पिंपरी | खते, बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – मावळ तालुक्यातील खरीप भात पिकाचे बी बियाणे खरेदी करण्यासाठी मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. शेतकरी विविध दुकानांमधून खते, बी-बियाणे खरेदी करत आहेत. यावर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यापासून मान्सूनचा पाऊस महाराष्ट्रात सुरू होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आलेली आहे. मावळ तालुक्यात हा पाऊस पाच ते दहा जून च्या दरम्यान येईल असा … Read more

पुणे जिल्हा: बियांपासून तयार केली दीडशे झाडे

पेठ, (ता. आंबेगाव) ः उत्तमरीत्या जोपासलेली झाडे दाखवताना महिला शेतकरी जयश्री धुमाळ. पेठ – पेठ (ता. आंबेगाव) येथे जवळपास दीडशे झाडांची लागवड करून त्यांचे संगोपन जयश्री दिलीप धुमाळ आणि दिलीप बाबाजी धुमाळ यांनी केली आहे. यामधील अनेक झाडे ही बियापासून तयार केलेली असून त्यात चिंच, जांभूळ, आंबा, उंबर यांसारख्या अनेक झाडांचा समावेश आहे. येथे एकंदरीत … Read more

बियाणे, खतांच्या तक्रारीसाठी व्हॉट्‌सऍप क्रमांक जारी…; कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचा मोठा निर्णय

मुंबई – बियाणे, खते, कीटकनाशके यासंदर्भात शेतकऱ्यांना नेहमीच अडचणीचा सामना करावा लागतो. याची तक्रार कुठे करायची, हे अनेकदा शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला असतो. राज्य सरकारने आता यासाठी पावले उचलली आहेत. खते, बियाणे अथवा किटकनाशके यासंदर्भात तक्रार करण्यासाठी राज्य सरकारमार्फत लवकरच व्हॉट्‌स ऍप क्रमांक जारी करण्यात येणार आहे. याबाबतची पावले उचलली जात आहे. राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे … Read more

शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे, खते खरेदी करावीत

पुणे :- चालू खरीप हंगामातील पेरणीच्या अनुषंगाने राज्यात १६ लाख ८२ हजार २४५ क्विंटल म्हणजे ८७ टक्के बियाण्याचा पुरवठा झाला असून शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करावीत, असे आवाहन राज्याचे कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे. राज्याचे सरासरी पर्जन्यमान ३१४.३ मिमी असून आत्तापर्यंत २२७.३ मिमी एवढा पाऊस झाला आहे. खरीप हंगामासाठी ४६.७ मे. टन … Read more

शेतीचीही ‘महागाई’; बी-बियाणे, इंधन आणि मजुरीतही वाढ

वाल्हे (समीर भुजबळ) – सिलिंडर यासह भाजीपाला, धान्य एकुणच महागाई वाढली असल्याची ओरड विशेषत: शहरीभागातून अधिक प्रमाणात होत आहे. परंतु, शेतकरी या महागाईसह “शेतीच्या महागाईला’ही सामोरा जात आहे. शेती चांगल्या पद्धतीने केली तर फायद्याची ठरते. परंतु, गेल्या काही वर्षात शेती करण्याचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पीक ऐन हंगामात आलेले असताना मजूर मिळत नाहीत. त्यातच … Read more

नांदेड | बियाणांच्या परिपूर्ण वितरणासाठी मंत्रालय पातळीवर लवकरच धोरणात्मक निर्णय – अशोक चव्हाण

नांदेड :- जिल्ह्यातील पेरणीमध्ये असलेली विविधता, विविध पिकांसमवेत सोयाबीन पिकांकडे शेतकऱ्यांचा अधिक असलेला कल कृषी विभागाने लक्षात घेणे आवश्यक आहे. गतवर्षी सोयाबीन पेरणीमध्ये जी आव्हाने निर्माण झाली ती लक्षात घेता या खरीप हंगामात शेतकऱ्यांना पेरणीसाठी बी-बियाणांची सहज उपलब्धता व्हावी यासाठीही दक्षता घेतली पाहिजे. आजच्या स्थितीत जिल्ह्यात एकूण सोयाबीन बियाणांची अपेक्षित मागणी लक्षात घेता जवळपास 50 … Read more

बोगस बियाणे विक्री केल्यास शासन कठोर पावले उचलणार

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना बोगस बियाणे विक्री संबंधातील वाढत्या तक्रारी ही बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची असून याबाबत शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या संबधित कंपन्यावर गुन्हे दाखल केले जातील, असे कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत सांगितले. सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गेल्या रब्बी हंगामात एका कंपनीमार्फत सप्टेंबर, 2020 कालावधीत सुमारे 8 टन कांदा बियाणे खरेदी केले … Read more

सोयाबीनचे निकृष्ट बियाणे; ‘कृषीधन’वर गुन्हा दाखल

जुन्नर तालुक्‍यातील शेतकऱ्यांकडून तक्रार पुणे – पेरणीनंतर सोयाबीनचे पीक न हाती आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याप्रकरणी जुन्नर तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार दिली. यावर कृषी विभागाने फिर्याद दिल्यानंतर सोयाबीनच्या बियाणे विक्री करणाऱ्या कृषीधन प्रा. लि. कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुन्नर तालुक्‍याचे कृषी अधिकारी सतीश कारभारी शिरसाठ (58 ) यांनी यासंदर्भात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद … Read more

खते, बियाणे, औषधे परवाना नूतनीकरणाच्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा आठवडाभरात करावा

मुंबई : खते, बियाणे, औषधे यांचे परवाना नूतनीकरण व नवीन परवाने प्रलंबित प्रकरणांचा निपटारा आठवडाभरात करावा. त्यासाठी कालबध्द नियोजन करण्याच्या सूचना कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या आहेत. कृषी विभागातील विषयनिहाय आढावा बैठक नुकतीच कृषीमंत्र्यांच्या दालनात घेण्यात आली. यावेळी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरज कुमार यांच्यासह राज्यातील संचालक सर्व विभागीय कृषी सहसंचालक उपस्थित होते. बैठकीत … Read more

‘गूढ’ बियाण्यांबाबत भारत सावध

उद्योग, शेतकरी आणि राज्यांना सावधगिरीच्या सूचना नवी दिल्ली – काही देशात संशयास्पदरित्या, ऑर्डर न देता नागरिकांना बियाण्यांचे पार्सल मिळत आहे. असा प्रकार भारतात होऊ नये, यासाठी बियाणे उद्योग, संशोधन संस्था, राज्य सरकार आणि शेतकऱ्यांनी सावध राहावे, अशा सूचना केंद्र सरकारने जारी केल्या आहेत. अशा प्रकारच्या गूढ बियाण्यांचा वापर केल्यास भारतीय जैववैविधतेला धोका पोहोचू शकतो. ही … Read more