शिक्षकांच्या २२ हजार जागांची भरती; पवित्र पोर्टलवर आज प्रसिद्ध होणार जाहिराती

पुणे – राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती करण्यात येणार आहे. याअंतर्गत २२ हजार जागांसाठी सोमवारी (दि.५) पवित्र पोर्टलवर जाहिराती प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. यातून शिक्षक भरतीला प्रत्यक्ष मुहूर्त सापडणार आहे. शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी-२०२२ चे ऑनलाइन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. या चाचणीसाठी एकूण … Read more

PUNE: राज्यातील १९ हजार ७९३ विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा मिळणार

पुणे – बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायद्यातील तरतुदीनुसार १९ हजार ७९३ विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा किंवा भत्ता प्रदान करण्यासाठी ३ ह्जार ३६४ वसतिस्थाने घोषित करण्यात आलेली आहे. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या या निणर्यामुळे कोणतीही शाळा बंद केली जाणार नाही, असा दावाही करण्यात आला आहे. केंद्र शासनाचा बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क कायदा, … Read more

‘दिशादर्शिका’ शालेय शिक्षण विभागास उपयोगी ठरतेय – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

पुणे – ग़ेल्या वर्षापासून शालेय शिक्षण विभाग दिशादर्शिका प्रकाशित करत असुन ही दिशादर्शिका शालेय शिक्षण विभागास उपयोगी ठरत आहे, असे मत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. शालेय शिक्षण विभागातील कार्यालयांच्या कामकाजाची वार्षिक रूपरेषा ठरवणाऱ्या आणि या विभागाला दिशा देणाऱ्या शैक्षणिक कॅलेंडर म्हणजे दिशादर्शिकेचे प्रकाशन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे हस्ते झाले. हा … Read more

शाळाबाह्य बालकांच्या सर्वेक्षणाची माहितीच सादर होईना

डॉ.राजू गुरव पुणे – राज्यातील शाळाबाह्य बालकांचे सर्वेक्षण होऊन दोन महिने लोटले. मात्र, अद्यापही शिक्षणाधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालकांकडून परिपूर्ण माहितीच प्राथमिक शिक्षण संचालनालाकडे सादर केली जात नसल्याची बाब उघड झाली आहे. वारंवार आदेश बजावूनही संबंधित अधिकारी माहितीच सादर करीत नाहीत, ही अत्यंत खेदजनक बाब ठरली आहे. यामुळे शाळाबाह्य बालकांच्या सर्वेक्षणांचा अहवाल तयार करण्यात खोडा निर्माण … Read more

नुसत्याच बैठका नकोत; ठोस कृती हवी; शालेय शिक्षण विभागात पहिले पाढे पंच्चावन्न

पुणे – शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या सतत आढावा बैठका घेण्याचा शालेय शिक्षणमंत्री, प्रधान सचिव यांनी धडाकाच लावलेला आहे. बैठकांमध्ये तासन्‌तास चर्चा केली जात असते. अधिकाऱ्यांना सूचना, आदेशही दिले जातात. पण त्याची सक्षमपणे अंमलबजावणी करण्याचा अधिकाऱ्यांना मात्र विसरच पडतो. पहिले पाढे “पंचावन्नच’ अशी अधिकाऱ्यांची अवस्था कायम असल्याचे आढळून येते. नुसत्याच बैठका घेऊन फारशी काहीच फलनिष्पत्ती होत … Read more

ZP Schools : शिक्षकांची आंतरजिल्हा बदली बंद होणार; शालेय शिक्षण विभागाचा निर्णय

मुंबई :- जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांची आंतरजिल्हा बदली संपूर्णत: बंद करण्याची तरतूद ग्रामविकास विभागाने त्यांच्या बदली धोरणामध्ये करावी, असा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. तर नव्याने नियुक्ती झाल्यानंतर सदर शिक्षकांस जिल्हा बदलीचा हक्क राहणार नाही. राज्यात शासनाने विहीत केलेल्या कार्यपद्धतीनुसार शिक्षक भरतीसाठी जिल्हा परिषदांतर्गत रिक्त पदांची संख्या सुनिश्‍चित करताना तसेच भरतीनंतर शिक्षकांना द्यावयाच्या … Read more

पुणे : 3 लाखांवर विद्यार्थ्यांच्या माहितीत ‘गडबड’

पुणे, (डॉ. राजू गुरव)- शालेय शिक्षण विभागाच्या सरल प्रणालीअंतर्गत स्टुडंट पोर्टलमध्ये तब्बल 3 लाख 15 हजार 456 विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीसह इतर माहितीत त्रुटी आढळल्या आहेत. यात बहुसंख्य विद्यार्थ्यांची दुबार नोंदणी झाल्याची गंभीर बाब उघड झालेली आहे. काही शाळांनीही विद्यार्थ्यांची माहिती भरताना गडबडी केल्या आहेत. शाळा अनुदानासह पोषण आहार, गणवेश, पाठ्यपुस्तके वाटप या विविध योजनांसाठी विद्यार्थी … Read more

शिक्षक दिनानिमित्त “थॅंक अ टिचर’ अभियान

पुणे – राज्यात करोना पार्श्वभूमीवर यंदा 5 सप्टेंबर रोजी “शिक्षण दिन’ साजरा होणार नाही. दरम्यान, शालेय शिक्षण विभागाने “थॅंक अ टिचर’ हे विशेष अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यानिमित्ताने ऑनलाइन विविध उपक्रम, स्पर्धा घेण्यात येणार आहे. “शाळा बंद शिक्षण सुरु’ या उपक्रमाच्या यशोगाथांचे सादरीकरण केंद्र, तालुका, जिल्हास्तरावर होणार आहे. दुर्गम व शहरी भागांतील शिक्षकांसोबत काही … Read more

कोणताही पाठ कायमस्वरुपी वगळला नाही; फक्त चालू वर्षासाठीच पाठ्यक्रम कमी

शालेय शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण मुंबई : शालेय वर्ष २०२० – २१ साठी कोरोना (कोविड १९) प्रादुर्भावाच्या पार्शभूमीवर शालेय पाठ्यक्रम कमी करण्यात आलेला आहे. यासंदर्भाने समाजशास्त्र व इतिहास विषयाच्या अनुषंगाने काही वर्तमानपत्रामध्ये दिशाभूल करणारे व संभ्रम निर्माण करणारे वृत्त प्रकाशित करण्यात आले आहे. यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाने सविस्तर खुलासा केला आहे. कमी करण्यात आलेला पाठ्यक्रम स्वयंअध्ययनासाठी … Read more

शालेय शिक्षण विभागातील पद भरतीस बंदी

पुणे – राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने लॉकडाऊनही वाढविण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर अर्थव्यवस्था अडचणीत आल्याने शालेय शिक्षण विभागाने पद भरतीसाठी बंदी घालण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. मार्च महिन्यापासून राज्यातील विविध ठिकाणी करोनाचा प्रसार वाढतो आहे. खबरदारीचा उपाय म्हणून 24 मार्चपासून लॉकडाऊनही करण्यात आले. या निर्बंधांमुळे राज्याच्या विविध कर व करेत्तर महसूलात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे … Read more