पुणे जिल्हा : लाभाच्या योजना तळागात पोहोचवा

शासकीय अधिकारी, कर्मचार्‍यांना सहकारमंत्री वळसे पाटील यांचे आवाहन मंचर  – केंद्र व राज्य शासनाच्या वतीने गरीब आणि गरजूंसाठी विविध लाभाच्या योजना असून त्याचा लाभ तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी जनजागृती करावी, असे आवाहन सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले. आंबेगाव तालुका पंचायत समिती (घोडेगाव) येथे घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत उपस्थित अधिकार्‍यांना मार्गदर्शन करताना सहकारमंत्री … Read more

पुणे जिल्हा : दिव्यांगांनी योजनांचा लाभ घ्यावा – बाळासाहेब चांदेरे

दहा हजार दिव्यांग मतदारांची नोंद करणार पौड – राज्य शासनाने दिव्यांग मंत्रालयाची स्थापना करून दिव्यांग बांधवांना समाजात सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. दिव्यांगांसाठी सुरू केलेल्या विविध कल्याणकारी योजनांचा त्यांनी लाभ घेतला पाहिजे. भोर विधानसभा मतदार संघात दिव्यांग मतदारांची नोंदणी करण्याचे काम चालू आहे. या मतदार संघात दहा हजार दिव्यांग मतदारांची नोंद करणार असल्याचे … Read more

सातारा : शासकीय योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न – विराज नाईक

शिराळा – मानसिंगभाऊ लोककल्याण अभियानातून वैयक्तिक लाभाच्या शासकीय योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी अखंडपणे प्रयत्न सुरू असून आत्तापर्यंत अनेकांना त्याचा लाभ मिळवून दिला आहे, असे प्रतिपादन विराज ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष विराज नाईक यांनी केले. सागाव, ता. शिराळा येथे मानसिंगभाऊ लोककल्याण अभियान मार्फत संजय गांधी निराधार, श्रावणबाळ व इतर तत्सम वैयक्तिक लाभाच्या शासकीय योजनांचा लाभ पात्र … Read more

“दत्तक शाळा’ योजनेबाबत शिक्षक संघटनांची चुप्पी

संतोष पवार सातारा –  राज्यातील शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व माध्यमांच्या शाळांसाठी “दत्तक शाळा योजना’ राबवण्यास मंत्रिमंडळ बैठकीत नुकतीच मान्यता देण्यात आली. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत असून, नामकरणाच्या दरफलकांमुळे सरकारी शाळांवर आता खासगी व्यक्तींची नावे झळकणार आहेत. सरकारने उदात्त हेतूने ही योजना सुरू केली असली, तरी त्यामुळे सरकारी शाळांचे भवितव्य … Read more

PUNE: कल्याणकारी योजनांची उत्पन्नमर्यादा वाढणार; 16 वर्षांनी होतोय नियमांत बदल

पुणे – मनपा समाज विकास विभागाच्या माध्यमातून महिला, बालके, आर्थिक दुर्बल घटकांसह, दिव्यांग तसेच युवक कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जातात. त्या योजनांसाठीची उत्पन्न मर्यादा वाढवण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या धर्तीवर हा निर्णय होत आहे. त्यामुळे योजनांची व्याप्ती वाढणार असून, लाभार्थींची संख्याही वाढणार आहे. महापालिकेच्या अंदाजपत्रकात विविध कल्याणकारी योजनांसाठी पाच टक्के निधी राखीव ठेवला जातो. यात … Read more

स्मारकांचे व्हा पालक ! संवर्धनासाठी राज्य सरकारची योजना; गडकोटांचाही समावेश

  प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 7 – राष्ट्रपुरुषांची स्मारके तसेच गडकोटांची देखभाल व संवर्धन अधिक चांगल्या पद्धतीने व्हावे, या उद्देशाने पुरातत्त्व खात्याने पालकत्व योजना आणली आहे. त्यानुसार, यासाठी इच्छुक असलेली कोणतीही व्यक्ती अथवा संस्था याचे पालकत्व स्वीकारु शकतील. हे पालकत्व पाच वर्षांसाठी असेल. या योजनेनुसार आतापर्यंत पाच स्मारके व किल्ल्यांचे पालकत्त्व स्वीकारण्यात आले आहे. त्यामध्ये … Read more

विमान कंपन्यांची हवाहवाई…, देशांतर्गत प्रवासी संख्या विविध योजनांमुळे वाढली

पुणे – करोना काळात हवाई वाहतूक क्षेत्राला मोठा आर्थिक फटका बसला आहे. निर्बंध शिथिल झाल्यानंतर प्रवासी हवाई वाहतूक करणाऱ्या विविध खासगी कंपन्यांनी प्रवाशांसाठी योजना आणल्या. याचाच परिणाम म्हणून या महिन्यांत मुुंबई तसेच पुणे विमानतळावरून होणाऱ्या उड्डाणांतून देशांतर्गत प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली. देशभरातील विमानतळांवरून रविवारी (दि.17) तब्बल 4 लाख 50 हजार पेक्षा अधिक प्रवाशांनी देशांतर्गत प्रवास … Read more

#Budget2022 | अल्पसंख्याकांच्या सर्वांगीण विकासासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी – राज्यमंत्री विश्वजीत कदम

मुंबई : राज्यातील अल्पसंख्याकांच्या विकासासाठी राबवित असलेल्या कल्याणकारी धोरणांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी विविध योजना तयार करून अल्पसंख्याक विकास विभागामार्फत त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे. या विभागाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या 179 पदांचा आकृतीबंध मान्य करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या आस्थापनेवर 14 पैकी 11 पदे भरली असल्याची माहिती आहे. तसेच महाराष्ट्र राज्य … Read more

आदिवासी विभागाच्या योजना प्रभावीपणे राबवा – राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

नागपूर : आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्व घटकांनी प्रभावीपणे काम करणे आवश्यक आहे. अद्यापही अनेक योजना आदिवासींपर्यंत पोहोचल्या नाहीत. दुर्गम भागातील आदिवासी गावे-तांडे, पाड्यापर्यंत शासकीय वैयक्तिक व सामूहिक लाभाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी जनजागृती करावी, असे आदेश राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिले. नागपूर येथील अपर आदिवासी आयुक्त कार्यालयात राज्यमंत्री तनपुरे यांनी बैठक घेतली. तुमसर … Read more

महिला सक्षमीकरणासाठीच्या योजनांना मिळणार ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावासाचे सहकार्य – मंत्री यशोमती ठाकूर

मुंबई : महिलांचे आर्थिक, सामाजिक सक्षमीकरण करणे, त्यांना दर्जा आणि संधीची समानता उपलब्ध करुन देण्यासाठी महिला व बालविकास विभाग विविध उपक्रम राबविते. हे उपक्रम राबविण्यासाठी ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावासाचे सहकार्य मिळणार आहे,असे महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले. ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावासाचे कॉन्सुलेट जनरल मायकल ब्राऊन यांनी महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती … Read more