रेल्वे तिकीट दरांच्या सवलतींसाठी प्रवासी अजूनही ‘वेटिंग’वरच; विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना फटका

मुंबई  :  काही दिवसापूर्वी रेल्वे प्रशासनाने काही गाड्यांचा विशेष दर्जा काढून त्या नियमित  करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे करोना काळात वाढलेले तिकीट दर ३० टक्क्यांनी कमी होऊन पूर्वी इतके झाले. मात्र अजूनही प्रवाशांना तिकीट दरात मिळणारी सवलत दिली जात नाही. याचा फटका विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आदींसह अन्य वर्गाला बसत आहे. प्रवासी आता सवलतीच्या … Read more

पुणे : भाजपच्यावतीने आयोजित आरोग्य तपासणी शिबिरास ज्येष्ठ नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद

पुणे (प्रतिनिधी) : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी शिबिर, आरोग्यविषयक तज्ज्ञांचे मार्गदर्शन तसेच ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र नोंदणी उपक्रम राबविण्यात आले. भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक 16 सोमवार पेठ, रास्ता पेठ मधील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुणे महानगपालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या हस्ते … Read more

ज्येष्ठ नागरिकांचे संघटन महत्त्वाचे : शिक्षण तज्ञ बाळासाहेब सातव

वाघोली (प्रतिनिधी) : ज्येष्ठ नागरिकांची संघटन होऊन त्यांचे विविध प्रश्न मार्गी लागणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ञ बाळासाहेब सातव सर यांनी केले. वाघोली तालुका हवेली  येथे  राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून  ज्येष्ठ नागरिक संघ वाघोली व अनघा महिला विकास संस्था वाघोली यांच्या संयुक्त विद्यमाने शिरूर-हवेली विधानसभा आमदार अशोक पवार  यांच्या उपस्थितीत … Read more

आजी-आजोबांचे आजार आणि उपचार

– डॉ. रमेश गोडबोले आजी-आजोबांच्या वयाला म्हणजे सर्वसाधारण साठीच्या पुढे सर्व शरीरिक क्षमतांच्या ऱ्हासाला सुरवात झालेली असते. तरुण वयापर्यंत शरीरातील पेशींच्या दररोज मृत होण्याच्या वेगापेक्षा त्याच प्रकारच्या नवीन पेशी तयार होण्याचा वेग जास्त असतो. त्यामुळे शरीरातील सर्व इंद्रिये वाढत असतात, विकसित होत असतात. परंतु वृद्धत्वामध्ये या उलट प्रक्रिया होत असल्याने प्रत्येक इंद्रियाच्या क्षमतांचा ऱ्हास होत … Read more

करोना मृत्यूचे प्रमाण ‘या’ वयोगटात जास्त

पुणे – करोनाबाधित मृतांमध्ये अन्य आजार असलेल्यांची संख्या जास्त आहे, परंतु त्याबरोबरच “सिनियर सिटीझन्स’ची संख्याही लक्षणीय आहे. बुधवारी मृत्यू पावलेल्यांत ज्येष्ठ नागरिकांची संख्या सर्वाधिक म्हणजे 16 पैकी 12 आहे. “मल्टिपल डिसीज’ म्हणजे मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनीचे रोग याशिवाय अन्य व्याधी असलेल्यांना जर करोनाची बाधा झाली तर त्यांची प्रकृती गंभीर होऊ शकते. दिवसभरात मृत पावलेल्या 16 … Read more

हरियाणाच्या बजेटमध्ये ज्येष्ठांचे पेन्शन वाढवले

चंदीगड – हरियाणातील मनोहर लाल खट्टर सरकारने आपले बजेट डिजिटल स्वरूपात मांडले असून त्यात केलेल्या काही तरतूदी पाहता राज्यातील भारतीय जनता पार्टी सरकारने आतापासून निवडणुकांच्या तयारीला सुरूवात केली असल्याचे मानले जाते आहे. खट्टर सरकारच्या अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांना दिली जाणाऱ्या पेन्शनची रक्कम 2500 रूपये दरमहा करण्यात आली आहे. तसेच 9 ते 12 पर्यंतचे शिक्षणही मोफत देण्याची … Read more

पोलिसांकडून ज्येष्ठ नागरिकांना मदत

पुणे (प्रतिनिधी) : शहरात कठोर निर्बंध घालण्यात आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना पुणे पोलिसांचा ‘भरोसा कक्ष’ तसेच ज्येष्ठ नागरिक कक्षाकडून शहरातील १३६ ज्येष्ठ नागरिकांना मदत पोहोचविण्यात आली. रुग्णालयात जायचे आहे, गॅस संपला, जेवणाचा डबा तसेच औषधे हवी आहेत, किराणा माल, भाजी हवी आहे, अशा प्रकारची मदत ज्येष्ठ नागरिकांनी पोलिसांकडे मागितली होती. ज्येष्ठ नागरिकांना पोलिसांचा भरोसा कक्ष तसेच … Read more

ज्‍येष्‍ठ नागरिक, अपंगांसाठी डाक विभागाची घरपोच सेवा  

मुंबई : कोरोना विषाणूचा प्रदुर्भाव वाढतच असल्याने राज्यात लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. संपूर्ण देशात संचारबंदी असल्याने नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थिती भारतीय डाक विभागाने अत्यंत महत्पूर्ण निर्णय घेतला आहे.  डाक विभागाने वयस्‍कर आणि अंपग  पेन्‍शन धारकांना घरपोच पेन्‍शन देण्‍याची व्‍यवस्‍था केली आहे.  वयस्‍कर आणि अंपग धारकांनी डाक विभागाशी संपर्क साधावा असे अवाहन  डाक विभागाने केले आहे.  अधिक मदतीसाठी डाक विभागाच्या विभागीय कार्यालयातील  (दूरध्‍वनी क्रमांक 0241-2355010) … Read more

भारतीय रेल्वेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली – करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेनी सर्व प्रवासी रेल्वेसेवा बंद केल्या आहेत. मात्र, १५ एप्रिलला लॉकडाऊन उघडण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने बुकिंगसाठी गर्दी झाली आहे. अनेक प्रमुख रेल्वेच्या बुकिंग फुल्ल असून वेटिंग लिस्टही जाहीर झाल्या आहेत. अशामध्ये ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणारी सूट रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. देशभरात सध्या करोना व्हायरस थैमान घालत … Read more

गोखले कन्स्ट्रक्शन्सचा ज्येष्ठ नागरिकांसाठी मदतीचा हात

कोथरूड, कर्वेनगर, प्रभात रस्ता, भांडारकर रस्ता भागात घरपोच किराणा, औषधे पुणे – लॉकडाउनच्या परिस्थितीत गोखले कन्स्ट्रक्शन्सच्या वतीने शहरातील ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. या अंतर्गत शहराच्या प्रभात रस्ता, भांडारकर रस्ता, कर्वेनगर, पटवर्धन बाग, मयुर, आयडियल, डहाणूकर, रामबाग कॉलनी या भागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष हेल्पलाइनची व्यवस्था करण्यात आली आहे. या हेल्पलाइनवर संपर्क केल्यानंतर … Read more