पुणे | आफ्रिकन देशांना पाठवली मलेरिया प्रतिबंधक लस

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सीरम इन्स्टिट्यूट अॉफ इंडियाने मलेरिया प्रतिबंधक लसीचे ४३ हजार २०० डोस (R21/Matrix-M™ ) सोमवारी (दि. २० मे) आफ्रिकन देशांसाठी पाठवले आहेत. मलेरियाविरुद्धच्या जागतिक लढ्यात हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. पहिल्या टप्प्यातील हे डोस शिपमेंट सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक (सीएआर) ला पाठवले जाणार आहेत. त्यानंतर आगामी दिवसांमध्ये दक्षिण सुदान आणि डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ … Read more

सायरस पुनावाला यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे; शरद पवार यांची मागणी

Sharad Pawar:  केंद्र सरकारने यंदा पाच जणांना भारतरत्न पुरस्कार दिला आहे. एकाच वेळी इतक्या लोकांना हा पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. नरेंद्र मोदी सरकारने कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची घोषणा सर्वप्रथम केली. त्यानंतर काही दिवसांनी हा पुरस्कार लालकृष्ण अडवाणी यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. लालकृष्ण अडवाणी यांच्यानंतर केंद्र सरकारने माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग, पी.व्ही. … Read more

सीरम इन्स्टिट्यूटने विकसित केली मेंदूज्वरावरील लस; 26 देशांना होणार उपयोग

पुणे -सीरम इन्स्टिट्यूटने विकसित केलेल्या मेंदूज्वर (मेनिंजायटीस) नियंत्रित करणाऱ्या लसीला “जागतिक आरोग्य संघटने’ने प्राथमिक परवानगी दिली आहे. तब्बल 26 देशांमध्ये या लसींची गरज असून अगदी गॅम्बियापासून ते इथिओपियापर्यंतच्या सगळ्या देशात मोठ्या प्रमाणात असलेल्या या रोगावर ती गुणकारी ठरणार आहे. शहरातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या 13 वर्षांच्या सहकार्यातून ही लस विकसित करण्यात आली आहे. … Read more

Covid vaccine : केंद्र सरकारला कोविशिल्डचे 2 कोटी डोस मिळणार मोफत; सीरम इन्स्टिट्यूटचा प्रस्ताव

नवी दिल्ली – सीरम इन्स्टिट्यूटने केंद्र सरकारला कोविशिल्ड या करोना लसीचे 2 कोटी मोफत डोस देऊ केले आहेत. चीनसह काही देशांत करोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर, सीरमकडून मोफत डोसचा प्रस्ताव देण्यात आला आहे. सीरमकडून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पत्र पाठवण्यात आले आहे. त्यामध्ये कोविशिल्डचे 410 कोटी रूपये किमतीचे डोस सरकारला कुठलेही शुल्क न … Read more

सीरम इन्स्टिट्यूट लवकरच मंकीपॉक्स आजारावर लस तयार करणार, अदार पूनावाला यांनी दिले अपडेट

मुंबई – जगातील अनेक देशांपाठोपाठ भारतातही मंकीपॉक्सने थैमान घातला आहे. सध्या देशात 4 प्रकरणे नोंदवली गेली आहेत, ज्यानंतर भारतीय औषध उद्योग या विषाणूजन्य आजारासाठी लस आणि औषधे विकसित करण्याचा विचार करत आहे. भारतातील कोविड-19 लस कोविशील्ड विकसित करणार्‍या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी मंगळवारी सांगितले की,’ते जागतिक भागीदार नोव्हावॅक्सच्या सहकार्याने मंकीपॉक्ससाठी mRNA … Read more

पुण्यातील सीरम इन्स्टिटुटच्या कोव्होव्हॅक्स लसीच्या वापराला मान्यता; गरीब राष्ट्रातील लसीकरणाला मिळणार बळ

जिनिव्हा – पुण्यातील सीरम इन्स्टिटुट ऑफ इंडियाने उत्पादित केलेल्या कोव्होव्हॅक्‍स या करोना प्रतिबंधात्मक लसीला जागतिक आरोग्य संघटनेने आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे. अमेरिकेतील नोव्हाव्हॅक्‍स या कंपनीने शोधलेल्या या लसीमुळे गरीब राष्ट्रातील लसीकरणाला बळ मिळू शकते, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. विषाणूच्या नव्या आवृत्तीतही ही लस मोठे आजारपण आणि मृत्यू या पासून संरक्षण देऊ शकते, … Read more

अदर पूनावाला म्हणाले,”आता ‘कोविशील्ड’ लसीचे उत्पादन ५० टक्क्यांनी कमी करणार; कारण….

नवी दिल्ली : देशात एकीकडे करोनाच्या नव्या व्हेरियंट म्हणजेच ओमायक्रॉनने जगाची चिंता वाढवली आहे. तर दुसरीकडे लसीकरणाचा वेग देखील वाढवण्याचा सल्ला तज्ज्ञ मंडळी देत आहेत. या सर्व घडामोडीत आता आणखी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोविशील्ड लसीचे उत्पादन ५० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सीरमचे सीईओ अदार … Read more

पुणे : ‘कोवोवॅक्‍स’ चाचणीसाठी चिमुकल्यांची नोंदणी सुरू

पुणे – “कोवोवॅक्‍स’ या करोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचणीसाठी आता 2 ते 6 वर्षांच्या मुलांच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सीरम कंपनीकडून ही लस तयार करण्यात आली असून, पुण्यात दोन ठिकाणी दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यांसाठी ही चाचणी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. सीरम कंपनीने 18 वर्षापुढील व्यक्तींसाठी “कोविशिल्ड’ ही लस बाजारात आणली. त्यानंतर 18 … Read more

कोविशिल्डच्या 66 कोटी डोसचा पुढील 3 महिन्यांत पुरवठा; सीरम इन्स्टिट्यूटची ग्वाही

नवी दिल्ली – कोविशिल्ड या करोनावरील लसीच्या 66 कोटी डोसचा पुरवठा पुढील तीन महिन्यांत केला जाणार आहे. कोविशिल्डचे उत्पादन करणाऱ्या पुणेस्थित सीरम इन्स्टिट्यूटने तशी ग्वाही केंद्र सरकारला दिली आहे. केंद्र सरकार आणि खासगी रूग्णालयांना सीरमकडून पुढील महिन्यात (ऑक्‍टोबर) सुमारे 22 कोटी डोस उपलब्ध केले जातील. चालू वर्षाच्या प्रारंभापासून ते 19 सप्टेंबर अखेरपर्यंत सीरमने केंद्र सरकारला … Read more

भाजपच्या करंटेपणामुळेच पुण्याला लस नाही : जोशी

पुणे – कोविशिल्ड लसीचे जादा डोस पुण्याला देण्याची सीरम इन्स्टिट्यूटची अजूनही तयारी आहे, पण भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या करंटेपणामुळे जादा डोसला मुकावे लागत आहे, असा आरोप माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केला. पुण्याला कोविशिल्डचे जादा डोस देण्याची तयारी आहे, असे सीरमचे संस्थापक सायरस पूनावाला यांनी लोकमान्य टिळक पुरस्कार स्वीकारताना सांगितले. फक्‍त याकरिता … Read more