satara | कोटेश्वर टाकीला पाणी गळती लाखो लिटर पाणी वाया

सातारा, (प्रतिनिधी) – सातारा शहरात पाण्याची तीव्र टंचाई असून शहराच्या पश्चिम भागातील नागरिकांना पाणी मिळेनासे झाले आहे. मात्र, कोटेश्वर टाकीला कमी दाबाने पाणी येणे आणि गळती लागून पाणी वाया जाणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. गळतीचे पाणी ओढ्यातून वाहून जात असल्याने पाणीपुरवठा विभागाचा गलथान कारभार पुन्हा समोर आला आहे. टाकीचा व्हॉल्व खराब असल्यामुळे पाण्याचे नियमनं … Read more

satara | जलपर्णीमुळे चिंचनेर वंदनमध्ये कृष्णा नदीच्या पात्राची दुर्दशा

सातारा, (प्रतिनिधी) – यावर्षी पाऊस कमी झाल्याने पाण्याची तीव्र टंचाई भासू लागलेली आहे. अशा काळात उपलब्ध असलेले नदी पात्रातील पाणी तरी स्वच्छ असले पाहिजे ही किमान अपेक्षा असली तरी सातारा तालुक्यातील चिंचनेर वंदन व निंब परिसरातील कृष्णा नदी पात्रात पाणी असून प्रचंड प्रमाणात जलपर्णी वाढल्याने ते पाणीही वापरता येत नाही. तसेच पाण्याचा निचरा होत नसल्याने … Read more

पुणे जिल्हा | आणे पठारावर तीव्र पाणीटंचाई

बेल्हे (वार्ताहर) – जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील पठार भागावर असलेले आणे, नळावणे, आनंदवाडी, पेमदरा येथील जलसाठे कोरडे पडले आहेत. येथील गावांना दोन दिवसांपासून टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. काही भागात विहिरी, कूपनलिका, तलावांतील पाणीसाठा अत्यल्प राहिला आहे. नदीवरील बंधारे तर केव्हाच उघडे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण झाली आहे. दुसरीकडे शेतीपिके … Read more

nagar | कुकडीचे पाणी सीना धरणात सोडा

माहीजळगाव, (वार्ताहर) – कुकडी कालव्याचे हक्काचे पाणी सीना धरणात सोडून सीनातून आवर्तन सोडावे, अशी मागणी माहिजळगाव परिसरातील शेतकऱ्यांतून केली जात आहे. माहीजळगाव परिसरात तीव्र पाणीटंचाई असून शेतकऱ्यांच्या विहीर, बोअरवेल जवळजवळ बंद होत आहेत. त्यामुळे परिसरात दुष्काळाचे सावट असून पाण्याची तीव्र टंचाई आहे. तीव्र पाणीटंचाई व चारा टंचाई असल्यामुळे सर्व शेतकरी अडचणीत सापडले आहे. दुष्काळजन्य परिस्थिती … Read more

पिंपरी-चिंचवड शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी सायंकाळी बंद

पिंपरी –  महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युतविषयक देखभाल दुरूस्ती व अन्य कामांसाठी गुरुवारी (दि. 1) शहरातील पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे त्या दिवशी शहराला सकाळी पाणीपुरवठा करण्यात येईल. मात्र, शहरातील सर्व भागांचा सायंकाळचा पाणीपुरवठा करण्यात येणार नसल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे. दुरूस्तीच्या कामासाठी सर्व पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवल्यामुळे … Read more

सिंहगड रस्ता परिसरात दिवाळीच्या दिवसांत पाणीकपात

वडगाव जलशुध्दीकरणाकडून आठवड्यात दोन दिवस पुरवठा बंद सिंहगड रस्ता – शहराला पाणी पुरवठा करणारी चारही धरणे सिंहगड रस्त्याच्या उशाला असली तरी या भागाला ऐन दिवाळीत पाणीकपातीचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, गतवर्षीच्या तुलनेत खडकवासला धरणात मागील वर्षांपेक्षा अधिक पाणी असले तरी, पाणी नियोजनासाठी वडगाव जलशुध्दीकरण केंद्रातून प्रत्येक आठवड्यात एक दिवस या भागात पाणीकपात केली … Read more

‘करोना’च्या संकटावर ‘पाणी’

पर्वती जलकेंद्रात बिघाड; टॅंकरभोवती नागरिकांचा घोळका पुणे – पर्वती जलकेंद्रात गुरुवारी पहाटे बिघाड झाल्याने केंद्रांतर्गत येणाऱ्या परिसरात पालिकेकडून टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. करोनाचे संकट असतानाही नागरिकांनी जीव धोक्‍यात घालीत पाणी भरण्यासाठी टॅंकरभोवती एकच घोळका केला. पर्वती जलकेंद्रातून सगळ्या पेठा, शिवदर्शन, लक्ष्मीनगर, तावरे कॉलनी, अरण्येश्‍वर, पद्मावती, सहकारनगर, चव्हाणनगर, संभाजीनगर, तळजाई, बिबवेवाडी, मार्केट यार्ड, महर्षीनगर या परिसराला … Read more

आंदर मावळात विजेअभावी पाण्यासाठी महिलांची पायपीट

टाकवे बुद्रुक – गेल्या आठ दिवसापूर्वी झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे आंदर मावळातील सत्तर ते पंच्याहत्तर विजेचे खांब पडल्यामुळे परिसरातील वीज पुरवठा पूर्णपणे विस्कळित झाला आहे. गेल्या सात दिवसांपासून वीजपुरवठा खंडित असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. वीज नसल्याचे घरगुती पाणीपुरवठा ठप्प असल्यामुळे कपडे धुवण्यासाठी तसेच घरगुती वापरासाठी विहिरीतून तसेच धरण, नदीवरून पाणी घेऊन येण्यासाठी महिलांना मोठी पायपीट … Read more

संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

शुक्रवारी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार पुणे – पर्वती जलकेंद्र, पंपिंग, रॉ वॉटर, वडगाव जलकेंद्र तसेच लष्कर जलकेंद्र, एस. एन. डी. टी. वारजे जलकेंद्र, नवीन होळकर पंपिंग स्टेशन येथील विद्युत, पंपिंगविषयक आणि स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी (दि.11) रोजी उपनगरांसह संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर, शुक्रवारी … Read more

जिल्ह्यात यंदा टॅंकरची संख्या 50 च्या आतच

पुणे – गतवर्षी झालेला भरमसाठ पाऊस आणि करोना पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे यंदा पुणे जिल्ह्यात पाणी टंचाईची तीव्रता फारशी जाणवली नाही. आता पावसाला सुरुवात झाली, तरीही जिल्ह्यातील टॅंकरची संख्या 50 च्या आत आहे. सद्य:स्थितीत 47 टॅंकरद्वारे 42 गावे, 186 वाड्या-वस्त्यांवरील 58 हजार 715 नागरिकांनी तहान भागवली जात आहे. गतवर्षीच्या तुलनेत केवळ 12 टक्‍के टॅंकर सुरू … Read more