nagar | जिल्ह्यातील सर्व गोशाळांना ११ लाख रुपयांचा चारा

राहुरी, (प्रतिनिधी): नगर जिल्ह्यात तीव्र दुष्काळ असल्यामुळे मुंबई येथील वर्धमान संस्कार धाम या संस्थेचे राजू शहा यांनी जिल्ह्यातील सर्व गोशाळांना अकरा लाख रुपयांचा चारा पाठविला असल्याची माहिती राहुरी फँक्टरी येथील श्रीकृष्ण गोशाळेचे ललित चोरडिया यांनी दिली. दुष्काळानिमित्त दोन महिने चारा पुरवण्यात यावा, अशी विनंती चोरडिया यांनी त्यांच्या ट्रस्टला केली होती. त्यांच्या ट्रस्टने ती मान्य करून … Read more

पुणे जिल्हा | चिकनचे दर कडाडले

वाल्हे, (वार्ताहर) – पुरंदर तालुक्यात तीव्र दुष्काळ जाणवत असून, दिवसेंदिवस वाढती उष्णता, दिवसेंदिवस कोंबडीच्या खाद्यात होत असलेली दरवाढ, पोल्ट्रीतील दगावतात असलेले पक्षी यामुळे चिकनच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून थंडीमध्ये 200 रुपये किलो असलेल्या चिकनचे दर 260 किलो झाले आहेत. मागील काही वर्षांपासून मटणाचे भाव वाढल्याने मांसाहारप्रेमी चिकनकडे वळले होते. मात्र, आता चिकनचे भावही … Read more

पुणे जिल्हा | भीषण दुष्काळाची चाहूल: बागायती राहू बेटात शेतकरी घायकुतीला

राहू, (वार्ताहर)- दौंड तालुक्यातील बागायती क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या राहू बेट परिसरात यंदा मार्चमध्येच सूर्यदेव आग ओकू लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. नदीत पाणी आहे. परंतु पिकाला पाणी देता येत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिसरातील गावात वीज उपलब्ध नाही असे नाही. परंतु अनेक तांत्रिक अडचणीमुळे तसेच ओव्हर लोडमुळे ट्रान्सफॉर्मर जाळण्याचे … Read more

पुणे जिल्हा | पुरंदर उपसातून पाणी चोरी!

बेलसर (वार्ताहर) – पुरंदर तालुक्यात सध्या अतितीव्र दुष्काळ पडला आहे.त्यात पुरंदर उपसा सिंचन योजना देखभाल दुरुस्तीसाठी बंद आहे. मागील अनेक काळापासून पारगाव मेमाणे (ता. पुरंदर) येथील शेतकरी पाणी चोरीबाबत तक्रारी करीत आहेत. त्यातच पारगाव येथील लाभार्थी शेतकरी पुरंदर उपसा सिंचन योजना मायनर 4 दिवे लाइन यावरील लाभक्षेत्राच्या बाहेर छुप्या पद्धतीने पाइपलाइन जोडून देण्याबाबत तक्रारी अर्ज … Read more