Uttar Pradesh : कावड नेणारे 5 यात्रेकरू वीजेच्या धक्‍क्‍याने दगावले…

मेरठ (उत्तर प्रदेश) :- उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील एका गावाजवळ 11 केव्ही पॉवर केंद्राच्या वायरच्या संपर्कात आलेल्या वाहनामुळे कावड यात्रेतील पाच जण दगावले असून अन्य पाच जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना मेरठ जिल्ह्यातील भवानपूरच्या रली चौहान गावात घडली. तेथे कावड यात्रेकरूंचे वाहन लोंबकणाऱ्या हाय-टेंशन पॉवर लाइनच्या संपर्कात आले. या घटनेनंतर परिसरातील स्थानिकांनी घटनास्थळी पोहोचून … Read more

Afganistan : ड्युरांड लाईनवर अजूनही तणाव; पाक लष्कर आणि तालिबानमध्ये चकमक

इस्लामाबाद :– पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीनेवरील ड्युरांड लाईनवर (Durand Line ) पाकिस्तानचे सीमेवरील लष्कर आणि तालिबानी सुरक्षा रक्षकांदरम्यान चकमक झाली आहे. रविवारी संध्याकाळी झालेल्या या नव्या चकमकीमध्ये किमान सात जण जखमी झाले आहेत. अफगाणिस्तानच्या पक्तिया प्रांतातील दंद ए पटान भागात ही चकमक घडली. जखमी झालेल्यांमध्ये काही लहान मुलांचाही समावेश असल्याचे पाकिस्तानातील प्रसार माध्यमांनी म्हटले आहे. … Read more

नेदरलँडमध्ये करोना निर्बंधांविरोधातील आंदोलनात दंगल; पोलिसांकडून गोळीबार, अनेकजण जखमी

रोटरडॅम : जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या करोनाने मागच्या काळात आपला प्रादुर्भाव कमी केला होता. मात्र आता पुन्हा एकदा करोनाने आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. त्यातच वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नेदरलँडमध्ये कठोर निर्बंध लादण्यात आले असून  याविरोधात तेथे आंदोलन सुरू झाले. आंदोलनात घुसलेल्या काही समाजकंटकांनी दुकानांची तोडफोड, दगडफेक, आग लावणे आणि पोलिसांवर हल्ला केला. यानंतर पोलिसांनी … Read more

भीषण अपघात ! मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खासगी बस ५० फूट दरीत कोसळली

रायगड : मुबंई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खासगी बसला भीषण अपघात झाला आहे. आज पहाटे चार वाजताच्या सुमारास कशेडी घाटात भोगाव गावाजवळ हा अपघात झाला. बस रस्ता सोडून ५० फूट दरीत कोसळली. या अपघातात 8 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर 15 प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातात जखमींना पोलादपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मदत … Read more