परीक्षा घोटाळ्यांवर श्वेतपत्रिका काढावी; विजय वडेट्टीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहून मागणी

मुंबई – राज्यात घेण्यात आलेल्या तलाठी, वनरक्षक पदाच्या तसेच पोलीस भरतीच्या परीक्षेत अनेक गैरव्यवहार झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे राज्य सरकारने या परीक्षा घोटाळ्यांवर श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून केली आहे. तलाठी भरतीबाबत होत असलेले आरोप लक्षात घेऊन ही भरती रद्द करावी. या प्रकरणाची … Read more

राष्ट्रवादीवर 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

भोपाळ :- भोपाळमध्ये बूथ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीका केली आहेय. राष्ट्रवादी कॉंग्रेसवर जवळपास 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. बिहारमध्ये झालेल्या विरोधकांच्या बैठकीवर टीका करताना मोदींनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर निशाना साधला आहे. पंतप्रधानांनी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड निवडणुका आणि 2024 च्या लोकसभा … Read more

Himachal Assembly Election 2022 : कॉंग्रेस म्हणजे भ्रष्टाचार, घोटाळ्यांची हमी – पंतप्रधान मोदी

कांगडा – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी हिमाचल प्रदेशातील कांगडा येथे झालेल्या प्रचारसभेत कॉंग्रेस पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. कॉंग्रेस पक्ष म्हणजे भ्रष्टाचार, घोटाळे यांची हमी आहे. कॉंग्रेस पक्ष म्हणजे अस्थिरतेची हमी आहे. कॉंग्रेस पक्ष म्हणजे विकासकामांमध्ये अडथळ्यांची हमी आहे अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला. पंतप्रधान म्हणाले की, भारतीय जनता पार्टीने आपल्या राजकारणात विकासाला सर्वोच्च प्राथमिकता … Read more

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी एकास 10 वर्ष सक्तमजुरी

कराड – अल्पवयीन मुलीला बेशुद्ध करुन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी युवकाला दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. येथील अतिरीक्त व जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्या.के.एस. होरे यांनी बुधवारी ही शिक्षा सुनावली. सुलतान ऊर्फ तोफीक ईनायतुल्ला पटेल मूळ रा. वाघेरी, ता. कराड सध्या रा. विमानतळ, कराड) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत सरकार पक्षाकडून दिलेली माहिती अशी, दि. 9 … Read more

खटावमधील घोटाळ्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

सातारा – खटाव व खंडाळा तालुक्‍यात आपले सरकार सेवा केंद्र मोबदला या नावाने बनावट खाते काढून ग्रामपंचायतीच्या 45 लाख 17 हजार 814 रुपयांच्या अग्रिम रकमेचा अपहार केल्याच्या तक्रारीवरुन खटाव तालुका संगणक परिचालक जलाउद्दीन पटेल (रा. मुसांडवाडी, ता. खटाव), तालुका व्यवस्थापक विशाल उत्तम सुर्यवंशी (रा. म्हासुर्णे, ता. खटाव), विनोद भानुदास साळुंखे (रा. भादे, ता. खंडाळा) या … Read more

आपले सरकार सेवा केंद्र घोटाळ्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

सातारा (प्रतिनिधी) – खटाव व खंडाळा तालुक्यात आपले सरकार सेवा केंद्र मोबदला या नावाने बनावट खाते काढून ग्रामपंचायतीच्या 45 लाख 17 हजार 814 रुपयांच्या अग्रिम रकमेचा अपहार केल्याच्या तक्रारीवरुन तिघांवर वडूज पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद खटाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उदयसिंह साळुंखे यांनी दिली आहे. खटाव तालुका संगणक … Read more

तब्बल 21 कोटींच्या पीएफवर डल्ला; पीएफ कार्यालयातील कर्मचाऱ्याकडूनच अफरातफर

मुंबई  – करोना काळात अनेकांवर बेरोजगारीची वेळ आल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत मिळावी या हेतूने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या नियमांमध्ये थोडी शिथिलता देण्यात आली होती. या शिथिलतेचा गैरफायदा घेत मुंबईतील कांदिवली येथील पीएफ कार्यालयातील कर्मचाऱ्याने तब्बल 21 कोटी रुपयांवर डल्ला मारला आहे. हा धक्‍कादायक प्रकार लेखा परिक्षणातून उघडकीस आला आहे. देशात मार्च 2020 ते जून … Read more

पोर्नोग्राफिक वेबसाईटव्दारे होणाऱ्या फसवणुकीपासून सावधान

मुंबई – सध्या लॉकडाऊनच्या काळात इंटरनेट वापर करणाऱ्यांची संख्या वाढली आहे, त्यामध्ये मध्यमवयीन व्यक्तींचा मुख्यतः समावेश आहे. अशा व्यक्ती बऱ्याचदा चुकून किंवा अन्य कुतूहलापोटी पोर्नोग्राफिक वेबसाईटवर क्लिक करतात व कालांतराने त्यांना एक मेसेज वा ई-मेल येतो की ज्यात असे लिहिलेले असते ‘आम्हाला माहिती आहे तुम्ही कोणत्या वेबसाईट बघत होतात व आम्ही ते प्रदर्शित करू शकतो … Read more

5 वर्षात शहरातल्या सहकारी बॅंकांमध्ये 1 हजार घोटाळे

सर्वाधिक घोटाळे 2014-15 मध्ये नवी दिल्ली : गेल्या पाच वर्षात शहरी सहकारी बॅंकांमध्ये तब्बल 1 हजार हजार घोटाळे झाले आहेत. त्यामधून 220 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा अपहार केला गेला आहे, असे रिझर्व बॅंक ऑफ इंडियाने म्हटले आहे. माहितीच्या अधिकारात केलेल्या अर्जाल दिलेल्या उत्तरात ही माहिती मिळाली आहे. सन 2018-19 मध्ये एकूण 127.7 कोटी रुपयांच्या फसवणूकीची … Read more