दिल्लीच्‍या सीमेवर शेतकऱ्यांना रोखले; कलम 144 लागू, एनटीपीसी येथे शेतकऱ्यांची निदर्शने

नवी दिल्ली – नोएडा आणि ग्रेटर नोएडा विकास प्राधिकरणाने संपादित जमिनीचा वाढीव मोबदला आणि भूखंड मिळावेत या मागणीसाठी शेतकरी संघटना डिसेंबर 2023 पासून आंदोलन करत आहेत. या शेतकरी आंदोलनाने गुरुवारी अधिक तीव्र रुप धारण केले. नोएडा प्राधिकरणाविरोधात संपावर बसलेल्या शेतकऱ्यांनी दिल्लीच्या दिशेने कूच केले. यावेळी पोलिसांनी दिल्‍लीच्‍या सीमेवर शेतकऱ्यांना रोखल्‍याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण … Read more

गोरक्षा दलाचा सदस्य, 2 लोकांना जिवंत जाळल्याचा आरोप… मेवात हिंसाचारात ज्याचे नाव समोर आले तो मोनू मानेसर कोण आहे?

मोनू मानेसरचा केवळ एक व्हिडिओ आणि हरियाणाच्या मेवात आणि नूह भागात त्याच्या उपस्थितीच्या अफवेने दोन समुदायांमध्ये मोठा गोंधळ उडाला. दोन्ही बाजूंनी जोरदार दगडफेक झाली. अनेक वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. नूह हिंसाचारात दोन होमगार्ड आणि तीन नागरिक ठार झाले. तर 10 हून अधिक पोलीस जखमी झाले. सोहना येथेही जाळपोळ झाली. हिंसाचार भडकण्याचे कारण भिवानी … Read more

हरियाणामध्ये हिंसाचार, अनेक शहरांमध्ये कलम 144 लागू, शाळा बंद, दोन होमगार्डसह तिघांचा मृत्यू

नवी दिल्ली – मेवात, गुरुग्राम, फरिदाबाद आणि रेवाडी हे हरियाणातील चार जिह्ल्यात  वाद आणि दगडफेकीनंतर निर्माण झालेला तणाव निर्माण झाला आहे. यामुळे येथे कलम 144 कलम लागू करण्यात आली आहे. मेवातच्या नूह भागातून हा तणाव सुरू झाला. हिंदू संघटनांनी काढलेल्या ब्रजमंडल यात्रेदरम्यान दोन गटात हाणामारी झाली. यानंतर काही वेळातच दगडफेक आणि पन्नास गाड्या पेटवण्यात आल्याच्या … Read more

नगर-कल्याण महामार्गावरील माळशेज घाटात 144 कलम लागू

माळशेज – नगर-कल्याण महामार्गावरील माळशेज घाट हा पावसाळ्यात पर्यटनासाठी राज्यभर प्रसिध्द आहे. गत काळात घाटात अनेकदा अप्रिय घटना घडून जीवितहानी झाल्याने व येथील शांतता, कायदा, सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी तसेच जीवितहानी टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून 30 ऑगस्टपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आल्याची माहिती टोकावडे पोलिसांनी दिली. दरवर्षी पावसाळ्यात घाटातील धबधब्यांखाली भिजण्याचा आनंद … Read more

कर्नाटक : टिपू सुलतान-सावरकरांच्या नावाने तणाव, कलम 144 लागू

बेंगळुरू – कर्नाटकातील यादगिरी जिल्ह्यात टिपू सुलतानच्या नावावरून वर्तुळाचे नाव देण्यावरून गदारोळ झाला. हिंदुत्ववादी संघटनांनी सावरकर सर्कल असे नामकरण करण्याची मागणी केली आणि निदर्शने करण्याचा इशारा दिला, त्यानंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाली. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून अतिरिक्त आयुक्त शालूम हुसैन यांनी संपूर्ण जिल्ह्यात कलम 144 लागू केले आहे. सोबतच मोठा पोलीस बंदोबस्तही घटनास्थळी तैनात करण्यात … Read more

मुंबईत 2 जानेवारीपर्यंत निर्बंध…वाचा यादी

मुंबई – मुंबई पोलिसांनी २ जानेवारीपर्यंत शहरात संचारबंदी लागू केली आहे. सार्वजनिक सुव्यवस्थेत कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून कलम 144 लागू करून पाच किंवा त्याहून अधिक लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय 4 डिसेंबर ते 2 जानेवारीपर्यंत शस्त्रांवरही बंदी घालण्यात आली आहे. यादरम्यान सार्वजनिक ठिकाणी घोषणाबाजी आणि कोणत्याही प्रकारची निदर्शने करण्यासही … Read more

#PimpriChinchwad : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात कलम कलम 144 लागू

पुणे : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात हत्यारांचे उत्पादन, विक्रीसाठी साठा व विक्रीस प्रतिबंध करण्यासह समाजविघातक व दहशतवादी कृत्यांना आळा घालण्यासाठी भ्रमणध्वनी कार्ड विक्रेते, कामगार कंत्राटदार आणि लॉज, हॉटेल, विश्रागृहाच्या मालकांवर निर्बंध घालण्यासाठी 2 जानेवारी 2023 पर्यंत भारतीय फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम 144 प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी जारी केले आहेत. … Read more

पुण्यातील चांदणी चौक परिसरात कलम 144 लागू

पुणे – चांदणी चौकातील जुना उड्डाणपुल पाडण्यापूर्वी शनिवारी (दि. 1) रात्री 11 वाजता या चौकातील सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. त्यानंतर संबधित कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून पुल पाडण्यासाठी आवश्‍यक यंत्रणा व्यवस्थित झाली आहे की नाही? याची पाहणी करून खात्री झाल्यावरच रात्री 1 ते 2 वाजेदरम्यान ब्लास्ट करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील अर्धा तासाता तेथील परिस्थिती … Read more

कर्नाटक: ‘टिपू सुलतान विरुद्ध सावरकर’ पोस्टरवरून वाद; शिवमोग्गा शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

नवी दिल्ली : कर्नाटकातील शिवमोग्गा येथे दोन गटांमध्ये चांगलीच हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी शिवमोग्गा शहरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, हा गोंधळ टिपू सुलतान विरुद्ध स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या नावावरून … Read more

तेलंगणात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून तणाव, निजामाबाद परिसरात कलम 144 लागू

निजामाबाद – छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याच्या मुद्यावरुन तेलंगणामध्ये तणाव निर्माण झाला आहे. तेलंगणच्या निजामाबाद जिल्ह्यातील बोधन गावात तणावाची स्थिती निर्माण झाल्यामुळे तेथे जमावबंदी लागू करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठीची प्रक्रिया राबवावी लागेल. पुतळा उभारण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल, असे निजामाबादचे पोलीस आयुक्त के. आर. नागाराजू यांनी म्हटले आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा … Read more