किल्ल्यांच्या संवर्धनाच्या कामाचे नियंत्रण मुख्यमंत्री सचिवालयामार्फत

मुंबई  – गडकिल्ल्यांचे पावित्र्य जपत, त्याच्या ऐतिहासिक आणि पुरातत्व वारशाला कोणताही धक्का न लावता या किल्ल्यांच्या खालील परिसरात सुविधा निर्माण कराव्यात व तिथे पर्यटन केंद्र उभारून पर्यटकांना त्या वैभवशाली वारशाची माहिती द्यावी, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिल्या. या किल्ल्यांच्या जतन आणि संवर्धनाच्या कामाचे नियंत्रण मुख्यमंत्री सचिवालयातील संकल्प कक्षातून व्हावे, असेही निर्देश … Read more

तेलंगणाचे सचिवालय पाडण्यास स्थगिती

    हैदराबाद- तेलंगणाच्या सचिवालयाची जुनी इमारत पाडून तेथे नवीन इमारत उभी केली जाणार आहे. पण ही जुनी इमारत पाडण्यास हायकोर्टाने स्थगिती दिली आहे. सोमवारी या विषयावर पुन्हा सुनावणी होऊन निर्णय घेतला जाणार आहे. सचिवालयाची सध्याची इमारत ही दहा लाख चौरस फूट जागेवर उभी आहे. ती तडकाफडकी पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी कोणतीही कायदेशीर … Read more

राज्यसभेत करोनाचा शिरकाव; एक अधिकारी पॉझिटिव्ह

नवी दिल्ली – देशभरात करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अशात सरकारी सेवेतील अधिकारीही करोनाच्या विळख्यात अडकत आहेत. राज्यसभेच्या सचिवालयातही एका अधिकाऱ्याला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. A part of Rajya Sabha secretariat in Parliament sealed for sanitation after an official was detected #COVID19 positive: Sources — ANI (@ANI) May 29, 2020 … Read more

रविंद्र वायकर मुख्यमंत्री सचिवालयाचे मुख्य समन्वयक

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंत्रालयात भेटण्याकरिता संपूर्ण राज्यातून मोठ्या प्रमाणावर नागरिक निवेदने, तक्रारी, गाऱ्हाणी घेवून येत असतात. अशा नागरिकांच्या समस्या समजावून घेवून मार्गी लावण्याकरिता मुख्यमंत्री सचिवालयात ज्येष्ठ व अनुभवी व्यक्तीची आवश्‍यकता होती. त्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयामध्ये प्रमुख समन्वयक म्हणून आमदार रविंद्र वायकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. जिल्हास्तरावर … Read more

नवी मुंबईत पहिले मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरु

नवी मुंबई : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घोषणा केल्यानुसार जिल्हा पातळीवर मुख्यमंत्री कार्यालय सुरु करण्यात येणार आहे. त्याची सुरुवात नवी मुंबईतून करण्यात आली आहे. नवी मुंबईत बेलापूर येथील कोकण भवनमध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती विभागीय महसूल उपायुक्त सिद्धाराम शालीमठ यांनी दिली. सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन प्रश्न, सरकारस्तरावर असलेली कामे, त्यासंदर्भात प्राप्त … Read more