‘५० टक्के ज्येष्ठ नागरिक आरोग्य तपासणीसाठी जात नाहीत’; सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर

नवी दिल्ली – देशाच्या शहरी भागांत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले की किमान ५० टक्के ज्येष्ठ नागरिक आर्थिक अडचणी आणि प्रवासाच्या अडचणीमुळे आरोग्य तपासणीसाठी डॉक्टरांकडे जात नाहीत. ग्रामीण भागातील अशा ज्येष्ठ नागरिकांची संख्या तर ६२ टक्के आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भात देशव्यापी सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यातून हे आकडे समोर आले आहेत. एजवेल या स्वयंसेवी … Read more

पुणे | ज्येष्ठ नागरिक करणार धंगेकरांचा प्रचार

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – काॅंग्रेस इंडिया आघाडीचे पुणे लोकसभा मतदार संघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारात आता शहरातील दोन हजार ज्येष्ठ नागरीक उतरणार आहेत. धंगेकर यांच्या प्रचारार्थ शहर काँग्रेस ज्येष्ठ नागरिक संघाची बैठक घेण्यात आली. या वेळी संघटनेचे दोन हजारांपेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिक घरोघरी प्रचार पत्रके वाटणार आहेत. संघटनेचे अध्यक्ष द. स. पोळेकर … Read more

ज्येष्ठ नागरिकांना मोफत मिळणार श्रवणयंत्र, व्हीलचेअर आणि बरच काही…; सरकारच्या ‘या’ योजनेसाठी लवकर करा अर्ज

Rashtriya Vayoshri Yojana । केंद्र सरकारने वृद्धांना आधार देण्यासाठी एक योजना सुरू केली आहे. वृद्धांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. ज्यात त्या ज्येष्ठ नागरिकांचा समावेश करण्यात आला आहे. ज्यांना वृद्धापकाळात शारीरिक अपंगत्व आले आहे. ज्यांना बघायला, ऐकायला आणि चालायला आधार लागतो. अशा ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांची आवश्यकता असते. अशा वृद्धांसाठी सरकार ‘राष्ट्रीय वयोश्री योजना’ … Read more

पिंपरी | ज्येष्ठांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू – आमदार बनसोडे

पिंपरी, (प्रतिनिधी) – ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवाचा समाजाला खूप उपयोग होतो. त्यामुळे ज्येष्ठांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय नेतेमंडळी प्रयत्न करू, असे आश्वासन आमदार अण्णा बनसोडे यांनी दिले. चिंचवड येथे आनंद ज्येष्ठ नागरिक संघाने आयोजित केलेल्या कार्य्रमात ते बोलत होते. या वेळी विधानपरिषद आमदार उमा खापरे, माजी नगरसेवक शीतल शिंदे, राजाभाऊ गोलांडे, ॲड. संदीप चिंचवडे, अजित गव्हाणे, … Read more

नवी मुंबई : ज्येष्ठ नागरिकांना आजपासून NMMT बससेवा मोफत; निर्णयाचे नागरिकांकडून स्वागत

नवी मुंबई : राज्य सरकारने एसटी महामंडळाने प्रवास करणाऱ्या 75 वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवास देण्याची घोषणा केली. त्यानंतर एसटी महामंडळाने महिलांना अर्ध्या तिकीटात एसटी प्रवास करणार असल्याचेही जाहीर केले. ज्यानंतर एसटीने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली. आता नवी मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांना दिवाळी भेट दिली आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी असलेल्या 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना … Read more

जपानमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी खास शहरे ; ज्येष्ठांच्या गरजा लक्षात घेऊन शहरांचे नियोजन

टोकियो : जपानमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. त्यांच्या दैनंदिन समस्या लक्षात घेऊन आता जपानमध्ये विशेष शहरांची उभारणी करण्यात येणार आहे. ज्येष्ठाची शारीरिक क्षमता आणि गरजा लक्षात घेऊन ही नवी कॉम्पॅक्ट शहरे उभारण्यात येणार आहेत. जपानमध्ये आज साडे तीन कोटीपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक आहेत. या नागरिकांच्या फायद्यासाठी ही योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेतील पहिले … Read more

Maharashtra : ज्येष्ठ नागरिकांचा मोफत ‘एसटी प्रवासा’ला प्रचंड प्रतिसाद,अवघ्या 52 दिवसांमध्ये….

मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील 75 वर्षांवरील नागरिकांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवासाच्या निर्णयामुळे अवघ्या 52 दिवसांमध्ये 1 कोटी 4 लाख 86 हजार ज्येष्ठांनी लाभ घेतला आहे. ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ योजनेला भरभरून प्रतिसाद मिळाल्याने 1 कोटी ज्येष्ठ नागरिकांचे आशिर्वाद राज्य शासनाला मिळाल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या … Read more

वार्धक्‍यात नको ‘नटसम्राट’चे भोग ! संपत्तीचे मृत्युपत्र करण्यावर ज्येष्ठ नागरिकांचा भर; करोनानंतर दस्तांत वाढ

    गणेश आंग्रे पुणे, दि. 16 -आयुष्याच्या संध्याकाळी संपत्ती मुलांच्या नावावर करायची अन्‌ निर्धास्त व्हायचं. अशीच आजवर ज्येष्ठांची भूमिका असायची. अलीकडे मात्र ही भूमिका बदलतेय. उतारवयात “नटसम्राट’चे भोग नकोत, की मृत्यूपश्‍चात कुटुंबीयांत कलह, यामुळे मृत्यूपत्र करण्यावर भर दिला जात आहे. मागील 20 महिन्यांत राज्यात 81 हजार 216 मृत्यूपत्रांची नोंदणी झाली आहे. करोना संकटाच्या काळानंतर … Read more

पुणे: बूस्टरसाठी ज्येष्ठांना सहव्याधी असल्याचे डॉक्‍टरांचे प्रमाणपत्र आवश्‍यक

दि.10 जानेवारीपासून कागदपत्रे पाहूनच देणार लस पुणे – हेल्थकेअर आणि फ्रंटलाइन वर्कर्सशिवाय साठ वर्षांवरील नागरिकांना करोना प्रतिबंधक लसीचा “बूस्टर’डोस दिला जाणार आहे. मात्र, “कोमॉर्बिड’ अर्थात अन्य गंभीर आजार असलेल्याच ज्येष्ठ नागरिकांना “बूस्टर’चा डोस मिळणार असून, तसे प्रमाणपत्र त्यांनी डॉक्‍टरांकडून आणणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा डोस देण्याची प्रक्रिया अगोदरप्रमाणेच असणार आहे. आधार क्रमांकाच्या आधारेच ही … Read more

Pune Crime: सायबर चोरट्याकडून ज्येष्ठ नागरिकाची 11 लाखाची फसवणूक; कशी झाली फसवणूक?

पुणे – मोबाइल कंपनीकडून ग्राहकांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू असून माहिती अद्ययावत न केल्यास मोबाइल क्रमांक बंद पाडण्याची बतावणी करून सायबर चोरट्याने एका ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्यातून पावणे अकरा लाखांची रोकड लांबविल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार वारजे भागात राहायला आहेत. गेल्या महिन्यात ज्येष्ठ नागरिकाच्या … Read more