पुणे : रजत कुलकर्णीने गाजवला स्वरमंच ; ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’त रंगत

पुणे – तरुण गायक रजत कुलकर्णी यांनी शुक्रवारी सवाईचा स्वरमंच गाजवला. पूर्वार्धात ररजत आणि ज्येष्ठ गायिका पद्मा देशपांडे यांचे गायन झाले. ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’च्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात युवा गायक रजत कुलकर्णी यांच्या अत्यंत तयारीच्या सादरीकरणाने झाली. सवाईच्या स्वरमंचावर या युवा गायकाने प्रथमच संगीतसेवा रुजू केली. मधुवंती रागात त्यांनी ‘हू तो तोरे कारन’ हा ख्याल … Read more

‘आइये सब मिल देवो मुबारक बतिया…’

हजारो रसिकांच्या साक्षीने आणि भारावलेल्या सुरेल वातावरणात “सवाई’ची सांगता पुणे – मनावर अधिराज्य करणारे ख्यातनाम कलाकारांचे सुश्राव्य सादरीकरण… रसिकांना खिळवून ठेवणारी साथसंगत… रसिकांनी भरभरून दिलेली दाद…टाळ्यांचा कडकडाट… डोलणाऱ्या माना… वन्स मोअर… स्टॅंडिंग ओव्हेशन आणि सुट्टीचे औचित्य साधत वाढत जाणारी रसिकांची गर्दी… अशा वातावरणात अभूतपूर्व पर्वणी असणाऱ्या “सवाई’चा समारोप रविवारी झाला. संगीतप्रेमी कलाकार आणि रसिकांचे जणू … Read more

हनुमान लला। मेरे प्यारें लला। सुकुमार लला।।

संगीतमार्तंड पंडित जसराज यांच्या गायनाने “सवाई’त उमटले भक्‍तीसूर : रसिक मंत्रमुग्ध अमिता सिन्हा-महापात्रा, जान्हवी फणसळकर यांच्या धृपद गायनाला उत्स्फूर्त दाद पुणे – धृपद सिस्टर्सच्या गायनाने “सवाई’च्या पहिल्या सत्राची सुरेल सुरुवात झाली. तर संगीतमार्तंड पंडित जसराज यांच्या गायनाने तिसऱ्या दिवसाची सांगता झाली. यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. “धृपद सिस्टर्स’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या अमिता सिन्हा-महापात्रा, … Read more

रसिकांनी अनुभवली वाद्य-सुरांची “रोलरकोस्टर राइड’

पुणे – शास्त्रीय संगीतातील रागांची सुरेल लहेर निर्माण झाली. पाठोपाठ तबला, मृदंग, वीणा, घट या वाद्यांची साथ मिळू लागली. कधी जुगलबंदीने तर, कधी शब्द-सुरांची सुरेल गुंफण करून सादर केलेला अविट कलाविष्कारात रसिक मंत्रमुग्ध झाले. अभिजात कला आणि वैभवशाली परंपरेचा हा सांगितिक “रोलरकोस्टर राइड’ अनुभवताना प्रत्येक रसिक हर्षोल्लासित झाल्याचे स्पष्ट दिसत होते. केवळ पुण्यातीलच नाही तर, … Read more

शास्त्रीय संगीत सर्वांना आवडू शकते

पं. हरिप्रसाद चौरसिया : “षड्‌ज’ शास्त्रीय संगीतावरील लघुपट महोत्सव पुणे -शास्त्रीय संगीत हे सर्वांना निश्‍चितपणे आवडू शकते. मात्र, कोणत्या श्रोतेगटासमोर काय गावे अथवा वाजवावे याचा अभ्यास कलाकाराने करणे आवश्‍यक आहे. तरच वेगवेगळ्या प्रकारच्या रसिकांपर्यंत हे संगीत पोहोचवता येईल, असे मत ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी व्यक्‍त केले. “सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’चा एक महत्त्वाचा भाग … Read more

सवाई गंधर्व महोत्सवांतर्गत लघुपट महोत्सव

“षड्‌ज’, “अंतरंग’ या कार्यक्रमाचे आयोजन : दिवंगत कलाकारांना आदरांजली वाहणार पुणे – सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवांतर्गत यंदा देखील “षड्‌ज’ हा अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित लघुपट महोत्सव आणि “अंतरंग’ या संवादात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दि. 11 ते 14 डिसेंबर या कालावधीमध्ये सवाई गंधर्व स्मारकामध्ये सकाळी 10 ते 12 या वेळेत कार्यक्रम होणार असून हे … Read more

डिसेंबरमध्ये रंगणार सवाई गंधर्व महोत्सव

29 कलाकार आपली कला सादर करणार : वेळापत्रक जाहीर पुणे – आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणारा “सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ यावर्षी दि. 11 ते 15 डिसेंबर या कालावधीत मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडासंकुल येथे होणार आहे. यंदाच्या 67 व्या महोत्सवात तब्बल 29 कलाकार आपली कला सादर करतील. कलाकारांची नावे आणि महोत्सवाचे वेळापत्रक … Read more

11 ते 15 डिसेंबरदरम्यान रंगणार ‘सवाई महोत्सव’

पुणे – भारतीय अभिजात शास्त्रीय संगीताचा अनुपम सोहळा असलेल्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव यंदा 11 ते 15 डिसेंबर रोजी होणार आहे. मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुल येथे हा 5 दिवसीय सांगीतिक सोहळा संपन्न होईल, अशी माहिती महोत्सवाचे संयोजक श्रीनिवास जोशी यांनी दिली. आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे गेली अनेक वर्षे पुण्यात हा महोत्सव आयोजित केला … Read more