पुणे जिल्हा | शिरूरचा खासदार राउंडवर येणारा नको तर ग्राउंडवर येणारा पाहिजे

राजगुरूनगर, (प्रतिनिधी): “शिरूरचा खासदार राउंडवर येणारा नको तर ग्राउंडवर येणारा पाहिजे”. असे आवाहन माजी खासदार व महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राजगुरुनगर येथे केले. राजगुरूनगर येथे महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ भाजप, सेना, राष्ट्रवादी काँग्रेस व सहयोगी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आज रविवारी (दि.७) रोजी घेण्यात आला. या वेळी शिवाजीराव आढळराव पाटील … Read more

“फेकलेल्या तुकड्यांवर जगणारे” म्हणणाऱ्या संजय राऊतांना रामदास कदमांचे प्रत्युत्तर; म्हणाले,“पवारांच्या तुकड्यांवर कोण जगतंय…”

मुंबई : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपा-शिवसेनेमधील (शिंदे गट) जागावाटपावरून केलेल्या वक्तव्यानंतरराज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. त्यावर खासदार संजय राऊत यांनी “फेकलेल्या तुकड्यांवर जगणारे हे लोक आहेत” अशा शब्दात शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. यावर आता शिंदे गटाकडून सडेतोड प्रत्युत्तर मिळाले आहे. शिवसेना आमदार (शिंदे गट)  रामदास कदम यांनी संजय राऊतांच्या वक्तव्याचा … Read more

“हा शिंदे गट नाही ही शिवसेना आहे, तिकडे सेना शिल्लक आहे”- देवेंद्र फडणवीस

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत कोस्टल रोडच्या कामाची पाहणी केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ग्रामपंचायत निकालांच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिल्लक सेना  म्हणत नव्या वादाला तोंड फोडले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी,“आजच्या ग्रामपंचायतींच्या निकालांनी आमच्या शिवसेना-भाजपा युतीवर शिक्कामोर्तब केला आहे. … Read more

महाराष्ट्र राजकारणाची नवी समीकरणे: मनसे भाजपसोबत गेल्यास सेना- राष्ट्रवादीची युती होण्याची शक्‍यता

मुंबई – परप्रांतीयांच्या मुद्‌द्‌यावर आतापर्यंत आक्रमक भूमिका घेणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता त्यांच्या इंजिनाची दिशा बदलल्याचे एव्हाना स्पष्ट झाले आहे. त्यांनी आता हिंदुत्व या आपल्या मुळ मुद्‌द्‌याकडे पुन्हा मोर्चा वळवला आहे. राज ठाकरे यांनी भूमिका बदलल्यानंतर भाजपच्या विविध नेत्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत हे दोन पक्ष … Read more

भारताचे यंदाच्या दशकात ‘एसईएनए’ देशांविरुद्धच्या मालिकेत अपयश

नवी दिल्ली – भारतीय संघाला यंदाच्या दशकात सेना (एसईएनए) देशांविरुद्धच्या मालिकेत अन्य देशांच्या तुलनेत जास्त अपयश आले आहे. सेना देशांविरुद्धच्या मालिकांमध्ये श्रीलंका, पाकिस्तान, बांगला देश व भारत या चार संघांमध्ये भारतीय संघच जास्त अपयशी ठरला आहे. सेना म्हणजे (एसईएनए- दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया).  या दशकातील अपयश नुकत्याच भारतीय संघाच्या दारुण पराभवानंतर जास्तच चर्चिले … Read more

अमृता फडणवीस यांना आवरा

किशोर तिवारींचे भैय्याजी जोशी यांना पत्र मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच चर्चेत असतात. आपल्या सोशल मीडियावरुन त्या राजकीय कोट्या देखील करत असतात. यावरुन बऱ्याचदा त्या ट्रोल देखील होतात. मात्र आता अमृता फडणवीस यांना आवरा, अशा आशयाचे पत्र वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी … Read more

विधानभवनाचा पोलीस आयुक्तांकडून सुरक्षेचा आढावा

विधानभवनाबाहेर पोलिसांच्या बंदोबस्तात वाढ मुंबई : राज्यातील सत्ता संघर्षाच्या पार्श्‍वभूमिवर भाजपला बहुमत विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी विधीमंडळाचे अधिवेशन केव्हाही बोलावले जाण्याची शक्‍यता आहे. त्या पार्श्‍वभूमिवर मुंबईचे पोलीस संजय बर्वे यांनी सोमवारी विधीमंडळातील सुरक्षेचा आढावा घेतला. त्यानंतर विधानभवनाबाहेरील पोलिसांच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. भाजपकडे बहुमताचे संख्याबळ नसतानाही त्यांनी सत्ता स्थापन केली आहे. … Read more

चर्चा चालू ; लवकरच निर्णय : उध्दव ठाकरे

मुंबई : दोन्ही बाजूकडून चर्चा सुरू झाली असून लवकरच त्याचा निर्णय जाहीर करू, असे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी बुधवारी सांगितले. कॉंग्रेस नेत्यांशी चर्चा केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि माणिकराव ठाकरे यांच्याशी ठाकरे यांनी चर्चा केली. तत्पुर्वी या नेत्यांनी लिलावती रुग्णालयात जाऊन शिवसेना नेते आणि सामनाचे संपदक … Read more

आता चेंडू शिवसेनेच्या कोर्टात-भाजपची भूमिका

नवी दिल्ली : शिवसेनेने स्वीकारलेल्या आक्रमक आणि आग्रही भूमिकेमुळे महाराष्ट्रातील सरकार स्थापनेबाबत भाजपने तूर्त वेट अँड वॉचचे धोरण कायम ठेवले आहे. आता चेंडू शिवसेनेच्या कोर्टात असल्याची भूमिका भाजपने घेतली आहे. सत्तावाटपाच्या सुत्रावरून टोकाचे मतभेद असल्याने भाजप आणि शिवसेना यांच्यातील सरकार स्थापनेविषयीची चर्चा ठप्प आहे. समसमान सत्तापदांचा आग्रह धरणाऱ्या शिवसेनेला अडीच वर्षांच्या कालावधीसाठी मुख्यमंत्रिपद हवे आहे. … Read more

युतीचं सापडेना कुणालाच कुळ; सोशल मीडियावर मिम्सचा धुमाकूळ

पुणे: राज्यात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून १० दिवस उलटले तरी देखील सत्ता स्थापने बाबत कशी स्पष्ट संकेत मिळताना पाहायला मिळत नाहीत, जनतेने महायुतीला स्पष्ट बहुमत देऊन देखील भाजप सेनेतील अंतर्गत वादामुळे ते अद्याप तरी सत्ता स्थापन करण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे या संदर्भात सोशल मीडियावर चांगलेच मिम्स व्हायरल होत आहेत. अभिनेता अनिल कपूर ‘नायक’ सिनेमात … Read more