्यांना ठार मारले होते व नऊ बोकडांना गंभीर जखमी केले होते. वन विभागाने याची तात्काळ दखल घेत सदर ठिकाणी पिंजरा लावला होता. पुन्हा एकदा बिबटया हल्ला करण्यासाठी आला असता अलगद पिंजऱ्यामध्ये अडकला. शुक्रवारी रात्री संरक्षक … Read more